महसूल आणि पोलीस प्रशासनाची कारवाई
दक्षिण सोलापूर : भीमा नदीपात्रातून बेकायदेशीरपणे वाळू उपसा करणाऱ्या वाळू चोरांवर महसूल आणि पोलीस प्रशासनाने संयुक्तपणे मोठी कारवाई केली आहे. औज (मं.) येथे गुरुवारी पहाटे ५:०० वाजण्याच्या सुमारास ही धडक कारवाई करण्यात आली.
या कारवाई दरम्यान पोलिसांनी २ ट्रॅक्टर आणि १ जेसीबी मशीन घटनास्थळा वरून जप्त केली आहे. ही कारवाई पोलीस उपअधीक्षक गणेश शिंदे,
निंबर्गीचे मंडळ अधिकारी राणा वाघमारे आणि तलाठी निंगु कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.
भीमा नदीपात्रातून बेकायदेशीररीत्या वाळूची चोरी होत असल्याची खात्रीशीर माहिती महसूल व पोलीस विभागाला मिळाली होती. या माहितीच्या आधारे दोन्ही पथकांनी पहाटेच नदीपात्रात छापा टाकला.
या प्रकरणी वाळू चोरी करणारे आणि वाहनाचे मालक अय्याज जाफरसो पाटील यांच्यासह इतर २ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ग्राम महसूल अधिकारी किरण कोठुळे यांनी फिर्याद दिली आहे. या कारवाईमुळे दक्षिण सोलापूर तालुक्यातील अवैध वाळू उपसा करणाऱ्या माफियांचे धाबे दणाणले आहेत.
निंबर्गीचे मंडळ अधिकारी राणा वाघमारे यांची धडक कामगिरी
या धडक कारवाईत निंबर्गीचे मंडळ अधिकारी राणा वाघमारे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. वाळू चोरीची माहिती मिळताच त्यांनी पोलीस आणि महसूल प्रशासनाच्या पथकासह पहाटेच घटनास्थळ गाठले. त्यांच्या सतर्कतेमुळे आणि तत्परतेमुळे वाळू चोरांचे वाहनांसह रंगेहात पकडण्यात यश आले असून, तालुक्यात त्यांच्या या कामगिरीचे कौतुक होत आहे.
________________
*बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा -*
*संपादक :- अमोगसिद्ध मुंजे*
*मो. 9423535294*













