छावा संघटनेचे लाक्षणिक उपोषण
सोलापूर : मंद्रूप पोलीस स्टेशनचे तत्कालीन पोलीस निरीक्षक शंकर पटवारी यांनी कर्तव्यात कसूर करून बेकायदेशीर कामकाज केल्याच्या विरोधात राष्ट्रीय छावा संघटनेने जिल्हा परिषद, पूनम गेट, सोलापूर येथे लाक्षणिक उपोषण केले. प्रदेश उपाध्यक्ष योगेश पवार यांच्या नेतृत्वाखाली व दक्षिण तालुकाध्यक्ष गणेश मोरे यांच्या पुढाकाराने हे उपोषण करण्यात आले. यावेळी कार्याध्यक्ष संजय पारवे, उत्तर तालुकाध्यक्ष रतिकांत पाटील यांच्यासह छावा संघटनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मंद्रूप पोलीस ठाण्यातील शासकीय मुद्देमालाचीच तत्कालीन अधिकाऱ्याने परस्पर विल्हेवाट लावल्याचा आरोप संघटनेने केला आहे. पोलीस ठाण्यात जमा असलेली गुन्ह्यातील एक गाडी उचलून स्वतःच्या शेतातील नोकराला वापरण्यासाठी दिली. पोलीस स्टेशनमधील इन्व्हर्टर बॅटरी स्वतःच्या फायद्यासाठी घरी नेली.
बदली झाल्यानंतर हा प्रकार उघडकीस येईल या भीतीने रात्रीच्या अंधारात पोलीस कर्मचाऱ्यांच्या मदतीने ती गाडी आणि इन्व्हर्टर-बॅटरी पुन्हा पोलीस ठाण्यात आणून ठेवल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे.
सरकारी मालमत्तेचा वैयक्तिक वापर करणे हा गंभीर गैरप्रकार असून, या प्रकरणाची वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी निष्पक्ष चौकशी करून संबंधितांवर अँटी करप्शन अंतर्गत गुन्हा नोंदवून कारवाई करावी, अशी मागणी छावा संघटनेने केली आहे.
यावेळी शेखर फंड, शिरीष जगदाळे, सागर माने, विकास घंटे, बालाजी खांडेकर, संजय गायकवाड, विकास पाटील, आशिष चव्हाण, शहाजी चव्हाण, सागर अंबुळे, प्रेम पाटील, सोमनाथ पाटील, अमोघसिद्ध पाटील, नागेश घोरपडे, गजानन पवार, मारुती सावंत, बबलू घाडगे, सतीश चिंचोळे, रामजी इंगळे, मल्लिकार्जुन तलवार, सिद्ध इंगळे, अॅड. लाटे, विलास रेवजे, मारुती भोसले, रवी हौशेट्टी आदी उपस्थित होते.
________________
*बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा -*
*संपादक :- अमोगसिद्ध मुंजे*
*मो. 9423535294*













