Friday, November 13, 2026
Navprabhatnews
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • क्राईम
  • कृषी
  • आरोग्य
No Result
View All Result
Navprabhatnews
No Result
View All Result

किंगमेकरची एन्ट्री, विरोधकांची झोप उडाली !

70/81 चा आकडा - विरोधकांनी कितीही आटापिटा केला तरी विजय हसापुरेंचाच !

संपादक-अमोगसिध्द मुंजे by संपादक-अमोगसिध्द मुंजे
October 30, 2026
in सोलापूर
0
“किंगमेकर”ची एन्ट्री, विरोधकांची झोप उडाली
0
SHARES
540
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

विरोधकांचे स्वप्न भंगणार

सोलापूर..
सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे माजी संचालक , सिद्धेश्वर कृषी उत्पन्न बाजार समितीचे विद्यमान संचालक व माजी जिल्हा परिषद सदस्य, आणि सहकार क्षेत्रातील मातब्बर नेते सुरेश हसापुरे यांनी डीसीसी बँकेसाठी दक्षिण सोलापूरमधून उमेदवारी अर्ज दाखल करताच निवडणुकीचे चित्र पालटले आहे. लोकसभा , विधानसभा व विधान परिषद तसेच स्थानिक स्वराज्य संस्था तसेच सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत “किंगमेकर” ची भूमिका बजावणारे सुरेश हसापुरे यांच्या विजयाचा वारू रोखण्यासाठी विरोधकांनी मोठा आटापिटा सुरू केला आहे. मात्र हसापुरे यांनी तीन वर्षापासूनच डीसीसी बँकेच्या निवडणुकीची तयारी सुरू करून तालुक्यातील ८१ पैकी ७० सोसायटी ताब्यात मिळवण्यात यश मिळवला आहे. त्यामुळे हसापुरे यांना पराभूत करण्याचे विरोधकांचे स्वप्न अधुरेच राहणार असल्याचे बोलले जात आहे.

    विरोधकांनी हसापुरे यांची डीसीसी बँकेतील एन्ट्री रोखण्यासाठी अनेक आजी-माजी आमदार यांनी हसापुरे यांच्या विरोधात सोसायटी संचालकांना निवडणुकीसाठी तयार केले. मात्र उमेदवारी दाखल करण्यास कोणीही तयार होत नसल्यामुळे एका “मातब्बर” घराण्यातील मतदाराला उमेदवारी अर्ज दाखल करण्यास लावण्यात आले आहे. मात्र सोसायटीमधील मतदान पाहता हसापुरे यांचा एकतर्फी विजय निश्चित मानला जात आहे.
यापूर्वीच हसापुरे यांनी ८१ सोसायटी ७० सोसायटी ठराव आपल्याकडे घेतला आहे. त्यामुळे निवडणूक लागल्यास ही निवडणूक एकतर्फी होणार आहे.
सहकार क्षेत्रातील प्रदीर्घ अनुभव, माजी संचालक म्हणून DCC बँकेची सखोल माहिती आणि सर्वपक्षीय नेत्यांशी असलेले जिव्हाळ्याचे व सलोख्याचे संबंध, हीच त्यांची खरी ताकद आहे. दक्षिण तालुक्यातील गावोगावी सोसायट्या आणि शेतकऱ्यांमध्ये त्यांचा मोठा जनसंपर्क आहे. शिवाय मुख्यमंत्री व पालकमंत्री यांनी हसापुरे यांच्या उमेदवारीला संमत सहमती दर्शविल्यामुळे हसापुरे यांचा उत्साह वाढला आहे.
दक्षिण सोलापूर तालुक्यातील एकूण ८१ सोसायट्यांपैकी तब्बल ७० पेक्षा जास्त सोसायट्या हसापुरे यांच्या समर्थकांच्या ताब्यात आहेत. उमेदवारी अर्ज दाखल करताना ६० पेक्षा अधिक सोसायटी चेअरमन व ठराव झालेले मतदार उपस्थित होते. यावेळी उमेदवारी दाखल करताना मोठ्या प्रमाणात शक्ती प्रदर्शन करण्यात आल्याने त्यांचा एकतर्फी विजय निश्चित असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे.
एकंदरीत, ७० सोसायट्यांचे पाठबळ असलेल्या हसापुरे यांच्या एन्ट्रीमुळे दक्षिणची जागा बिनविरोध होण्याची दाट शक्यता असून, विरोधकां समोर मोठे आव्हान उभे राहिले आहे! हसापुरे यांनी उमेदवारी दाखल करून पुढील रणनीतीची तयारी सुरू केली आहे. तर दुसरीकडे त्यांच्या उमेदवारीमुळे विरोधकांमध्ये भीतीचे वातावरण दिसून येत आहे. त्यामुळे विरोधकांच्या गुप्त बैठका मोठ्या प्रमाणात होत असून हसापुरे यांना कोणत्या मार्गाने पराभूत करता येईल यावर जोरदार चर्चा व तयारी सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र हसापुरे यांचे सर्वपक्षीय नेते असे असलेल्या संबंधामुळे त्यांचा विजय निश्चित म्हणून मानले जात आहे. हसापुरे यांची निवडणूक बिनविरोध होणार की निवडणूक लागणार , याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

________________
*बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा -*
*संपादक :- अमोगसिद्ध मुंजे*
*मो. 9423535294*

Previous Post

“किंगमेकर”ची एन्ट्री, विरोधकांची झोप उडाली

Next Post

मंद्रुपमध्ये “तीन जगद्गुरू” एकाच मंचावर!

संपादक-अमोगसिध्द मुंजे

संपादक-अमोगसिध्द मुंजे

Next Post
मंद्रुपमध्ये “तीन जगद्गुरू” एकाच मंचावर!

मंद्रुपमध्ये “तीन जगद्गुरू” एकाच मंचावर!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शेतकऱ्यांसाठी खुशखबर! रोटाव्हेटर, पंप, पेरणी यंत्रावर ५०% अनुदान

शेतकऱ्यांसाठी खुशखबर! रोटाव्हेटर, पंप, पेरणी यंत्रावर ५०% अनुदान

November 12, 2026
सोलापुरात निघाली “बांगडी”  म्हशीची अंत्ययात्रा

त्या “कनिष्ठ लिपिका”ची चौकशी करण्याची मागणी

November 11, 2026
आमदार देशमुखांवर भरोसा नाही का ?

आमदार देशमुखांवर भरोसा नाही का ?

November 9, 2026
१४ जणांच्या बंडामागे सर्व “पॅनल प्रमुखांची” छुपी युती ?

१४ जणांच्या बंडामागे सर्व “पॅनल प्रमुखांची” छुपी युती ?

November 9, 2026
महिलांच्या NCMC कार्डाला मुदतवाढ

महिलांच्या NCMC कार्डाला मुदतवाढ

November 9, 2026
दुष्काळाच्या काळोखात “माणुसकीचा” दीपोत्सव!

दुष्काळाच्या काळोखात “माणुसकीचा” दीपोत्सव!

November 7, 2026
“सभापती व बिडीओ” यांच्या पाठपुराव्यामुळे दक्षिणच्या मुलींची “गैरसोय” होणार     दूर

“सभापती व बिडीओ” यांच्या पाठपुराव्यामुळे दक्षिणच्या मुलींची “गैरसोय” होणार दूर

November 4, 2026
सत्यमेव जयते वॉटर कपच्या माध्यमातून जिल्ह्यात जलसंधारण चळवळ उभी करणार

सत्यमेव जयते वॉटर कपच्या माध्यमातून जिल्ह्यात जलसंधारण चळवळ उभी करणार

November 3, 2026

राजकारण

No Content Available
Load More

वेबसाईट दर्शक

161383

वृत्त संग्रह

November 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30  
« Oct    
  • Home
  • About Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • क्राईम
  • कृषी
  • आरोग्य

© Website Design by Digital Buffalo - 9028927697