शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी
सोलापूर | दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी दिलासा! शासन निर्णयानुसार प्रत्येक शेतकऱ्याला सरसकट ५ हजार रुपये अग्रीम मदत २ नोव्हेंबर २०२६ पासून थेट बँक खात्यात जमा होणार आहे. जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांनी सर्व प्रांताधिकारी व तहसीलदारांची तातडीची बैठक घेत युद्धपातळीवर काम करण्याचे निर्देश दिले.यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी अभिजित पाटील, उपजिल्हाधिकारी (महसूल) लक्ष्मण कासेकर, उपजिल्हाधिकारी सदाशिव पडदुने, सुमित शिंदे आदी जिल्हाधिकारी कार्यालयातून उपस्थित होते. सर्व प्रांताधिकारी व तहसीलदार दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी झाले होते.
जिल्ह्यातील ९ लाख २० हजार ६६३ शेतकऱ्यांची यादी तयार असून याद्या अपलोड करण्यासाठी शनिवार- रविवारही सर्व तहसील कार्यालये सुरू राहणार आहेत. तलाठी, मंडळ अधिकारी यांना कार्यालयात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यासह इतर तांत्रिक अडचणी त्वरित पूर्ण करून याद्या अपलोड करण्याचे आदेश देण्यात आले आहे.
दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात मदत गेलीच पाहिजे, कोणताही हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नसल्याचे जिल्हाधिकारी म्हणाले.
________________
*बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा -*
*संपादक :- अमोगसिद्ध मुंजे*
*मो. 9423535294*














