शेतकरी संघटनांच्या मागण्यांबाबत साखर कारखानदारांना प्रशासनाकडून सूचना
सोलापूर : ऊस गाळप हंगाम २०२६-२७ च्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाच्या वतीने शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधींची बैठक जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात घेण्यात आली. या बैठकीत शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधींनी ऊस दरासह विविध मागण्यांचे निवेदन प्रशासनाला सादर केले. तीन दिवसात ऊस दरासह विविध मागण्या संदर्भात निर्णय घेण्याचे आदेश प्रशासनाने दिले आहेत. 
या बैठकीस अप्पर जिल्हाधिकारी गणेश निऱ्हाळी, निवासी उपजिल्हाधिकारी अभिजित पाटील, प्रादेशिक सहसंचालक (साखर) किरण गायकवाड, प्रादेशिक उपसंचालक (साखर) नानासाहेब रुपनवर, विशेष लेखापरीक्षक बी. सी. पवार, विष्णू डोके, संतोष मानूरकर यांच्यासह ऊस नियंत्रण मंडळाचे सुहास पाटील, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे विजय रणदिवे, रयत क्रांती संघटनेचे नामदेव पवार, डिजीटल शेतकरी संघटना मोहोळचे अनिल आबाजी पाटील व महाराष्ट्र राज्य जनहित शेतकरी संघटना मोहोळचे प्रभाकर उर्फ दिनकर भैया देशमुख आदी उपस्थित होते.
________________
*बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा -*
*संपादक :- अमोगसिद्ध मुंजे*
*मो. 9423535294*













