Wednesday, June 24, 2026
Navprabhatnews
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • क्राईम
  • कृषी
  • आरोग्य
No Result
View All Result
Navprabhatnews
No Result
View All Result

मराठा सेवा संघाच्या शिवजयंतीचे आमदारांकडून कौतुक

संपादक-अमोगसिध्द मुंजे by संपादक-अमोगसिध्द मुंजे
February 17, 2026
in सोलापूर
0
मराठा सेवा संघाच्या शिवजयंतीचे आमदारांकडून कौतुक
0
SHARES
19
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

मराठा सेवा संघाने समाजाला वैचारीक शिवजयंती दिली – आ.अभिजित पाटील

सोलापूर…

मराठा सेवा संघाने समाजात काम करत असताना शिवजयंती कशी साजरी करावी याची समाजाला दिशा दिली, शिवजन्मोत्सवाच्या निमित्ताने प्रकाशित केलेला शिवसंदेश-शिवजयंती विशेषांक तालुक्यातील तरूण पिढीने अवश्य वाचावा व तरूणांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवन कार्याचा आदर्श घेत व्यसनमुक्त रहावे असे मत आमदार अभिजित पाटील यांनी शिवसंदेश साहित्य-संस्कृती फाऊंडेशनच्या शिवसंदेश-शिवजयंती विशेषांकाच्या प्रकाशन सोहळ्यात बोलताना व्यक्त केले.
पुढे बोलताना आमदार अभिजित पाटील यांनी शिवसंदेश टिमचे कौतुक करीत हा विशेषांक वाचनीय व संग्रही ठेवावा असा असल्याचे सांगत वैचारिक शिवजयंती साजरी करण्याचे आवाहन केले. यावेळी बाळासाहेब पाटील, ऋतुराज सावंत, सचिन जगताप, डॉ. धनाजी खताळ, ज्येष्ठ साहित्यिक हरिश्चंद्र पाटील यांची भाषणे झाली. व्याख्याते खंडुजी डोईफोडे यांचे शिवव्याख्यान संपन्न झाले.
शिवसंदेश साहित्य-संस्कृती फाऊंडेशनच्या वतीने शिवजन्मोत्सवाच्या निमित्ताने टेंभुर्णीत शिवसंदेश-शिवजयंती विशेषांकाचा प्रकाशन सोहळा माढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार अभिजित पाटील, ज्येष्ठ साहित्यिक हरिश्चंद्र पाटील, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब पाटील, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुरज देशमुख, जेएसपीएमचे चेअरमन ऋतुराज सावंत यांच्या शुभ हस्ते पार पडला. यावेळी यावेळी शिव व्याख्याते खंडुजी डोईफोडे, उद्योजक विजय देशमुख, डॉ.धनाजी खताळ, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक दादासाहेब देशमुख, मराठा सेवा संघाचे माढा तालुकाध्यक्ष निलेश देशमुख,संभाजी ब्रिगेडचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष सचिन जगताप, तालुका कार्याध्यक्ष बाळासाहेब वागज, माळशिरस तालुका अध्यक्ष दिगंबर मिसाळ, उपाध्यक्ष सचिन पराडे, नागेश व्यवहारे, सचिन महिंगडे , प्रताप काळे, प्रशांत जगताप यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. शिवसंदेश विशेषांकासाठी व कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिवसंदेशचे शंकर नागणे,अविनाश नांगरे,विजय काळे ,गणेश गोंदिल,अस्लम तांबोळी ,ऋषिकेश भंडारे,प्रशांत खंडागळे,ओंकार पाटील, आसिफ शेख,शुभम मोरे,जोतीराम बागवले,साहिल ताबे,गजेंद्र पंडित, हर्षद मोरे,विजय गायकवाड,विजय मोरे ,महेश ढगे,वैभव पवार ,गणेश जगताप,रणजीत मोरे,जयंत खंडाळे, प्रदीप कटवटे, सुदर्शन पंपटवार यांनी परिश्रम घेतले.

 

__________________________________
*🛑नवभारत न्युज पोर्टल ला बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा*
*संपादक :- अमोगसिद्ध मुंजे*
*9423535294*

Previous Post

शिवाजी महाराजांचे अपमान सहन करणार नाही

Next Post

टाकळी येथील दहावीच्या विद्यार्थ्यांना निरोप

संपादक-अमोगसिध्द मुंजे

संपादक-अमोगसिध्द मुंजे

Next Post
टाकळी येथील दहावीच्या विद्यार्थ्यांना निरोप

टाकळी येथील दहावीच्या विद्यार्थ्यांना निरोप

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सुट्टीचे दिवस मुरूम चोरांसाठी लाभदायक

सुट्टीचे दिवस मुरूम चोरांसाठी लाभदायक

June 21, 2026
पत्रकारितेमध्ये परस्परांना बळ देणे गरजेचे : आ. सचिन कल्याणशेट्टी

पत्रकारितेमध्ये परस्परांना बळ देणे गरजेचे : आ. सचिन कल्याणशेट्टी

June 21, 2026
बोरगाव पोलीसांची दमदार कामगिरी

बोरगाव पोलीसांची दमदार कामगिरी

June 20, 2026
६१६ मतदार ठरविणार  सोलापूरचा आमदार !

६१६ मतदार ठरविणार सोलापूरचा आमदार !

June 17, 2026
पाणीटंचाईवर टँकरचा ‘तोडगा’ की नव्या ‘संकटा’ची भर?

पाणीटंचाईवर टँकरचा ‘तोडगा’ की नव्या ‘संकटा’ची भर?

June 17, 2026

June 16, 2026
अडसूळ सरांच्या भेटीने मुलांना मिळाली प्रेरणा

अडसूळ सरांच्या भेटीने मुलांना मिळाली प्रेरणा

June 16, 2026
उंटावरील मिरवणूकीने मुले भारावली.

उंटावरील मिरवणूकीने मुले भारावली.

June 16, 2026

राजकारण

No Content Available
Load More

वेबसाईट दर्शक