Wednesday, June 24, 2026
Navprabhatnews
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • क्राईम
  • कृषी
  • आरोग्य
No Result
View All Result
Navprabhatnews
No Result
View All Result

आश्रमशाळेच्या विद्यार्थ्यांची भरारी

संपादक-अमोगसिध्द मुंजे by संपादक-अमोगसिध्द मुंजे
February 18, 2026
in सोलापूर
0
आश्रमशाळेच्या विद्यार्थ्यांची भरारी
0
SHARES
151
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

आश्रम शाळेतील दोन विद्यार्थ्यांची इस्रोसाठी निवड

 सोलापूर …

जिल्ह्यात इतर मागास व बहुजन कल्याण विभागाच्या अंतर्गंत ९७ आश्रम शाळा चालवले जात असून यामध्ये मंगळवेढा तालुक्यातील येड्राव व अक्कलकोट तालुक्यातील कोन्हाळी या आश्रम शाळेतील दोन विद्यार्थ्यांची इस्त्रो या अंतराळ संस्थेच्या अभ्यास दौर्‍यासाठी निवड झाली आहे.
जिल्ह्यातील भटक्या विमुक्त प्रवर्गातील विद्यार्थी शिकत असलेल्या आश्रम शाळांमधील विद्यार्थ्यांची इस्त्रो या अंतराळ संशोधनात करत असलेल्या केंद्र सरकारच्या संस्थेसाठी निवड झाली आहे. येड्रावच्या आश्रम शाळेतील इयत्ता बारावीच्या सायन्समध्ये शिकत असलेला ओंकेश माने व कोन्हाळीच्या आश्रम शाळेततील इयत्ता अकरावीच्या दिशा कामाठी अशा दोन विद्यार्थ्यांची इस्रोच्या अभ्यास दौर्‍यासाठी निवड झाली आहे.
या निवडीमुळे विद्यार्थ्यांना अवकाश संशोधन, उपग्रह संशोधन व वैज्ञानिक प्रक्रीयांबाबत अभ्यासाची संधी मिळणार आहे. शिवाय, विविध अंतराळ क्षेत्रात काम करत असलेल्या शासकीय संस्थांनाही भेटी देता येणार आहे.
….,
चौकट
…


इतर मागास व बहुजन कल्याण विभागामार्फत आश्रम शाळेच्या गुणवत्ता वाढीसाठी विविध स्पर्धा घेण्यात येतात. तसेच शाळांमध्येही अंतर्गत परीक्षा घेऊन विद्यार्थ्यांना परीपूर्ण बनविण्यासाठी मार्गदर्शन केले जाते. संस्था, मुख्याध्यापक व प्राचार्यांची वारंवार
बैठका घेऊन विद्यार्थ्यांच्या गुणवत्तावाढीसाठी उपाययोजना करण्यात येते. त्यामुळेच आश्रमशाळांमधील दोन विद्यार्थ्यांची इस्त्रोच्या अभ्यास दौर्‍यासाठी
निवड झाली आहे . विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षकांचे अभिनंदन .

गणेश सोनटक्के, सहाय्यक संचालक, इतर मागास व बहुजन कल्याण विभाग

Previous Post

टाकळी येथील दहावीच्या विद्यार्थ्यांना निरोप

Next Post

वैभव हत्तुरे यांना सत्तेची ” लाॅटरी “

संपादक-अमोगसिध्द मुंजे

संपादक-अमोगसिध्द मुंजे

Next Post
वैभव हत्तुरे यांना सत्तेची ” लाॅटरी “

वैभव हत्तुरे यांना सत्तेची " लाॅटरी "

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सुट्टीचे दिवस मुरूम चोरांसाठी लाभदायक

सुट्टीचे दिवस मुरूम चोरांसाठी लाभदायक

June 21, 2026
पत्रकारितेमध्ये परस्परांना बळ देणे गरजेचे : आ. सचिन कल्याणशेट्टी

पत्रकारितेमध्ये परस्परांना बळ देणे गरजेचे : आ. सचिन कल्याणशेट्टी

June 21, 2026
बोरगाव पोलीसांची दमदार कामगिरी

बोरगाव पोलीसांची दमदार कामगिरी

June 20, 2026
६१६ मतदार ठरविणार  सोलापूरचा आमदार !

६१६ मतदार ठरविणार सोलापूरचा आमदार !

June 17, 2026
पाणीटंचाईवर टँकरचा ‘तोडगा’ की नव्या ‘संकटा’ची भर?

पाणीटंचाईवर टँकरचा ‘तोडगा’ की नव्या ‘संकटा’ची भर?

June 17, 2026

June 16, 2026
अडसूळ सरांच्या भेटीने मुलांना मिळाली प्रेरणा

अडसूळ सरांच्या भेटीने मुलांना मिळाली प्रेरणा

June 16, 2026
उंटावरील मिरवणूकीने मुले भारावली.

उंटावरील मिरवणूकीने मुले भारावली.

June 16, 2026

राजकारण

No Content Available
Load More

वेबसाईट दर्शक