Wednesday, June 24, 2026
Navprabhatnews
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • क्राईम
  • कृषी
  • आरोग्य
No Result
View All Result
Navprabhatnews
No Result
View All Result

वैभव हत्तुरे यांना सत्तेची ” लाॅटरी “

संपादक-अमोगसिध्द मुंजे by संपादक-अमोगसिध्द मुंजे
February 18, 2026
in सोलापूर
0
वैभव हत्तुरे यांना सत्तेची ” लाॅटरी “
0
SHARES
239
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

राष्र्टवादी काॅंग्रेसचे हत्तुरे सत्तेत सहभागी

सोलापूर ....

सोलापूर महापालिकेत स्पष्ट बहुमत मिळवलेल्या भाजपने आता राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष (अजितदादा गट) यांनाही सत्तेत सहभागी करून घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे राष्ट्रवादीचे एकमेव निवडून आलेले नगरसेवक वैभव हत्तुरे हेही आता महापालिकेच्या सत्तेचा भाग असणार आहेत. त्यांना ही एकप्रकारे लॉटरी लागल्याचे बोलले जात आहे.
महापालिका निवडणुकीत भाजपने 87 नगरसेवक निवडून आणत एकहाती सत्ता मिळवली होती. तर राष्ट्रवादीकडून केवळ वैभव हत्तुरे हे एकमेव नगरसेवक निवडून आले होते. राज्याप्रमाणे सोलापुरातही भाजप आणि राष्ट्रवादी हे विरोधात लढले होते. मात्र निवडणुकीनंतर राज्य पातळीवर झालेल्या वरिष्ठ नेत्यांच्या बैठकीत सोलापूर विषयी चर्चा झाली. वरिष्ठ नेत्यांनी राष्ट्रवादीला सत्तेत सहभागी करून घेण्याचा निर्णय घेतला.
सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी रविवारी वैभव हत्तुरे यांना चर्चेसाठी आमंत्रित केले होते. या बैठकीत शहरातील विकासकामे, प्रलंबित प्रश्न तसेच निधी वाटपाबाबत सविस्तर चर्चा झाली. हत्तुरे यांना भाजप नगरसेवकां प्रमाणेच समान निधी देण्याचे तसेच सत्तेतील समित्यांमध्ये योग्य प्रतिनिधित्व देण्याचे आश्वासन पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी दिले. या निर्णयामुळे स्थायी समितीच्या निवड प्रक्रियेत वैभव हत्तुरे यांना यंदाच संधी मिळते की त्यांचा क्रमांक पुढील वर्षी लागतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

….
चौकट

…..
पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्याशी भेट झाली आहे. राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संतोष पवार यांच्याशी चर्चा झाली आहे. त्यांचे वरिष्ठ पातळीवर बोलणे झाले आहे. पालकमंत्र्यांनी राष्ट्रवादी सत्तेचा भाग असल्याचे सांगितले आहे.
 

वैभव हत्तुरे, नगरसेवक

Previous Post

आश्रमशाळेच्या विद्यार्थ्यांची भरारी

Next Post

शिवजयंतीमिनित्त अधिकारी व कर्मचार्‍यांची सोलापूरात निघणार पदयात्रा

संपादक-अमोगसिध्द मुंजे

संपादक-अमोगसिध्द मुंजे

Next Post
शिवजयंतीमिनित्त अधिकारी व कर्मचार्‍यांची सोलापूरात निघणार पदयात्रा

शिवजयंतीमिनित्त अधिकारी व कर्मचार्‍यांची सोलापूरात निघणार पदयात्रा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सुट्टीचे दिवस मुरूम चोरांसाठी लाभदायक

सुट्टीचे दिवस मुरूम चोरांसाठी लाभदायक

June 21, 2026
पत्रकारितेमध्ये परस्परांना बळ देणे गरजेचे : आ. सचिन कल्याणशेट्टी

पत्रकारितेमध्ये परस्परांना बळ देणे गरजेचे : आ. सचिन कल्याणशेट्टी

June 21, 2026
बोरगाव पोलीसांची दमदार कामगिरी

बोरगाव पोलीसांची दमदार कामगिरी

June 20, 2026
६१६ मतदार ठरविणार  सोलापूरचा आमदार !

६१६ मतदार ठरविणार सोलापूरचा आमदार !

June 17, 2026
पाणीटंचाईवर टँकरचा ‘तोडगा’ की नव्या ‘संकटा’ची भर?

पाणीटंचाईवर टँकरचा ‘तोडगा’ की नव्या ‘संकटा’ची भर?

June 17, 2026

June 16, 2026
अडसूळ सरांच्या भेटीने मुलांना मिळाली प्रेरणा

अडसूळ सरांच्या भेटीने मुलांना मिळाली प्रेरणा

June 16, 2026
उंटावरील मिरवणूकीने मुले भारावली.

उंटावरील मिरवणूकीने मुले भारावली.

June 16, 2026

राजकारण

No Content Available
Load More

वेबसाईट दर्शक