Sunday, March 22, 2026
Navprabhatnews
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • क्राईम
  • कृषी
  • आरोग्य
No Result
View All Result
Navprabhatnews
No Result
View All Result

विधानपरिषदेसाठी लिंगायत समाजाला संधी द्या

सुदिप चाकोते यांनी केली काॅंग्रेसच्या राष्र्टीय अध्यक्षांकडे मागणी

संपादक-अमोगसिध्द मुंजे by संपादक-अमोगसिध्द मुंजे
February 18, 2026
in सोलापूर
0
विधानपरिषदेसाठी लिंगायत समाजाला संधी द्या
0
SHARES
247
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

विधानपरिषदेसाठी वीरशैव लिंगायत युवा चेहरा म्हणून माझ्या नावाचा विचार व्हावा : सुदीप चाकोते.
आज दिल्ली येथे मल्लिकार्जुन खर्गे साहेबांची भेट घेऊन विधानपरिषदेसाठी मी इच्छुक असल्याची अधिकृत विनंती केली. यावेळी पक्ष संघटन, आगामी राजकीय दिशा आणि युवकांच्या भूमिकेबाबत सविस्तर चर्चा झाली.
पक्ष अत्यंत अडचणीच्या काळातून जात असताना गेल्या २५ वर्षांपासून मी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस ची विचारधारा लोकांपर्यंत पोहोचवण्याचे कार्य प्रामाणिकपणे केले आहे. युथ काँग्रेसचा अध्यक्ष असताना सोलापूर जिल्ह्यात युवकांची मोठी फळी उभी केली. संपूर्ण महाराष्ट्रभर तसेच दिल्लीमध्येही आंदोलनं केली; पोलिसी कारवाईला सामोरं जात अनेक गुन्हे अंगावर घेतले, तरीही पक्षाशी एकनिष्ठ राहिलो.
आज काँग्रेस सेवादल यंग ब्रिगेडच्या माध्यमातून युवकांना काँग्रेसची विचारधारा प्रशिक्षणाद्वारे संपूर्ण महाराष्ट्रभर पोहोचवत आहोत. प्रतिकूल परिस्थितीतही पक्षाशी तत्वनिष्ठ राहून काँग्रेस पुन्हा बळकट करण्यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू आहेत.
मी लिंगायत समाजाचा असून महाराष्ट्रात सव्वा कोटी ते दीड कोटी लिंगायत बांधव आहेत—विशेषतः पश्चिम महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर वास्तव्य आहे. सध्या मी अखिल भारतीय वीरशैव लिंगायत महासभेचा राष्ट्रीय उपाध्यक्ष म्हणून कार्यरत आहे.
जर विधानपरिषदेत युवक वीरशैव लिंगायत चेहरा म्हणून मला संधी मिळाली, तर संपूर्ण महाराष्ट्रातील लिंगायत समाजाला एका छत्राखाली संघटित करून २०२९ मध्ये पक्षाला निश्चितच मोठा राजकीय लाभ मिळवून देता येईल, असा विश्वास आहे.

 

__________________________________
*🛑नवभारत न्युज पोर्टल ला बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा*
*संपादक :- अमोगसिद्ध मुंजे*
*9423535294*

Previous Post

उद्यापासून मुस्लिम बांधवांच्या रमजान महिन्याला सुरूवात

Next Post

केंद्रसंचालकावर गुन्हा दाखल करण्याचे शिक्षणाधिकार्‍यांचे आदेश

संपादक-अमोगसिध्द मुंजे

संपादक-अमोगसिध्द मुंजे

Next Post
केंद्रसंचालकावर गुन्हा दाखल करण्याचे शिक्षणाधिकार्‍यांचे आदेश

केंद्रसंचालकावर गुन्हा दाखल करण्याचे शिक्षणाधिकार्‍यांचे आदेश

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

“या” गावात नववर्षाच्या स्वागताला ‘गुळ’ वाटण्याची प्रथा

“या” गावात नववर्षाच्या स्वागताला ‘गुळ’ वाटण्याची प्रथा

March 19, 2026
‘अध्यात्मिक इंटेलिजन्स’साठी मंद्रूपचे चिमुकले हरिपाठ, कीर्तनात

‘अध्यात्मिक इंटेलिजन्स’साठी मंद्रूपचे चिमुकले हरिपाठ, कीर्तनात

March 19, 2026
सांगलीमध्ये ‘मिशन लोटसला’ धक्का , मविआकडून महायुतीचा ‘करेक्ट कार्यक्रम’

सांगलीमध्ये ‘मिशन लोटसला’ धक्का , मविआकडून महायुतीचा ‘करेक्ट कार्यक्रम’

March 19, 2026
तात्या विंचू आणि गोरिला मंद्रूपमध्ये !

तात्या विंचू आणि गोरिला मंद्रूपमध्ये !

March 19, 2026
कारवाई होईपर्यंत उपोषणावर ठाम, २५ दिवसानंतरही प्रशासनाचे  आंदोलनाकडे दुर्लक्ष

अक्कलकोट गटशिक्षण अधिकारीवर कारवाई होईपर्यंत उपोषणावर सुरूच राहणार

March 18, 2026
९६ तासात गॅस सिलेंडर घरपोच मिळणार … जिल्हाधिकारी

९६ तासात गॅस सिलेंडर घरपोच मिळणार … जिल्हाधिकारी

March 18, 2026
दिपक वैद्य झेडपी अध्यक्ष तर  इंद्रजित पवार उपाध्यक्ष

दिपक वैद्य झेडपी अध्यक्ष तर इंद्रजित पवार उपाध्यक्ष

March 18, 2026
अक्कलकोटमध्ये गारांचा पाऊस

अक्कलकोटमध्ये गारांचा पाऊस

March 17, 2026

राजकारण

No Content Available
Load More

वेबसाईट दर्शक