Wednesday, June 24, 2026
Navprabhatnews
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • क्राईम
  • कृषी
  • आरोग्य
No Result
View All Result
Navprabhatnews
No Result
View All Result

केंद्रसंचालकावर गुन्हा दाखल करण्याचे शिक्षणाधिकार्‍यांचे आदेश

संपादक-अमोगसिध्द मुंजे by संपादक-अमोगसिध्द मुंजे
February 18, 2026
in सोलापूर
0
केंद्रसंचालकावर गुन्हा दाखल करण्याचे शिक्षणाधिकार्‍यांचे आदेश
0
SHARES
862
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

परीक्षा केंद्रात काॅफीकडे दुर्लक्ष 
सोलापूर: सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील माळीनगर येथील परीक्षा केंद्रावर बारावीच्या रसायनशास्त्र (Chemistry) पेपरदरम्यान कॉपीचे गैरप्रकार होत असल्याचे सीसीटीव्ही (CCTV) निरीक्षणातून समोर आले आहे. सोलापूर जिल्ह्यातील या गंभीर प्रकाराची दखल घेत सोलापूर जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी सचिन जगताप यांनी संबंधित परीक्षा केंद्राचे केंद्र संचालक तथा प्राचार्य कल्लप्पा बिराजदार यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. बुधवार, १८ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ११ ते २ या वेळेत उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ. १२ वी) परीक्षेचा रसायनशास्त्र विषयाचा पेपर होता. ‘दि मॉडेल विविधांगी प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालय, माळीनगर’ (केंद्र क्र. ४५४) येथील वर्ग खोली क्रमांक १३ मध्ये दुपारी १२:१८ वाजता काही विद्यार्थी कॉपी करत असल्याचे शिक्षण विभागाच्या नियंत्रण कक्षातील सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसून आले. तपासणीत ४-५ विद्यार्थ्यांकडे आढळली कॉपी : नियंत्रण कक्षातून तत्काळ केंद्र संचालक बिराजदार यांना फोनवरून याची माहिती देण्यात आली. त्यानंतर करण्यात आलेल्या प्रत्यक्ष तपासणीत ४ ते ५ विद्यार्थ्यांकडे कॉपीचे साहित्य मिळून आले. शासनाच्या ‘कॉपीमुक्त अभियान’ योजनेला हरताळ फासणारा हा प्रकार अत्यंत गंभीर असल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे.
…….
दोषींवर कडक कारवाईचे संकेत : याप्रकरणी कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवत शिक्षणाधिकारी सचिन जगताप यांनी गटशिक्षणाधिकारी (पंचायत समिती, माळशिरस) यांना पत्र लिहून केंद्र संचालकांवर गुन्हा दाखल करण्याचे आणि या घटनेचा सविस्तर अहवाल त्वरित सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. या कारवाईमुळे कॉपी बहाद्दरांचे आणि अशा प्रकारांना पाठीशी घालणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.

__________________________________
*🛑नवभारत न्युज पोर्टल ला बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा*
*संपादक :- अमोगसिद्ध मुंजे*
*9423535294*

Previous Post

विधानपरिषदेसाठी लिंगायत समाजाला संधी द्या

Next Post

शिवजयंतीनिमित्त ‘सावरकर वाचनालयाचा’ प्रेरणादायी उपक्रम

संपादक-अमोगसिध्द मुंजे

संपादक-अमोगसिध्द मुंजे

Next Post
शिवजयंतीनिमित्त ‘सावरकर वाचनालयाचा’ प्रेरणादायी उपक्रम

शिवजयंतीनिमित्त 'सावरकर वाचनालयाचा' प्रेरणादायी उपक्रम

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सुट्टीचे दिवस मुरूम चोरांसाठी लाभदायक

सुट्टीचे दिवस मुरूम चोरांसाठी लाभदायक

June 21, 2026
पत्रकारितेमध्ये परस्परांना बळ देणे गरजेचे : आ. सचिन कल्याणशेट्टी

पत्रकारितेमध्ये परस्परांना बळ देणे गरजेचे : आ. सचिन कल्याणशेट्टी

June 21, 2026
बोरगाव पोलीसांची दमदार कामगिरी

बोरगाव पोलीसांची दमदार कामगिरी

June 20, 2026
६१६ मतदार ठरविणार  सोलापूरचा आमदार !

६१६ मतदार ठरविणार सोलापूरचा आमदार !

June 17, 2026
पाणीटंचाईवर टँकरचा ‘तोडगा’ की नव्या ‘संकटा’ची भर?

पाणीटंचाईवर टँकरचा ‘तोडगा’ की नव्या ‘संकटा’ची भर?

June 17, 2026

June 16, 2026
अडसूळ सरांच्या भेटीने मुलांना मिळाली प्रेरणा

अडसूळ सरांच्या भेटीने मुलांना मिळाली प्रेरणा

June 16, 2026
उंटावरील मिरवणूकीने मुले भारावली.

उंटावरील मिरवणूकीने मुले भारावली.

June 16, 2026

राजकारण

No Content Available
Load More

वेबसाईट दर्शक