Tuesday, June 23, 2026
Navprabhatnews
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • क्राईम
  • कृषी
  • आरोग्य
No Result
View All Result
Navprabhatnews
No Result
View All Result

शिवजयंतीनिमित्त ‘सावरकर वाचनालयाचा’ प्रेरणादायी उपक्रम

संपादक-अमोगसिध्द मुंजे by संपादक-अमोगसिध्द मुंजे
February 19, 2026
in सोलापूर
0
शिवजयंतीनिमित्त ‘सावरकर वाचनालयाचा’ प्रेरणादायी उपक्रम
0
SHARES
54
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

ग्रंथभेटीतून शिवजयंतीचा संदेश

अक्कलकोट : तालुक्यातील हालहळ्ळी (अ.) येथील स्वातंत्र्यवीर सावरकर सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने संस्थापक अध्यक्ष गुरुनाथ गोविंदे यांच्या कल्पकतेतून छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती विद्यार्थ्यांना ग्रंथभेट देत उत्साहात साजरी करण्यात आली. देशभक्ती, वाचनसंस्कृती आणि इतिहासाची जाणीव या त्रिसूत्रीवर आधारित हा उपक्रम विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरला.
कार्यक्रमाच्या प्रारंभी ग्रामसेविका सरवळे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. अध्यक्षस्थानी सरपंच प्रकाश बिराजदार होते. यावेळी पोलीस पाटील मल्लिकार्जुन बिराजदार यांनी स्वा. विनायक दामोदर सावरकर यांच्या प्रतिमेस हार अर्पण करून अभिवादन केले. ‘वाचन संकल्प महाराष्ट्राचा’ या उपक्रमांतर्गत निरंतर वाचन केंद्रातील शालेय विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते ग्रंथभेट देण्यात आली. विद्यार्थ्यांनी वाचलेल्या पुस्तकावर आपल्या बोलीभाषेत अभिप्राय लिहून तो मराठी भाषा गौरव दिनी २७ फेब्रुवारीपर्यंत शाळेच्या मुख्याध्यापकांकडे सादर करावा, असे आवाहन करण्यात आले. शेख यांनी शिवरायांच्या पराक्रमाची व स्वराज्य स्थापनेची माहिती देत विद्यार्थ्यांमध्ये इतिहासाविषयी अभिमान जागवला. कार्यक्रमाच्या शेवटी यांनी उपस्थितांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली.

__________________________________
*🛑नवभारत न्युज पोर्टल ला बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा*
*संपादक :- अमोगसिद्ध मुंजे*
*9423535294*

 

Previous Post

केंद्रसंचालकावर गुन्हा दाखल करण्याचे शिक्षणाधिकार्‍यांचे आदेश

Next Post

दक्षिणिमधील पाणीटंचाई दूर होणार

संपादक-अमोगसिध्द मुंजे

संपादक-अमोगसिध्द मुंजे

Next Post
दक्षिणिमधील पाणीटंचाई दूर होणार

दक्षिणिमधील पाणीटंचाई दूर होणार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सुट्टीचे दिवस मुरूम चोरांसाठी लाभदायक

सुट्टीचे दिवस मुरूम चोरांसाठी लाभदायक

June 21, 2026
पत्रकारितेमध्ये परस्परांना बळ देणे गरजेचे : आ. सचिन कल्याणशेट्टी

पत्रकारितेमध्ये परस्परांना बळ देणे गरजेचे : आ. सचिन कल्याणशेट्टी

June 21, 2026
बोरगाव पोलीसांची दमदार कामगिरी

बोरगाव पोलीसांची दमदार कामगिरी

June 20, 2026
६१६ मतदार ठरविणार  सोलापूरचा आमदार !

६१६ मतदार ठरविणार सोलापूरचा आमदार !

June 17, 2026
पाणीटंचाईवर टँकरचा ‘तोडगा’ की नव्या ‘संकटा’ची भर?

पाणीटंचाईवर टँकरचा ‘तोडगा’ की नव्या ‘संकटा’ची भर?

June 17, 2026

June 16, 2026
अडसूळ सरांच्या भेटीने मुलांना मिळाली प्रेरणा

अडसूळ सरांच्या भेटीने मुलांना मिळाली प्रेरणा

June 16, 2026
उंटावरील मिरवणूकीने मुले भारावली.

उंटावरील मिरवणूकीने मुले भारावली.

June 16, 2026

राजकारण

No Content Available
Load More

वेबसाईट दर्शक