Monday, June 22, 2026
Navprabhatnews
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • क्राईम
  • कृषी
  • आरोग्य
No Result
View All Result
Navprabhatnews
No Result
View All Result

इस्त्राईल दौरा करून आलेल्या शेतकर्‍याचा सत्कार

संपादक-अमोगसिध्द मुंजे by संपादक-अमोगसिध्द मुंजे
February 23, 2026
in सोलापूर
0
इस्त्राईल दौरा करून आलेल्या शेतकर्‍याचा सत्कार
0
SHARES
132
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
शेतीच्या आधुनिकतेसाठी इस्राईल तंत्रज्ञान आवश्यक : गंगाधर बिराजदार
सोलापूर….
इस्राईल मध्ये संपूर्ण शेती स्वयंचलित ठिबक सिंचनावर केली जाते. सांडपाण्याचा वापर प्रक्रिया करून पुन्हा शेतीस वापरले जाते, जमिनीत ओलावा किती आहे, पिकांना कोणत्या अन्नद्रव्याची आवश्यकता आहे याचा डाटा रोजच्या रोज शेतकऱ्यांना मोबाईल वर मिळतात अशा प्रकारचे सेन्सर तेथील शेतीत वापरले जातात. पारंपारिक शेतीपेक्षा जागतिक बाजारपेठेत कोणत्या पिकास मागणी जास्त आहे ,अशी पिके लावली जातात व निर्यात केली जातात यामुळे मोठ्या प्रमाणात परकीय चलन शेतीउत्पादनातून देशाला प्राप्त होते. यामुळे इस्राईलमधील शेतकरी प्रगत वा आर्थिक समृद्ध आहे. याचे अनुकरण आपणही केले तर आपणही जागतिक प्रगत शेतकऱ्यांसोबत स्पर्धेत टिकणार आहे आणि तेंव्हाच आर्थिकदृष्ट्या सक्षम होणार आहे .असे गंगाधर बिराजदार यांनी सांगितले .
निंबर्गीचे प्रगतशील शेतकरी  गंगाधर बिराजदार हे महाराष्ट्र शासन कृषी विभाग मार्फत दिनांक ९ फेब्रुवारी  ते १९ फेब्रुवारी दरम्यान इस्राईल आंतरराष्ट्रीय शेतकरी अभ्यास दौरा यशस्वीरीत्या पूर्ण करून आल्याबद्दल मौजे निंबर्गी येथील सर्व शेतकरी व मित्रपरिवाराच्या वतीने स्वामी समर्थ सूत गिरणीचे संचालक शंकरराव पाटील व निंबर्गीचे सरपंच श्रीदीप हसापुरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी आपल्या मनोगतातून शंकरराव पाटील, श्रीदीप हसापुरे, भारत बिराजदार , निशांत लाडे यांनी बोलताना बिराजदार यांनी केलेल्या उल्लेखनीय शेती कार्याचा दाखला देत त्यांचे अभिनंदन केले.
यावेळी  बिराजदार यांनी इस्राईल शेती विषयक अनुभव उपस्थित सर्व शेतकऱ्यांना सांगत असताना इस्राईल शेती कोणत्या कारणाने प्रगत आहे याची अनेक उदाहरणे दिली .
 कार्यक्रमाचे प्रास्ताविक कल्याणी शिरगोंडे यांनी केले व सूत्रसंचालन कृषी सहायक अशोक राठोड यांनी व आभार प्रदर्शन उपसरपंच पिरसाब हवालदार यांनी केले .
यावेळी पंचायत समितीचे माजी सदस्य शशिकांत दुपारगुडे, माजी सरपंच भारत बिराजदार, माजी उपसरपंच चन्नप्पा बोरगी, मंडल कृषी अधिकारी किरण सांवत, रावसाहेब आळगी , इरेशा कोळी, विकास बिराजदार, सिद्धाराम हत्ताळे , राजेश गुडेलू  ,दीपक धारेराव,यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
__________________________________
*🛑नवभारत न्युज पोर्टल ला बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा*
*संपादक :- अमोगसिद्ध मुंजे*
*9423535294*
Previous Post

अवकाळी पावसाचा शेतकर्‍यांना दणका

Next Post

संत गाडगे महाराजांचे कार्य समाजासाठी दिशादर्शक

संपादक-अमोगसिध्द मुंजे

संपादक-अमोगसिध्द मुंजे

Next Post
संत गाडगे महाराजांचे कार्य समाजासाठी दिशादर्शक

संत गाडगे महाराजांचे कार्य समाजासाठी दिशादर्शक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सुट्टीचे दिवस मुरूम चोरांसाठी लाभदायक

सुट्टीचे दिवस मुरूम चोरांसाठी लाभदायक

June 21, 2026
पत्रकारितेमध्ये परस्परांना बळ देणे गरजेचे : आ. सचिन कल्याणशेट्टी

पत्रकारितेमध्ये परस्परांना बळ देणे गरजेचे : आ. सचिन कल्याणशेट्टी

June 21, 2026
बोरगाव पोलीसांची दमदार कामगिरी

बोरगाव पोलीसांची दमदार कामगिरी

June 20, 2026
६१६ मतदार ठरविणार  सोलापूरचा आमदार !

६१६ मतदार ठरविणार सोलापूरचा आमदार !

June 17, 2026
पाणीटंचाईवर टँकरचा ‘तोडगा’ की नव्या ‘संकटा’ची भर?

पाणीटंचाईवर टँकरचा ‘तोडगा’ की नव्या ‘संकटा’ची भर?

June 17, 2026

June 16, 2026
अडसूळ सरांच्या भेटीने मुलांना मिळाली प्रेरणा

अडसूळ सरांच्या भेटीने मुलांना मिळाली प्रेरणा

June 16, 2026
उंटावरील मिरवणूकीने मुले भारावली.

उंटावरील मिरवणूकीने मुले भारावली.

June 16, 2026

राजकारण

No Content Available
Load More

वेबसाईट दर्शक