Monday, June 22, 2026
Navprabhatnews
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • क्राईम
  • कृषी
  • आरोग्य
No Result
View All Result
Navprabhatnews
No Result
View All Result

गटशिक्षण अधिकार्‍यांना निलंबित करा

संपादक-अमोगसिध्द मुंजे by संपादक-अमोगसिध्द मुंजे
February 25, 2026
in सोलापूर
0
गटशिक्षण अधिकार्‍यांना निलंबित करा
0
SHARES
86
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
  1. मागासवर्गीय शिक्षक संघटनेच्या अध्यक्षांचे उपोषण

सोलापूर..

अक्कलकोट तालुका पंचायत समितीचे प्रभारी गटशिक्षणाधिकारी प्रशांत अरबाळे हे तालुक्यातील मागासवर्गीय शिक्षकांना जाणीवपूर्वक जातीय द्वेषातून मानसिक त्रास देत असल्याने मागासवर्गीय शिक्षक संघटनेकडून जिल्हा परिषद गेट समोर उपोषण सुरू करण्यात आले आहे. अक्कलकोटचे प्रभारी गट शिक्षण अधिकारी प्रशांत अरबाळे यांनी यापूर्वी मागासवर्गीय महिला शिक्षिका व मागासवर्गीय शिक्षक तपासणीच्या नावाखाली त्रास देण्याचे काम केला आहे . याबाबत वरिष्ठ पातळीवर तक्रार दाखल आहे . मागासवर्गीय शिक्षक महांतेश कट्टीमनी यांच्यावर आरोप करून खोटे रिपोर्ट देऊन त्रास देण्याचे काम करीत आहेत. याबाबत अनुसूचित जाती आयोग यांच्याकडे देखील तक्रार दाखल करण्यात आली  आहे.

अक्कलकोट तालुक्यामध्ये सप्टेंबर २०२४ मध्ये शिक्षकांची प्रतिनियुक्तीमध्ये नाराज झालेल्या शिक्षकांनी शिक्षक संघटनेकडे तक्रारी केली. तक्रारीची दखल घेऊन मुख्य कार्यकारी अधिकारी व शिक्षणाधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद सोलापूर यांच्याकडे मागासवर्गीय शिक्षक संघटना प्रतिनियुक्तीच्या चौकशीसाठी तक्रार केले.  त्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी त्रि सदस्य समिती चौकशीसाठी घटीत केले. त्या समितीचे अध्यक्ष म्हणून जिल्हा नियोजन शिक्षण वठारे  यांनी चौकशी केली. त्या चौकशीचे अहवाल मुख्य कार्यकारी अधिकारी यांना 16 जानेवारी 2025 रोजी सुपूर्द करण्यात आले. मुख्य कार्यकारी अधिकारी यांना चौकशी अहवाल सोपवून एक वर्ष पूर्ण झाले .त्या फायलीवर निर्णय घेऊन सुद्धा फाईल शिक्षण विभागाकडे पाठवण्यास एक वर्षापासून विलंब होत आहे . सदर प्रभारी गटशिक्षण अधिकारी यांनी शासनाला सुद्धा चुकीचे माहिती देऊन उपशिक्षण अधिकारी परीक्षा पास झाले होते. त्याची माहिती चौकशी केल्यानंतर चुकीचा आढळून आल्याने त्यांची नियुक्ती रद्द केले.  तसेच यांच्यावर महिला शिक्षिक यांच्या सुद्धा अनेक तक्रारी आहेत. ज्या शाळेत भेटीला जातात त्या शाळेतील शेरा बुक व आर्थिक व्यवहाराचे फाईल सोबत घेऊन येतात. दोन-तीन दिवसांनी परत देतात असे शिक्षकांमधून सांगण्यात येते.

गटशिक्षणाधिकारी म्हणून पदभार घेतल्यानंतर शाळांची गुणवत्ता ढासळले असून, शाळांच्या विकासासाठी विद्युत कनेक्शन , पाणी व्यवस्था व स्वच्छतागृह नादुरुस्त याकडे दुर्लक्ष करून  शिक्षकांना मानसिक त्रास देण्याकडे त्यांचे लक्ष आहे. अशा प्रभारी गटशिक्षणाधिकारी यांना निलंबित करून विभागीय चौकशी लावावे. अन्यथा पुढील आठवड्यात मुंबई मंत्रालयासमोर उपोषण करणार असल्याची माहिती अन्याय ग्रस्त शिक्षक महांतेश कट्टीमनी यांनी दिली.

….

सीईओंकडून निर्णय घेण्यास विलंब

..,,

महांतेश कट्ठीमनी यांनी अक्कलकोटचे प्रभारी गटशीक्षणाधिकारी प्रशांत अरबाळे यांच्याविरोधात एक वर्षापासून तक्रार करीत आहेत. याबाबत सीईओंकडे अनेक पुरावेही दिले आहेत. तरीही जिल्हा परीषदेचे सीईओ कुलदीप जंगम राजकीय दबावापोटी त्याकडे दुर्लक्ष करीत असल्याची चर्चा सुरू आहे.

 

 

__________________________________
*🛑नवभारत न्युज पोर्टल ला बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा*
*संपादक :- अमोगसिद्ध मुंजे*
*9423535294*

 

Previous Post

लोकशाही दिनाचे आयोजन

Next Post

युवकांच्या भवितव्याचा ध्यास घेतलेले मनोज राऊत यांचे प्रेरणादायी कार्य

संपादक-अमोगसिध्द मुंजे

संपादक-अमोगसिध्द मुंजे

Next Post
युवकांच्या भवितव्याचा ध्यास घेतलेले मनोज राऊत यांचे प्रेरणादायी कार्य

युवकांच्या भवितव्याचा ध्यास घेतलेले मनोज राऊत यांचे प्रेरणादायी कार्य

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सुट्टीचे दिवस मुरूम चोरांसाठी लाभदायक

सुट्टीचे दिवस मुरूम चोरांसाठी लाभदायक

June 21, 2026
पत्रकारितेमध्ये परस्परांना बळ देणे गरजेचे : आ. सचिन कल्याणशेट्टी

पत्रकारितेमध्ये परस्परांना बळ देणे गरजेचे : आ. सचिन कल्याणशेट्टी

June 21, 2026
बोरगाव पोलीसांची दमदार कामगिरी

बोरगाव पोलीसांची दमदार कामगिरी

June 20, 2026
६१६ मतदार ठरविणार  सोलापूरचा आमदार !

६१६ मतदार ठरविणार सोलापूरचा आमदार !

June 17, 2026
पाणीटंचाईवर टँकरचा ‘तोडगा’ की नव्या ‘संकटा’ची भर?

पाणीटंचाईवर टँकरचा ‘तोडगा’ की नव्या ‘संकटा’ची भर?

June 17, 2026

June 16, 2026
अडसूळ सरांच्या भेटीने मुलांना मिळाली प्रेरणा

अडसूळ सरांच्या भेटीने मुलांना मिळाली प्रेरणा

June 16, 2026
उंटावरील मिरवणूकीने मुले भारावली.

उंटावरील मिरवणूकीने मुले भारावली.

June 16, 2026

राजकारण

No Content Available
Load More

वेबसाईट दर्शक