Monday, June 22, 2026
Navprabhatnews
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • क्राईम
  • कृषी
  • आरोग्य
No Result
View All Result
Navprabhatnews
No Result
View All Result

युवकांच्या भवितव्याचा ध्यास घेतलेले मनोज राऊत यांचे प्रेरणादायी कार्य

संपादक-अमोगसिध्द मुंजे by संपादक-अमोगसिध्द मुंजे
February 26, 2026
in सोलापूर
0
युवकांच्या भवितव्याचा ध्यास घेतलेले मनोज राऊत यांचे प्रेरणादायी कार्य
0
SHARES
1.1k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सामाजिक बांधिलकीतून ‘घोटी’चा विकास साधणारे  डेप्युटी सिईओ मनोज राऊत

सोलापूर … गाव व गावातील समाजामुळे आपली सर्वत्र ओळख निर्माण झाली आहे. याची जाणिव ठेऊन शासकीय अधिकारी म्हणून काम करताना गाव व समाजाच्या विकासासाठी झटणारे अधिकारी क्वचितच मिळतात. शासकीय सेवा बजावत असताना वरिष्ठ अधिकार्‍यांचे दडपण व नवनवीन आदेशांची अंमलबजावणी करताना अधिकार्‍यांना ‘नाकीनऊ’ येते. त्यामुळे आजच्या धकाधकीच्या जगात स्वताच्या कुटुंबापलीकडे विचार न करणारी “स्वार्थी संस्कृती” निर्माण होत असताना स्वताच्या गावातील युवकांच्या भवितव्यासाठी झटणारे अधिकारी समाजात असल्यास निश्चितच त्या गावाचा व समाजाचा विकास होऊ शकतो. याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे उपमुख्य कार्यकारी अधिकारी व दक्षिण सोलापूर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी मनोज राऊत होय.

दृष्टी असलेला माणूस एखाद्या गावात असेल आणि त्यांने तशी कृती केली तर त्या गावाचं भविष्य कसं उजळू शकतं याचं उदाहरण म्हणजे घोटी गावामधील मनोज राऊत यांचे कार्य होय. गावामधील परंपरा जोपासण्यासाठी मनोज राऊत यांनी विविध सण, उत्सव व जयंती यामध्येही सहभागी होऊन समाजाशी जुळलेली नाळ कायम टिकवून ठेवल्याचे दिसून येते.


करमाळा तालुक्यामधील घोटी येथील रहिवासी असलेले व उपमुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कार्यरत असलेले मनोज राऊत स्वतः एमपीएससीच्या माध्यमातून क्लास वन अधिकारी झाले. शिक्षण पूर्ण करताना आलेले कटू अनुभव आणि स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी करावा लागणारा संघर्ष याची प्रचिती असल्याने मनोज राऊत यांनी गावमधील युवकांना असा संघर्ष करावा लागू नये व त्यांना स्पर्धा परीक्षांचे ज्ञान व्हावे म्हणून गावातच सुसज्ज वाचनालय व स्पर्धा परीक्षा अभ्यासिका  सुरू केली आहे. त्यांनी केवळ शासकीय सेवा बजावण्याऐवजी, गावातील युवकांच्या भवितव्याचा ध्यास घेतला आहे. स्पर्धा परीक्षेच्या प्रवासात स्वतःला जे अडथळे आले, तो त्रास पुढच्या पिढीला होऊ नये, यासाठी त्यांनी गावातच अभ्यासाची भक्कम पायाभरणी केली. सुरुवातीला पोलीस भरतीसाठी सुसज्ज अभ्यासिका उभारून युवकांना अभ्यासासाठी उत्तम वातावरण उपलब्ध करून दिलं. ही केवळ नावापुरती अभ्यासिका नसून, आधुनिक ग्रंथालय, शांत बैठक व्यवस्था आणि ए.सी. सारखी आवश्यक सुविधा असलेली आदर्श अभ्यासिका ठरली आहे. इतक्यावरच न थांबता, त्यांनी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून प्राथमिक शाळेतही एक अत्यंत सुंदर व सुसज्ज अभ्यासिका सुरू केली आहे. तसेच ‘घोटी’मध्ये गेल्यानंतर वडीलधारी व ज्येष्ठ मंडळींसोबत चर्चा करून गावाच्या विकासाबाबत योजनाही आखत असतात. ग्रामीण भागाशी नाळ जुळल्याने मित्रांसोबत गप्पाही सुरू असतात. या माध्यमातून सामाजिक बांधिलकी जोपासत ‘घोटी’ची नवी ओळख निर्माण केली आहे.

या उपक्रमामुळे प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांपासून ते एमपीएससी व यूपीएससी सारख्या स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांपर्यंत सर्वांना एकाच गावात  झोकून देऊन अभ्यास करण्याची संधी मिळाली असून, युवकांमध्ये नवचैतन्य निर्माण झालं आहे. त्यामुळे घोटी गावात शिक्षण, स्पर्धा परीक्षा आणि उज्ज्वल भवितव्याबाबत सकारात्मक वातावरण तयार झालं आहे. या उल्लेखनीय कार्यामुळे उपमुख्य कार्यकारी अधिकारी मनोज राऊत यांचं संपूर्ण तालुक्यातून कौतुक होत आहे.घोटीचा हा प्रयोग आज अनेक गावांसाठी व जिल्ह्यासाठी प्रेरणादायी ठरत आहे.

त्यामुळे क्लासवन अधिकारी व विविध शासकीय पदांची कामगिरी बजाविताना गावातील युवक व शिक्षणामधील अमूलाग्र बदलासाठी धोरणात्मक पाऊल उचलल्यास निश्चितच समाजाचा विकास होणार आहे. म्हणून डेप्युटी सिईओ मनोज राऊत यांचे युवक व गावाप्रती असलेली सामाजिक बांधिलकी कौतुकास पात्र आहे.

….

__________________________________
*🛑नवभारत न्युज पोर्टल ला बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा*
*संपादक :- अमोगसिद्ध मुंजे*
*9423535294*

….

Previous Post

गटशिक्षण अधिकार्‍यांना निलंबित करा

Next Post

पाणी व स्वच्छता कर्मचारी कृती समितीचे आंदोलनास यश

संपादक-अमोगसिध्द मुंजे

संपादक-अमोगसिध्द मुंजे

Next Post
पाणी व स्वच्छता कर्मचारी कृती समितीचे आंदोलनास यश

पाणी व स्वच्छता कर्मचारी कृती समितीचे आंदोलनास यश

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सुट्टीचे दिवस मुरूम चोरांसाठी लाभदायक

सुट्टीचे दिवस मुरूम चोरांसाठी लाभदायक

June 21, 2026
पत्रकारितेमध्ये परस्परांना बळ देणे गरजेचे : आ. सचिन कल्याणशेट्टी

पत्रकारितेमध्ये परस्परांना बळ देणे गरजेचे : आ. सचिन कल्याणशेट्टी

June 21, 2026
बोरगाव पोलीसांची दमदार कामगिरी

बोरगाव पोलीसांची दमदार कामगिरी

June 20, 2026
६१६ मतदार ठरविणार  सोलापूरचा आमदार !

६१६ मतदार ठरविणार सोलापूरचा आमदार !

June 17, 2026
पाणीटंचाईवर टँकरचा ‘तोडगा’ की नव्या ‘संकटा’ची भर?

पाणीटंचाईवर टँकरचा ‘तोडगा’ की नव्या ‘संकटा’ची भर?

June 17, 2026

June 16, 2026
अडसूळ सरांच्या भेटीने मुलांना मिळाली प्रेरणा

अडसूळ सरांच्या भेटीने मुलांना मिळाली प्रेरणा

June 16, 2026
उंटावरील मिरवणूकीने मुले भारावली.

उंटावरील मिरवणूकीने मुले भारावली.

June 16, 2026

राजकारण

No Content Available
Load More

वेबसाईट दर्शक