Monday, June 22, 2026
Navprabhatnews
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • क्राईम
  • कृषी
  • आरोग्य
No Result
View All Result
Navprabhatnews
No Result
View All Result

पाणी व स्वच्छता कर्मचारी कृती समितीचे आंदोलनास यश

संपादक-अमोगसिध्द मुंजे by संपादक-अमोगसिध्द मुंजे
February 26, 2026
in सोलापूर
0
पाणी व स्वच्छता कर्मचारी कृती समितीचे आंदोलनास यश
0
SHARES
13
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

स्वच्छ भारत मिशन व जलजीवन मिशन कर्मचारी यांचे वेतना साठी 5 कोटी रूपये निधी

सोलापूर – आझाद मैदानावर पाणी व स्वच्छता कर्मचारी यांनी आदोलन केले नंतर पाणी पुरवठा व स्वच्छता विभागांने स्वच्छ भारत मिशन( ग्रामीण) व जल जीवन मिशन या योजनेमध्ये काम करणारे जिल्हास्तरीय व तालुकास्तरीय कंत्राटी कर्मचारी यांचे वेतनासाठी ५ कोटी रूपसे निधी उपलब्ध करून दिला असल्याची माहिती राज्य कृती समितीचे कार्याध्यक्ष सचिन जाधव यांनी दिली.
पाणी पुरवठा व स्वच्छता शासकीय कर्मचारी राज्य कृती समितीने आझाद मैदानावर आंदोलन केले होते. शासन सेवेत कायम करणे बरोबर थकीत वेतन व इतर
विविध मागण्या करणेत आले होते. मुख्य सचिव राजेश आग्रवाल यांचे अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक झाली. या बैठकीस ग्रामविकास  विभागाचे सचिव, पाणी पुरवठा विभागाचे सचिव , अप्पर मुख्य सचिव वित्त विभाग, प्रधान सचिव नियोजन विभाग, अभियान संचालक जलजीवन मिशन, अभियान संचालक स्वच्छ भारत मिशन ग्रामीण उपस्थित होते. या बैठकीत
मुख्य सचिव यांचे बैठकीत न्यायप्रविष्ठ असलेले व न्यायालयाने निवाडे दिलेले कंत्राटी कर्मचारी यांचे बाबत शासन सेवेत कायम करणे साठी समिती गठित करणेचा शासन निर्णय काढणेत आला आहे. यामुळे राज्य कृती समितीचे प्रयत्नात यश आले आहे. असेही कार्याध्यक्ष सचिन जाधव, उपाध्यक्ष ऋषीकेश शिलवंत यांनी सांगितले.
प्रधान सचिव पराग जैन-नैनुटीया यांचे अध्यक्षतेखाली बैठक घेणेत आली होती. राज्य पाणी व स्वच्छता शासकीय कंत्राटी कर्मचारी राज्य कृती समितीचे अध्यक्ष रमाकांत गायकवाड, कार्याध्यक्ष सचिन जाधव, उपाध्यक्ष ऋषिकेश शीलवंत, उपाध्यक्ष बंडू हिवरे, सचिन थोरात, गणेश चव्हाण, निखील रौदाळकर, निवृत्ती शेडगे,नागपूर बीआरसी संघटनेचे प्रविण तेलतुंबडे, वाॅश व पीएमयू चे मोक्षदा बारसकर यांचे उपस्थितीत बैठक झाली होती. या बैठकीत विभागाचे कर्मचारी यांचे ९ मागण्या बाबत समिती गठीत करणेचा निर्णय घेणेत आला आहे.
कृती समितीने जल जीवन मिशन, स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) , जिल्हास्तर कर्मचारी, बीआरसी सीआरसी व वाॅश पीएमयु अंतर्गत कर्मचारी यांचे वेतनासाठी आग्रही राहिली. आकृतीबंध व मॅचचे निर्णयानुसार कायम करणेची मागणी करणेत आली. आज सहसचिव नेत्रा मानकामे यांनी मंत्रालयातून तात्काळ लेखी आदेश दिला. वासोचे अभियान संचालक शेखर रौंदाळ यांनी दोन तासांत निधी वितरण आदेश देऊन कर्मचारी यांचे भावना व मागण्या जाणून घेतल्या. येत्या आठवड्यात मा प्रधान सचिव यांचे बैठक घेऊन समिती गठीत करणेत येत असल्याचे सांगितले. मंत्रालयीन अधिकारी जयकर यांनी विशेष सहकार्य केले.

 

__________________________________
*🛑नवभारत न्युज पोर्टल ला बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा*
*संपादक :- अमोगसिद्ध मुंजे*
*9423535294*

Previous Post

युवकांच्या भवितव्याचा ध्यास घेतलेले मनोज राऊत यांचे प्रेरणादायी कार्य

Next Post

विद्यार्थ्यांसाठी खासदार प्रणितीताईंनी घेतला पुढाकार

संपादक-अमोगसिध्द मुंजे

संपादक-अमोगसिध्द मुंजे

Next Post
विद्यार्थ्यांसाठी खासदार प्रणितीताईंनी घेतला पुढाकार

विद्यार्थ्यांसाठी खासदार प्रणितीताईंनी घेतला पुढाकार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सुट्टीचे दिवस मुरूम चोरांसाठी लाभदायक

सुट्टीचे दिवस मुरूम चोरांसाठी लाभदायक

June 21, 2026
पत्रकारितेमध्ये परस्परांना बळ देणे गरजेचे : आ. सचिन कल्याणशेट्टी

पत्रकारितेमध्ये परस्परांना बळ देणे गरजेचे : आ. सचिन कल्याणशेट्टी

June 21, 2026
बोरगाव पोलीसांची दमदार कामगिरी

बोरगाव पोलीसांची दमदार कामगिरी

June 20, 2026
६१६ मतदार ठरविणार  सोलापूरचा आमदार !

६१६ मतदार ठरविणार सोलापूरचा आमदार !

June 17, 2026
पाणीटंचाईवर टँकरचा ‘तोडगा’ की नव्या ‘संकटा’ची भर?

पाणीटंचाईवर टँकरचा ‘तोडगा’ की नव्या ‘संकटा’ची भर?

June 17, 2026

June 16, 2026
अडसूळ सरांच्या भेटीने मुलांना मिळाली प्रेरणा

अडसूळ सरांच्या भेटीने मुलांना मिळाली प्रेरणा

June 16, 2026
उंटावरील मिरवणूकीने मुले भारावली.

उंटावरील मिरवणूकीने मुले भारावली.

June 16, 2026

राजकारण

No Content Available
Load More

वेबसाईट दर्शक