Sunday, June 21, 2026
Navprabhatnews
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • क्राईम
  • कृषी
  • आरोग्य
No Result
View All Result
Navprabhatnews
No Result
View All Result

घरकुलसाठी पाच ब्रास मोफत वाळू मिळणार

संपादक-अमोगसिध्द मुंजे by संपादक-अमोगसिध्द मुंजे
February 27, 2026
in सोलापूर
0
घरकुलसाठी पाच ब्रास मोफत वाळू मिळणार
0
SHARES
18
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांचे घरकुल लाभार्थ्यांसाठी दिलासादायक निर्णय

सोलापूर,
सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील घरकुल बांधणीस गती देण्यासाठी सोलापूर जिल्हा प्रशासनाकडून महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात येत आहेत. प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत पात्र लाभार्थ्यांना पाच ब्रास मोफत वाळू उपलब्ध करून देण्यात येणार असून यासाठी ग्रामविकास अधिकार्‍यांकडून घरकुल बांधकाम तपासणी करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी दिली.
शासनाच्या या निर्णयामुळे घरकुल लाभार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. मोफत वाळू वितरणाच्या या उपक्रमामुळे घरकुल बांधणीला वेग आला असून, ‘घरकुलाचे स्वप्न’ साकार होण्याचा मार्ग अधिक सुकर झाला आहे.

घरकुल बांधणी करताना वाळूचा खर्च हा ग्रामीण कुटुंबांसाठी मोठा आर्थिक बोजा ठरतो.
घरकुल बांधकाम प्रत्यक्ष सुरू असल्याची खात्री करूनच वाळूचे वाटप करण्यात येते. यामुळे अपात्र लाभार्थ्यांकडे वाळू वळवली जाणार नाही, याची दक्षता घेतली जात आहे. या प्रक्रियेत कोणतीही गैरसोय होऊ नये, यासाठी स्थानिक प्रशासन, महसूल विभाग आणि ग्रामपंचायत स्तरावर समन्वय साधला जात आहे. ज्या लाभार्थ्यांना वाळू वितरण करावयाची आहे त्यांना यापूर्वीच वाळू देण्यासंबंधीचे सूचना दिल्या जातात. त्यानुसार त्यांची यादी तयार करून लाभार्थ्यांची सर्व कागदपत्रे एकत्रित करून त्यांच्या मोबाईलवर ओटीपी पाठवला जातो. ओटीपी तपासणी झाल्यानंतर संबंधित लाभार्थ्याच्या नावाने पाच ब्रास पैकी दोन ब्रास व त्यानंतर तीन ब्रास अशाटप्प्याटप्प्याने प्रत्येक लाभार्थ्यांना पाच ब्रास वाळूचे मोफत वितरण केले जात आहे. आत्तापर्यंत ६५३ लाभार्थ्यांना १८०० ब्रास वाळू वितरण झाले असून, त्या पद्धतीने घरकुलाचे कामकाज सुरू असल्याचेही जंगम यांनी सांगितले.

__________________________________
*🛑नवप्रभात न्युज पोर्टल ला बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा*
*संपादक :- अमोगसिद्ध मुंजे*
*9423535294*

Previous Post

एक मार्चनंतर अवैद्य प्रवासी वाहतूक बंद होणार

Next Post

सोलापूरच्या शिरपेचात मानाचा तुरा

संपादक-अमोगसिध्द मुंजे

संपादक-अमोगसिध्द मुंजे

Next Post
सोलापूरच्या शिरपेचात मानाचा तुरा

सोलापूरच्या शिरपेचात मानाचा तुरा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सुट्टीचे दिवस मुरूम चोरांसाठी लाभदायक

सुट्टीचे दिवस मुरूम चोरांसाठी लाभदायक

June 21, 2026
पत्रकारितेमध्ये परस्परांना बळ देणे गरजेचे : आ. सचिन कल्याणशेट्टी

पत्रकारितेमध्ये परस्परांना बळ देणे गरजेचे : आ. सचिन कल्याणशेट्टी

June 21, 2026
बोरगाव पोलीसांची दमदार कामगिरी

बोरगाव पोलीसांची दमदार कामगिरी

June 20, 2026
६१६ मतदार ठरविणार  सोलापूरचा आमदार !

६१६ मतदार ठरविणार सोलापूरचा आमदार !

June 17, 2026
पाणीटंचाईवर टँकरचा ‘तोडगा’ की नव्या ‘संकटा’ची भर?

पाणीटंचाईवर टँकरचा ‘तोडगा’ की नव्या ‘संकटा’ची भर?

June 17, 2026

June 16, 2026
अडसूळ सरांच्या भेटीने मुलांना मिळाली प्रेरणा

अडसूळ सरांच्या भेटीने मुलांना मिळाली प्रेरणा

June 16, 2026
उंटावरील मिरवणूकीने मुले भारावली.

उंटावरील मिरवणूकीने मुले भारावली.

June 16, 2026

राजकारण

No Content Available
Load More

वेबसाईट दर्शक