Sunday, June 21, 2026
Navprabhatnews
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • क्राईम
  • कृषी
  • आरोग्य
No Result
View All Result
Navprabhatnews
No Result
View All Result

नागरीकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये

संपादक-अमोगसिध्द मुंजे by संपादक-अमोगसिध्द मुंजे
March 4, 2026
in सोलापूर
0
नागरीकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये
0
SHARES
29
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

जिल्ह्यात पेट्रोल-डिझेल व गॅसचा पुरेसा साठा, नागरीकांनी अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन

सोलापूर,…

सोलापूर जिल्ह्यात पेट्रोल-डिझेलचा कोणताही तुटवडा निर्माण होणार नाही, याबाबत जिल्हा प्रशासनाने ठोस उपाययोजना केल्या आहेत. जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या निर्देशानुसार आज जिल्हा पुरवठा अधिकारी संतोष सरडे यांनी Indian Oil Corporation Limited (IOCL), Bharat Petroleum Corporation Limited (BPCL) व Hindustan Petroleum Corporation Limited (HPCL) या तीनही तेल कंपन्यांच्या सेल्स ऑफिसर्सची तातडीची बैठक घेऊन इंधन साठा व पुरवठा याबाबत सविस्तर आढावा घेतला. व सोलापूर जिल्ह्यातील नागरिकांनी इंधन पुरवठ्याच्या अनुषंगाने कोणत्याही अफवावर विश्वास ठेवू नये. जिल्ह्यात इंधनाचा पुरेसा साठा उपलब्ध असल्याचे सांगितले.

पाकणी डेपो येथील तिन्ही कंपन्यांच्या ऑइल डेपो मॅनेजर्ससोबत चर्चा करून डिझेल-पेट्रोल साठ्याची स्थिती व इंधन वितरणाची तयारी याची खात्री करण्यात आली. तसेच जिल्ह्यात कुठेही तुटवडा भासणार नाही, याबाबत संबंधित कंपन्यांकडून लेखी आश्वासनही प्रशासनाने घेतले आहे.

जिल्हा पुरवठा अधिकारी सरडे यांनी नागरिकांना आवाहन केले की, आपल्या वाहनासाठी आवश्यक तेवढेच पेट्रोल-डिझेल भरावे. अतिरिक्त साठा करून कृत्रिम टंचाई निर्माण होणार नाही, याची दक्षता घ्यावी. अफवांवर विश्वास न ठेवता प्रशासनास सहकार्य करावे. दरम्यान, सर्व पेट्रोल-डिझेल वितरकांना आवश्यक तेवढाच पुरवठा करण्याच्या सक्त सूचना देण्यात आल्या आहेत. काही ठिकाणी ड्रममधून इंधन वितरण होत असल्याच्या तक्रारी आढळल्यास संबंधितांवर तात्काळ कारवाई करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे.

शासकीय वाहनांसाठी आवश्यक राखीव साठा ठेवण्याच्या सूचना कंपन्यांच्या सेल्स ऑफिसर्सना देण्यात आल्या आहेत. याशिवाय, जिल्ह्यात एलपीजी गॅसचाही कोणताही तुटवडा नसल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले असून गॅस कंपन्यांच्या अधिकाऱ्यांसोबतही याबाबत आढावा घेण्यात आला आहे.

“सोलापूर जिल्ह्यात इंधन व गॅसचा पुरेसा साठा उपलब्ध असून कोणत्याही परिस्थितीत तुटवडा होऊ देणार नाही. नागरिकांनी अफवांना बळी न पडता प्रशासनावर विश्वास ठेवावा,” असे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी संतोष सरडे यांनी केले आहे.

__________________________________
*🛑नवप्रभात न्युज पोर्टल ला बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा*
*संपादक :- अमोगसिद्ध मुंजे*
*9423535294*

Previous Post

तीन लाख “गांजा”ची शेती उध्दवस्त

Next Post

डाॅ. मंदाकीनी आमटे पहिल्या “अहिल्यारत्न पुरस्कारा”चे मानकरी

संपादक-अमोगसिध्द मुंजे

संपादक-अमोगसिध्द मुंजे

Next Post
डाॅ. मंदाकीनी आमटे पहिल्या “अहिल्यारत्न पुरस्कारा”चे मानकरी

डाॅ. मंदाकीनी आमटे पहिल्या "अहिल्यारत्न पुरस्कारा"चे मानकरी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

बोरगाव पोलीसांची दमदार कामगिरी

बोरगाव पोलीसांची दमदार कामगिरी

June 20, 2026
६१६ मतदार ठरविणार  सोलापूरचा आमदार !

६१६ मतदार ठरविणार सोलापूरचा आमदार !

June 17, 2026
पाणीटंचाईवर टँकरचा ‘तोडगा’ की नव्या ‘संकटा’ची भर?

पाणीटंचाईवर टँकरचा ‘तोडगा’ की नव्या ‘संकटा’ची भर?

June 17, 2026

June 16, 2026
अडसूळ सरांच्या भेटीने मुलांना मिळाली प्रेरणा

अडसूळ सरांच्या भेटीने मुलांना मिळाली प्रेरणा

June 16, 2026
उंटावरील मिरवणूकीने मुले भारावली.

उंटावरील मिरवणूकीने मुले भारावली.

June 16, 2026
स्वातंत्र्य लढ्याला बळ देणार्‍या वंदे मातरमचा इतिहास प्रेरक – सिध्दाराम पाटील

स्वातंत्र्य लढ्याला बळ देणार्‍या वंदे मातरमचा इतिहास प्रेरक – सिध्दाराम पाटील

June 15, 2026
विहिरीत टेम्पो कोसळून १४ भाविकांचा मृत्यू

विहिरीत टेम्पो कोसळून १४ भाविकांचा मृत्यू

June 14, 2026

राजकारण

No Content Available
Load More

वेबसाईट दर्शक