Sunday, June 21, 2026
Navprabhatnews
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • क्राईम
  • कृषी
  • आरोग्य
No Result
View All Result
Navprabhatnews
No Result
View All Result

डाॅ. मंदाकीनी आमटे पहिल्या “अहिल्यारत्न पुरस्कारा”चे मानकरी

संपादक-अमोगसिध्द मुंजे by संपादक-अमोगसिध्द मुंजे
March 5, 2026
in सोलापूर
0
डाॅ. मंदाकीनी आमटे पहिल्या “अहिल्यारत्न पुरस्कारा”चे मानकरी
0
SHARES
27
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर विद्यापीठाचा ‘अहिल्यारत्न पुरस्कार’ ज्येष्ठ समाजसेविका डॉ. मंदाकिनी आमटे यांना जाहीर

सोलापूर, – पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या सातव्या नामविस्तार दिनानिमित्त शुक्रवार, दि. ६ मार्च २०२६ रोजी विविध शैक्षणिक, सांस्कृतिक व सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले असून, यंदाचे वर्ष पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंती वर्ष म्हणून साजरे करण्यात येत आहे. या औचित्याने प्रदान करण्यात येणारा मानाचा ‘अहिल्यारत्न पुरस्कार’ ज्येष्ठ समाजसेविका डॉ. मंदाकिनी प्रकाश आमटे यांना जाहीर करण्यात आल्याची घोषणा कुलगुरू डॉ. प्रकाश महानवर यांनी आज पत्रकार परिषदेत केली.

डॉ. मंदाकिनी आमटे यांनी दुर्गम व आदिवासी भागातील आरोग्य, शिक्षण व मानवसेवेच्या क्षेत्रात केलेले कार्य अत्यंत प्रेरणादायी असून, समाजातील वंचित घटकांसाठी त्यांनी आयुष्य अर्पण केले आहे. त्यांच्या कार्याची दखल घेत विद्यापीठाच्यावतीने त्यांना ‘अहिल्यारत्न पुरस्कार’ देऊन गौरविण्यात येणार आहे. या पुरस्कारामध्ये सन्मानचिन्ह, शाल, श्रीफळ व रोख रक्कम ५१ हजार रुपये असे स्वरूप असणार आहे. अहिल्यारत्न पुरस्काराचे हे पहिलेच वर्ष आहे.

नामविस्तार दिनानिमित्त आयोजित मुख्य सोहळा शुक्रवारी सकाळी ११ वाजता विद्यापीठाच्या मुख्य सभागृहात होणार आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. प्रकाश महानवर असतील. प्रमुख अतिथी म्हणून यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नाशिकचे कुलगुरू प्रा. डॉ. संजीव सोनवणे उपस्थित राहणार आहेत. विशेष उपस्थिती म्हणून पद्मश्री डॉ. प्रकाश बाबा आमटे यांची उपस्थिती लाभणार आहे. प्र-कुलगुरू प्रा. लक्ष्मीकांत दामा, प्रभारी कुलसचिव डॉ. अतुल लकडे, अहिल्यादेवी होळकर अध्यासन केंद्राचे संचालक डॉ. प्रभाकर कोळेकर यांचीही प्रमुख उपस्थिती राहणार आहे.

विद्यापीठाच्या वतीने सर्व मान्यवर, विद्यार्थी, प्राध्यापक, कर्मचारी, माजी विद्यार्थी व नागरिकांना या समारंभास उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या पत्रकार परिषदेस प्रभारी कुलसचिव डॉ. अतुल लकडे, डॉ. प्रभाकर कोळेकर, डॉ. राजेंद्र वडजे, डॉ. केदारनाथ काळवणे, जनसंपर्क अधिकारी राहुल वंजारे, डॉ. अंबादास भासके आदी उपस्थित होते.

__________________________________
*🛑नवप्रभात न्युज पोर्टल ला बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा*
*संपादक :- अमोगसिद्ध मुंजे*
*9423535294*

 

Previous Post

नागरीकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये

Next Post

तरूणांनी “या” संदेशाचे जरूर विचार करावे

संपादक-अमोगसिध्द मुंजे

संपादक-अमोगसिध्द मुंजे

Next Post
तरूणांनी “या” संदेशाचे जरूर विचार करावे

तरूणांनी "या" संदेशाचे जरूर विचार करावे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

बोरगाव पोलीसांची दमदार कामगिरी

बोरगाव पोलीसांची दमदार कामगिरी

June 20, 2026
६१६ मतदार ठरविणार  सोलापूरचा आमदार !

६१६ मतदार ठरविणार सोलापूरचा आमदार !

June 17, 2026
पाणीटंचाईवर टँकरचा ‘तोडगा’ की नव्या ‘संकटा’ची भर?

पाणीटंचाईवर टँकरचा ‘तोडगा’ की नव्या ‘संकटा’ची भर?

June 17, 2026

June 16, 2026
अडसूळ सरांच्या भेटीने मुलांना मिळाली प्रेरणा

अडसूळ सरांच्या भेटीने मुलांना मिळाली प्रेरणा

June 16, 2026
उंटावरील मिरवणूकीने मुले भारावली.

उंटावरील मिरवणूकीने मुले भारावली.

June 16, 2026
स्वातंत्र्य लढ्याला बळ देणार्‍या वंदे मातरमचा इतिहास प्रेरक – सिध्दाराम पाटील

स्वातंत्र्य लढ्याला बळ देणार्‍या वंदे मातरमचा इतिहास प्रेरक – सिध्दाराम पाटील

June 15, 2026
विहिरीत टेम्पो कोसळून १४ भाविकांचा मृत्यू

विहिरीत टेम्पो कोसळून १४ भाविकांचा मृत्यू

June 14, 2026

राजकारण

No Content Available
Load More

वेबसाईट दर्शक