Sunday, June 21, 2026
Navprabhatnews
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • क्राईम
  • कृषी
  • आरोग्य
No Result
View All Result
Navprabhatnews
No Result
View All Result

सोलापूरच्या सांस्कृतिक चळवळीला चालना मिळणार

संपादक-अमोगसिध्द मुंजे by संपादक-अमोगसिध्द मुंजे
March 7, 2026
in सोलापूर
0
सोलापूरच्या सांस्कृतिक चळवळीला चालना मिळणार
0
SHARES
32
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

जुळे सोलापूरात नाट्यगृह होणार आमदार सुभाष देशमुख यांची माहीती 

सोलापूर : जुळे सोलापुरात नाट्यगृह उभारण्याच्या दृष्टीने महत्त्वाची घडामोड घडली असून आरटीओ कार्यालयाजवळ महापालिकेची सुमारे दीड एकर जागा उपलब्ध झाल्याने नाट्यगृह उभारणीचा मार्ग मोकळा झाला आहे. ही माहिती आमदार सुभाष देशमुख यांनी दिली.
गेल्या सात ते आठ वर्षांपासून जुळे सोलापुरात नाट्यगृह उभारण्याची मागणी नागरिकांकडून होत होती. या मागणीच्या पार्श्वभूमीवर आमदार देशमुख योग्य जागेच्या शोधात होते. मात्र आतापर्यंत योग्य जागा उपलब्ध होत नव्हती. आता आरटीओ कार्यालयाजवळ महापालिकेची सुमारे दीड एकर जागा उपलब्ध असल्याचे समोर आले आहे. या ठिकाणी आधुनिक व सुसज्ज नाट्यगृह उभारता येऊ शकते, असे आमदार देशमुख यांनी सांगितले.                    दरम्यान, दिनांक २१ मार्च रोजी  सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार सोलापूर दौऱ्यावर येत असून त्यांना ही जागा दाखवून नाट्यगृह उभारण्यासाठी मंजुरी देण्याची मागणी करण्यात येणार आहे.
जुळे सोलापुरातील नागरिक, नाट्यरसिक व सांस्कृतिक क्षेत्रातील व्यक्तींनी अनेक वर्षांपासून नाट्यगृहाची मागणी केली होती. त्यामुळे या ठिकाणी नाट्यगृह उभारण्यास मंजुरी मिळाल्यास सोलापूरच्या सांस्कृतिक चळवळीला मोठी चालना मिळणार असल्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

 

__________________________________
*🛑नवप्रभात न्युज पोर्टल ला बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा*
*संपादक :- अमोगसिद्ध मुंजे*
*9423535294*

Previous Post

आदिवासी समाजातील परीवर्तन हीच माझी “एनर्जी”

Next Post

“समाधान शिबिरा”मधून लाभार्थ्यांचे समाधान

संपादक-अमोगसिध्द मुंजे

संपादक-अमोगसिध्द मुंजे

Next Post
“समाधान शिबिरा”मधून लाभार्थ्यांचे समाधान

"समाधान शिबिरा"मधून लाभार्थ्यांचे समाधान

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

बोरगाव पोलीसांची दमदार कामगिरी

बोरगाव पोलीसांची दमदार कामगिरी

June 20, 2026
६१६ मतदार ठरविणार  सोलापूरचा आमदार !

६१६ मतदार ठरविणार सोलापूरचा आमदार !

June 17, 2026
पाणीटंचाईवर टँकरचा ‘तोडगा’ की नव्या ‘संकटा’ची भर?

पाणीटंचाईवर टँकरचा ‘तोडगा’ की नव्या ‘संकटा’ची भर?

June 17, 2026

June 16, 2026
अडसूळ सरांच्या भेटीने मुलांना मिळाली प्रेरणा

अडसूळ सरांच्या भेटीने मुलांना मिळाली प्रेरणा

June 16, 2026
उंटावरील मिरवणूकीने मुले भारावली.

उंटावरील मिरवणूकीने मुले भारावली.

June 16, 2026
स्वातंत्र्य लढ्याला बळ देणार्‍या वंदे मातरमचा इतिहास प्रेरक – सिध्दाराम पाटील

स्वातंत्र्य लढ्याला बळ देणार्‍या वंदे मातरमचा इतिहास प्रेरक – सिध्दाराम पाटील

June 15, 2026
विहिरीत टेम्पो कोसळून १४ भाविकांचा मृत्यू

विहिरीत टेम्पो कोसळून १४ भाविकांचा मृत्यू

June 14, 2026

राजकारण

No Content Available
Load More

वेबसाईट दर्शक