Saturday, June 20, 2026
Navprabhatnews
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • क्राईम
  • कृषी
  • आरोग्य
No Result
View All Result
Navprabhatnews
No Result
View All Result

शुक्रवारी मिळणार पीएम सन्मान निधीचा २२ वा हप्ता

संपादक-अमोगसिध्द मुंजे by संपादक-अमोगसिध्द मुंजे
March 11, 2026
in सोलापूर
0
शुक्रवारी मिळणार पीएम सन्मान निधीचा २२ वा हप्ता
0
SHARES
52
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा 22 वा हप्ता 13 मार्च रोजी वितरीत होणार

सोलापूर : केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (पी. एम. किसान) योजनेअंतर्गत डिसेंबर 2025 ते मार्च 2026 या कालावधीतील 22 वा हप्ता प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दिनांक 13 मार्च 2026 रोजी सायंकाळी 5.00 वाजता ज्योती-बिष्णु आंतरराष्ट्रीय सांस्कृतिक केंद्र, खानापारा, गुवाहाटी (आसाम) येथे वितरित करण्यात येणार आहे.
केंद्र शासनाने शेतकऱ्यांना निश्चित उत्पन्नाचा आधार मिळावा यासाठी ही योजना फेब्रुवारी 2019 पासून सुरू केली आहे. योजनेनुसार पात्र शेतकरी कुटुंबांना प्रतिवर्षी रु. 6,000 इतकी आर्थिक मदत तीन समान हप्त्यांमध्ये (प्रति हप्ता रु. 2,000) त्यांच्या आधार संलग्न बँक खात्यात थेट जमा केली जाते. आतापर्यंत राज्यातील पात्र शेतकरी कुटुंबांना 21 हप्त्यांद्वारे सुमारे रु. 39,300 कोटींचा लाभ वितरित झाला आहे.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी भूमी अभिलेख नोंदणी अद्ययावत करणे, बँक खाते आधारशी संलग्न करणे तसेच ई-केवायसी प्रमाणीकरण करणे बंधनकारक आहे. सद्यस्थितीत या तिन्ही बाबींची पूर्तता केलेल्या सुमारे 91.19 लाख शेतकरी कुटुंबांना दिनांक 13 मार्च रोजी सुमारे रु. 1,837 कोटी इतकी रक्कम थेट हस्तांतरणाद्वारे जमा होणार आहे.

सदर कार्यक्रमाचे आयोजन राज्यातील कृषी विज्ञान केंद्र, जिल्हा, तालुका व ग्रामपंचायत स्तरावर तसेच कृषी उत्पन्न बाजार समिती, शासकीय कार्यालये, संशोधन केंद्रे, शेतकरी उत्पादक कंपनी (FPCs), शेतकरी उत्पादक संघटना (FPOs) आणि सहकारी पतसंस्था (PACS) येथे करण्यात येणार आहे. नागरी सुविधा केंद्रांवरूनही या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण पाहता येणार आहे.
राज्यातील कृषी विभाग, महसूल व वने विभाग तसेच ग्रामविकास विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने हा समारोह साजरा होणार असून कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण https://pmindiawebcast.nic.in या संकेतस्थळावरून करण्यात येईल. राज्यातील जास्तीत जास्त शेतकरी बांधवांनी या कार्यक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन पुणे येथील कृषी आयुक्तालयाचे कृषी संचालक (विस्तार व प्रशिक्षण) रफिक नाईकवाडी यांनी केले आहे.

__________________________________
*🛑नवप्रभात न्युज पोर्टल ला बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा*
*संपादक :- अमोगसिद्ध मुंजे*
*9423535294*

Previous Post

उत्तुंग यश मिळवून नावलौकीक वाढवा.

Next Post

कोरवली शाळेचा ११७ वा वाढदिवस साजरा

संपादक-अमोगसिध्द मुंजे

संपादक-अमोगसिध्द मुंजे

Next Post
कोरवली शाळेचा ११७ वा वाढदिवस साजरा

कोरवली शाळेचा ११७ वा वाढदिवस साजरा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

बोरगाव पोलीसांची दमदार कामगिरी

बोरगाव पोलीसांची दमदार कामगिरी

June 20, 2026
६१६ मतदार ठरविणार  सोलापूरचा आमदार !

६१६ मतदार ठरविणार सोलापूरचा आमदार !

June 17, 2026
पाणीटंचाईवर टँकरचा ‘तोडगा’ की नव्या ‘संकटा’ची भर?

पाणीटंचाईवर टँकरचा ‘तोडगा’ की नव्या ‘संकटा’ची भर?

June 17, 2026

June 16, 2026
अडसूळ सरांच्या भेटीने मुलांना मिळाली प्रेरणा

अडसूळ सरांच्या भेटीने मुलांना मिळाली प्रेरणा

June 16, 2026
उंटावरील मिरवणूकीने मुले भारावली.

उंटावरील मिरवणूकीने मुले भारावली.

June 16, 2026
स्वातंत्र्य लढ्याला बळ देणार्‍या वंदे मातरमचा इतिहास प्रेरक – सिध्दाराम पाटील

स्वातंत्र्य लढ्याला बळ देणार्‍या वंदे मातरमचा इतिहास प्रेरक – सिध्दाराम पाटील

June 15, 2026
विहिरीत टेम्पो कोसळून १४ भाविकांचा मृत्यू

विहिरीत टेम्पो कोसळून १४ भाविकांचा मृत्यू

June 14, 2026

राजकारण

No Content Available
Load More

वेबसाईट दर्शक