Saturday, June 20, 2026
Navprabhatnews
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • क्राईम
  • कृषी
  • आरोग्य
No Result
View All Result
Navprabhatnews
No Result
View All Result

“सिनीयर मेंबर” संदिप टेळे दक्षिणचे सभापती

संपादक-अमोगसिध्द मुंजे by संपादक-अमोगसिध्द मुंजे
March 12, 2026
in सोलापूर
0
“सिनीयर मेंबर” संदिप टेळे दक्षिणचे सभापती
0
SHARES
148
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

देशमुख व कल्याणशेटी गट एकत्र

सोलापूर…
दक्षिण सोलापूरमधील १२ पंचायत समितीमध्ये सर्वात “सिनीयर” आणि शांत स्वभाव असणारे औराद पंचायत समिती गणाचे संदिप टेळे यांची सभापतीपदी बिनविरोध निवड करण्यात आली आहे. टेळे यांनी २०१७ च्या निवडणूकीत पंचायत समिती सदस्य म्हणून निवडून आल्यानंतर उपसभापतीपदही भूषविले आहे. त्यामुळे ते सर्वात सिनीअर मेंबर आहेत. आमदार सुभाष देशमुख व आमदार सचिन कल्याणशेटी यांनी टेळे यांच्या नावावर शिक्कामोर्तब केल्याने त्यांची एकमताने निवड झाली. निवड बिनविरोध झाल्यानंतर जिल्हा परिषद सदस्य रामप्पा चिवडशेट्टी व सिध्देश्वर बाजार समितिचे संचालक मनिष देशमुख यांनी डान्स करून जल्लोष केला.

दक्षिण सोलापूर पंचायत समितीच्या सभापती आणि उपसभापती पदाची निवड गुरुवारी १२ मार्च रोजी पंचायत समितीच्या विसावा सभागृहात पार पडली. यावेळी सभापतीपदासाठी औराद गणाचे पंचायत समिती सदस्य संदीप टेळे तर उपसभापतीपदासाठी बोरामणी गणाच्या वर्षा पटणे यांचे प्रत्येकी एकच अर्ज आल्याने बिनविरोध निवड करण्यात आली . यावेळी कार्यकर्त्यांनी हलगीच्या तालावर नृत्य व गुलालांची उधळण करीत जल्लोष केला.निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून उपजिल्हाधिकारी अंजली मरोड यांनी काम पाहीले. यावेळी दक्षिणचे तहसीलदार किरण जमदाडे व गटविकास अधिकारी मनोज राऊत यांनी सहायक म्हणून काम पाहीले.
प्रारंभी आमदार सचिन कल्याणशेटी व सिध्देश्वर बाजार समितीचे संचालक मनिष देशमुख यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली. यावेळी सभापतीपदासाठी संदिप टेळे तर उपसभापती पदासाठी वर्षा पटणे यांच्या नावावर एकमत झाले. त्यानंतर दुपारी १२ वाजता दोन्ही उमेदवारांनी अर्ज दाखल केला. त्यानंतर दुपारी दोन वाजता बिनविरोध निवड जाहीर करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषद सदस्य रामप्पा चिवडशेट्टी, नेताजी खंडागळे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती सुनील कळके, तालुकाध्यक्ष संगप्पा केरके, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष अप्पासाहेब मोटे, अतुल गायकवाड, जिल्हा कार्याध्यक्ष महेश बिराजदार, सिद्धाराम हेले, हणमंत कुलकर्णी, जिल्हा चिटणिस यतीन शहा , औरादचे माजी सरपंच लक्ष्मण गडदे यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी पंचायत समिती सदस्य मळसिद्ध मुगळे, विजय राठोड, शिल्पा बिराजदार, अंबिका पाटील, सुरज पाटील, बलवान गोतसुर्वे, पंचप्पा धनशेट्टी, अंबिका दुपारगुडे आणि प्रियांका आसबे उपस्थित होते. तसेच शिवसेनेच्या प्रियांका कुबसंगे आदी पंचायत समिती सदस्य उपस्थित होते .
या निवडीनंतर नूतन सभापती व उपसभापतींचा सत्कार करण्यात आला.
….
__________________________________
*🛑नवप्रभात न्युज पोर्टल ला बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा*
*संपादक :- अमोगसिद्ध मुंजे*
*9423535294*

Previous Post

आमच्यामध्ये गटबाजी नाही

Next Post

धनगर समाजाला कायदेशीर आरक्षण मिळवून देणार … मुख्यमंत्री फडणवीस

संपादक-अमोगसिध्द मुंजे

संपादक-अमोगसिध्द मुंजे

Next Post
धनगर समाजाला कायदेशीर आरक्षण मिळवून देणार … मुख्यमंत्री फडणवीस

धनगर समाजाला कायदेशीर आरक्षण मिळवून देणार ... मुख्यमंत्री फडणवीस

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

६१६ मतदार ठरविणार  सोलापूरचा आमदार !

६१६ मतदार ठरविणार सोलापूरचा आमदार !

June 17, 2026
पाणीटंचाईवर टँकरचा ‘तोडगा’ की नव्या ‘संकटा’ची भर?

पाणीटंचाईवर टँकरचा ‘तोडगा’ की नव्या ‘संकटा’ची भर?

June 17, 2026

June 16, 2026
अडसूळ सरांच्या भेटीने मुलांना मिळाली प्रेरणा

अडसूळ सरांच्या भेटीने मुलांना मिळाली प्रेरणा

June 16, 2026
उंटावरील मिरवणूकीने मुले भारावली.

उंटावरील मिरवणूकीने मुले भारावली.

June 16, 2026
स्वातंत्र्य लढ्याला बळ देणार्‍या वंदे मातरमचा इतिहास प्रेरक – सिध्दाराम पाटील

स्वातंत्र्य लढ्याला बळ देणार्‍या वंदे मातरमचा इतिहास प्रेरक – सिध्दाराम पाटील

June 15, 2026
विहिरीत टेम्पो कोसळून १४ भाविकांचा मृत्यू

विहिरीत टेम्पो कोसळून १४ भाविकांचा मृत्यू

June 14, 2026
कोणतीही फाईल विनाकारण प्रलंबित राहणार नाही

कोणतीही फाईल विनाकारण प्रलंबित राहणार नाही

June 14, 2026

राजकारण

No Content Available
Load More

वेबसाईट दर्शक