Saturday, June 20, 2026
Navprabhatnews
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • क्राईम
  • कृषी
  • आरोग्य
No Result
View All Result
Navprabhatnews
No Result
View All Result

धनगर समाजाला कायदेशीर आरक्षण मिळवून देणार … मुख्यमंत्री फडणवीस

संपादक-अमोगसिध्द मुंजे by संपादक-अमोगसिध्द मुंजे
March 14, 2026
in सोलापूर
0
धनगर समाजाला कायदेशीर आरक्षण मिळवून देणार … मुख्यमंत्री फडणवीस
0
SHARES
32
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

धनगर आरक्षणासाठी महाधिवक्ता यांच्यासोबत मुख्यमंत्री फडणवीस यांची  बैठक

मुंबई : धनगर समाजाच्या आरक्षणाबाबत कायदेशीर तोडगा काढण्यासाठी धनगर समाजाच्या शिष्टमंडळासोबत राज्याच्या महाधिवक्ता यांच्यासोबत बैठकीचे तातडीने आयोजन करण्यात येईल, जेणेकरुन धनगर बांधवाच्या आरक्षणासंदर्भात कायदेशीर दिशा स्पष्ट होईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
विधानभवन येथे मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली धनगर आरक्षणासंदर्भात समाजाच्या शिष्टमंडळाच्या मागण्यांसंदर्भात बैठक झाली, त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते. बैठकीस जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, खासदार रामराव वडकुते, शिष्टमंडळाचे प्रतिनिधी उपस्थित होते.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, महाराष्ट्रात लोकसंख्येच्या दृष्टीने मोठ्या प्रमाणात असलेल्या धनगर समाजाचे ऐतिहासिक योगदान भरीव आहे. धनगर समाजाला आरक्षण देण्यासाठी शासन सकारात्मक आहे. हे आरक्षण कायद्याच्या चौकटीत टिकणारे असणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने राज्याच्या महाधिवक्ता यांच्यासोबत धनगर समाजातील या विषयाचा अभ्यास असलेल्या प्रतिनिधींच्या बैठकीचे आयोजन तातडीने करण्यात येईल. त्यातुन आरक्षणासाठीची कायदेशीर दिशा स्पष्ट होईल. कायद्याच्या चौकटीत बसणारे आरक्षण देताना सर्व बाजू तपासून त्याची खातरजमा करुन आरक्षणाचा प्रस्ताव केंद्राकडे सादर करण्याची राज्य शासनाची भूमिका असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी सांगितले.
बैठकीस गृह विभागाच्या अपर मुख्य सचिव मनिषा म्हैसकर, पोलीस महासंचालक सदानंद दाते, विधि न्याय विभागाचे प्रधान सचिव दिलीप घुमरे, आदिवासी विकास विभागाचे प्रधान सचिव विजय वाघमारे, इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे सचिव आप्पासो धुळाज, पदुम सचिव डॉ रामास्वामी एन. आदी उपस्थित होते. शिष्टमंडळाच्या प्रतिनिधींच्या मागण्याबाबत मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी सविस्तर चर्चा केली.

__________________________________
*🛑नवप्रभात न्युज पोर्टल ला बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा*
*संपादक :- अमोगसिद्ध मुंजे*
*9423535294*

Previous Post

“सिनीयर मेंबर” संदिप टेळे दक्षिणचे सभापती

Next Post

कत्तलीसाठी बांधून ठेवलेल्या सहा गायींची सुटका

संपादक-अमोगसिध्द मुंजे

संपादक-अमोगसिध्द मुंजे

Next Post
कत्तलीसाठी बांधून ठेवलेल्या सहा गायींची सुटका

कत्तलीसाठी बांधून ठेवलेल्या सहा गायींची सुटका

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

६१६ मतदार ठरविणार  सोलापूरचा आमदार !

६१६ मतदार ठरविणार सोलापूरचा आमदार !

June 17, 2026
पाणीटंचाईवर टँकरचा ‘तोडगा’ की नव्या ‘संकटा’ची भर?

पाणीटंचाईवर टँकरचा ‘तोडगा’ की नव्या ‘संकटा’ची भर?

June 17, 2026

June 16, 2026
अडसूळ सरांच्या भेटीने मुलांना मिळाली प्रेरणा

अडसूळ सरांच्या भेटीने मुलांना मिळाली प्रेरणा

June 16, 2026
उंटावरील मिरवणूकीने मुले भारावली.

उंटावरील मिरवणूकीने मुले भारावली.

June 16, 2026
स्वातंत्र्य लढ्याला बळ देणार्‍या वंदे मातरमचा इतिहास प्रेरक – सिध्दाराम पाटील

स्वातंत्र्य लढ्याला बळ देणार्‍या वंदे मातरमचा इतिहास प्रेरक – सिध्दाराम पाटील

June 15, 2026
विहिरीत टेम्पो कोसळून १४ भाविकांचा मृत्यू

विहिरीत टेम्पो कोसळून १४ भाविकांचा मृत्यू

June 14, 2026
कोणतीही फाईल विनाकारण प्रलंबित राहणार नाही

कोणतीही फाईल विनाकारण प्रलंबित राहणार नाही

June 14, 2026

राजकारण

No Content Available
Load More

वेबसाईट दर्शक