Saturday, June 20, 2026
Navprabhatnews
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • क्राईम
  • कृषी
  • आरोग्य
No Result
View All Result
Navprabhatnews
No Result
View All Result

बापरे ! दहावीच्या भूगोलच्या पेपरची चोरी

संपादक-अमोगसिध्द मुंजे by संपादक-अमोगसिध्द मुंजे
March 17, 2026
in सोलापूर
0
बापरे ! दहावीच्या भूगोलच्या पेपरची चोरी
0
SHARES
87
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

शिक्षण विभागाच्या सुरक्षा व्यवस्थेचे वाभाडे

सोलापूर : दहावी बोर्डाचा उद्याचा भूगोल विषयाचा पेपर फुटला आहे. या पेपरच्या प्रश्नपत्रिकांचा एक संच आज सांगोला येथील एका परीक्षा केंद्रातील स्ट्राँग रूममधून चोरीला गेला. यामुळे या पेपरच्या गोपनीयतेवर मोठा प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे. दरम्यान, हा पेपर रद्द होणार की नवीन प्रश्नपत्रिका संच पुरवले जाणार? याबाबत शिक्षण मंडळाने अद्याप कोणताही निर्णय घेतला नाही. त्यामुळे बोर्डाच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.राज्यात सध्या राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावीच्या परीक्षा सुरू आहेत. त्यात उद्या म्हणजे  १८ मार्च रोजी भूगोल विषयाचा पेपर होता. पण या पेपरच्या ५० प्रश्नपत्रिकांचा एक संच आज सांगोला शहरातील सांगोला विद्यामंदिर या परीक्षा केंद्रातील स्ट्राँग रूममधून चोरीला गेला. आज सकाळी 8.30 वा. शिक्षण विभाग व कस्टोडियन कालचे उरलेले पेपर बोर्डाला पोस्टाच्या माध्यमातून पाठवण्यासाठी आले असता त्यांना स्ट्राँग रूमचे कुलूप तोडल्याचे दिसले. तेव्हा ही चोरी निदर्शनास आली. या स्ट्राँग रूम समोरील सीसीटीव्ही सध्या बंद आहे. त्यामुळे या चोरीचे कोणतेही फुटेज उपलब्ध नाही.
दहावीच्या परीक्षेसाठी आवश्यक असलेल्या प्रश्नपत्रिका सांगोला विद्यामंदिर प्रशालेतील स्ट्राँग रूममध्ये सुरक्षित ठेवण्यात आल्या होत्या.
पण अज्ञात चोरट्यांनी सोमवारी रात्री  या रूमचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. त्यानंतर कपाटात सुरक्षित ठेवण्यात आलेल्या भूगोलाच्या 50 प्रश्नपत्रिका लंपास केल्या. मंगळवारी सकाळी केंद्रावरील कर्मचाऱ्यांच्या ही बाब लक्षात आली, तेव्हा एकच धावपळ उडाली. स्ट्राँग रूमसारख्या ठिकाणी ही चोरी झाल्याने शिक्षण मंडळाच्या सुरक्षा व्यवस्थेचे वाभाडे निघाले आहेत.

__________________________________
*🛑नवप्रभात न्युज पोर्टल ला बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा*
*संपादक :- अमोगसिद्ध मुंजे*
*9423535294*

Previous Post

कत्तलीसाठी बांधून ठेवलेल्या सहा गायींची सुटका

Next Post

अक्कलकोटमध्ये गारांचा पाऊस

संपादक-अमोगसिध्द मुंजे

संपादक-अमोगसिध्द मुंजे

Next Post
अक्कलकोटमध्ये गारांचा पाऊस

अक्कलकोटमध्ये गारांचा पाऊस

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

६१६ मतदार ठरविणार  सोलापूरचा आमदार !

६१६ मतदार ठरविणार सोलापूरचा आमदार !

June 17, 2026
पाणीटंचाईवर टँकरचा ‘तोडगा’ की नव्या ‘संकटा’ची भर?

पाणीटंचाईवर टँकरचा ‘तोडगा’ की नव्या ‘संकटा’ची भर?

June 17, 2026

June 16, 2026
अडसूळ सरांच्या भेटीने मुलांना मिळाली प्रेरणा

अडसूळ सरांच्या भेटीने मुलांना मिळाली प्रेरणा

June 16, 2026
उंटावरील मिरवणूकीने मुले भारावली.

उंटावरील मिरवणूकीने मुले भारावली.

June 16, 2026
स्वातंत्र्य लढ्याला बळ देणार्‍या वंदे मातरमचा इतिहास प्रेरक – सिध्दाराम पाटील

स्वातंत्र्य लढ्याला बळ देणार्‍या वंदे मातरमचा इतिहास प्रेरक – सिध्दाराम पाटील

June 15, 2026
विहिरीत टेम्पो कोसळून १४ भाविकांचा मृत्यू

विहिरीत टेम्पो कोसळून १४ भाविकांचा मृत्यू

June 14, 2026
कोणतीही फाईल विनाकारण प्रलंबित राहणार नाही

कोणतीही फाईल विनाकारण प्रलंबित राहणार नाही

June 14, 2026

राजकारण

No Content Available
Load More

वेबसाईट दर्शक