Friday, June 19, 2026
Navprabhatnews
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • क्राईम
  • कृषी
  • आरोग्य
No Result
View All Result
Navprabhatnews
No Result
View All Result

तृतीयपंथीयांच्या सक्षमीकरणासाठी शासनाचा पुढाकार

संपादक-अमोगसिध्द मुंजे by संपादक-अमोगसिध्द मुंजे
March 24, 2026
in सोलापूर
0
धनगर समाजाला कायदेशीर आरक्षण मिळवून देणार … मुख्यमंत्री फडणवीस
0
SHARES
20
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

तृतीयपंथीयांच्या सक्षमीकरणासाठी बीज भांडवल योजना लागू

सोलापूर, दिनांक २४: सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, महाराष्ट्र शासनाने तृतीयपंथीय घटकांच्या सर्वांगीण विकासासाठी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. शासन निर्णय दिनांक १३ मार्च २०२६ नुसार “बीज भांडवल योजना” राज्यात राबविण्यात येणार असून, या योजनेत तृतीयपंथीय व्यक्तींना स्वयंरोजगार व व्यवसाय उभारणीसाठी आर्थिक सहाय्य दिले जाणार आहे..

योजनेत लाभार्थ्याचा ५% हिस्सा, शासनाचे ४५% अनुदान व ५०% बँक कर्ज अशा स्वरूपात मदत मिळणार आहे. लघु (₹२५,०००), मध्यम (₹५०,०००) व दीर्घ (₹२,००,०००) कर्ज सुविधा उपलब्ध असून भाजी स्टॉल, जनरल स्टोअर्स, बेकरी, ब्युटी पार्लर, मोबाइल दुरुस्ती यांसारख्या व्यवसायांसाठी सहाय्य दिले जाईल. याशिवाय कौशल्य विकास व उद्योजकता प्रशिक्षणाचीही सोय करण्यात आली आहे.

पात्रतेसाठी अर्जदार महाराष्ट्रात किमान १० वर्षे वास्तव्य असणे, वय १८ ते ५० वर्षे दरम्यान असणे, तसेच सक्षम प्राधिकरणाचे तृतीयपंथीय ओळखपत्र असणे आवश्यक आहे. इच्छुक लाभार्थ्यांनी निर्धारित नमुन्यात अर्ज करून आवश्यक कागदपत्रांसह सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, सोलापूर कार्यालयात सादर करावा.

या योजनेतून तृतीयपंथीय घटकांना आर्थिक व सामाजिक सक्षमीकरणाची नवी दिशा मिळणार असल्याचे सहाय्यक आयुक्त श्रीमती सुलोचना सोनवणे यांनी सांगितले.

__________________________________
*🛑नवप्रभात न्युज पोर्टल ला बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा*
*संपादक :- अमोगसिद्ध मुंजे*
*9423535294*

.

Previous Post

दक्षिणच्या सभापतीकडून नागरीकांच्या समस्या सोडविण्यास प्राधान्य

Next Post

पदाधिकारी बनले ‘विशेष कार्यकारी अधिकारी’

संपादक-अमोगसिध्द मुंजे

संपादक-अमोगसिध्द मुंजे

Next Post
पदाधिकारी बनले ‘विशेष कार्यकारी अधिकारी’

पदाधिकारी बनले 'विशेष कार्यकारी अधिकारी'

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

६१६ मतदार ठरविणार  सोलापूरचा आमदार !

६१६ मतदार ठरविणार सोलापूरचा आमदार !

June 17, 2026
पाणीटंचाईवर टँकरचा ‘तोडगा’ की नव्या ‘संकटा’ची भर?

पाणीटंचाईवर टँकरचा ‘तोडगा’ की नव्या ‘संकटा’ची भर?

June 17, 2026

June 16, 2026
अडसूळ सरांच्या भेटीने मुलांना मिळाली प्रेरणा

अडसूळ सरांच्या भेटीने मुलांना मिळाली प्रेरणा

June 16, 2026
उंटावरील मिरवणूकीने मुले भारावली.

उंटावरील मिरवणूकीने मुले भारावली.

June 16, 2026
स्वातंत्र्य लढ्याला बळ देणार्‍या वंदे मातरमचा इतिहास प्रेरक – सिध्दाराम पाटील

स्वातंत्र्य लढ्याला बळ देणार्‍या वंदे मातरमचा इतिहास प्रेरक – सिध्दाराम पाटील

June 15, 2026
विहिरीत टेम्पो कोसळून १४ भाविकांचा मृत्यू

विहिरीत टेम्पो कोसळून १४ भाविकांचा मृत्यू

June 14, 2026
कोणतीही फाईल विनाकारण प्रलंबित राहणार नाही

कोणतीही फाईल विनाकारण प्रलंबित राहणार नाही

June 14, 2026

राजकारण

No Content Available
Load More

वेबसाईट दर्शक