Saturday, September 12, 2026
Navprabhatnews
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • क्राईम
  • कृषी
  • आरोग्य
No Result
View All Result
Navprabhatnews
No Result
View All Result

*जलजीवनच्या कर्मचाऱ्यांना ग्रामविकास विभागात कायम करणार ; पालकमंत्री गोरे..!*

संपादक-अमोगसिध्द मुंजे by संपादक-अमोगसिध्द मुंजे
January 7, 2026
in सोलापूर
0
*जलजीवनच्या कर्मचाऱ्यांना ग्रामविकास विभागात कायम करणार ; पालकमंत्री गोरे..!*
0
SHARES
326
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर : स्वच्छ भारत मिशन व जलजीवन मिशनमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना ग्रामविकास विभागात कायम करणार असल्याची ग्वाही ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे यांनी दिली.

जिल्हास्तरावर जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्षात जलजीवन मिशन व स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) अंतर्गत गेल्या २० वर्षापासून कर्मचारी एकत्रित काम करीत आहेत. या कर्मचाऱ्यांना ग्रामविकास विभागात कायम करण्याचा आदेश छत्रपती संभाजीनगर मॅट न्यायाधिकरणाने दिला आहे. या आदेशाची प्रत व निवेदन ग्रामविकासमंत्री गोरे यांना पाणी व स्वच्छता कर्मचारी कृती समितीचे राज्याचे कार्याध्यक्ष सचिन जाधव यांनी दिले.

मुख्यमंत्री समृध्द पंचायतराज अभियानाच्या कामाचा आढावा घेण्यासाठी ग्रामविकासमंत्री गोरे हे मंगळवारी जिल्हा परिषदेत आले होते. याप्रसंगी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील, ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी सूर्यकांत भुजबळ, उपमुख्य कार्यकारी अमोल जाधव, शंकर बंडगर, दीपाली व्हटे, प्रतीक्षा गोडसे, सचिन सोनवणे, महादेव शिंदे, प्रशांत दबडे, आनंद मोची यांच्यासह अभियान कक्षातील कर्मचारी उपस्थित होते.

राज्यात गेल्या ३ महिन्यांपासून ४२८ कर्मचाऱ्यांचा पगार नाही. सर्व कर्मचारी मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानात काम करीत आहेत. विभागाच्या प्रशासकीय खर्चासाठी निधी नाही. यामुळे कामावर परिणाम झालेला आहे. जिल्हा स्तरावर जे सल्लागार काम करतात त्यांचे वेतन कधीच वेळेवर होत नाही, असे निवेदनात म्हटले आहे. जलजीवन मिशन अंतर्गत कर्मचाऱ्यांना दर तीन महिन्यांची मुदतवाढ दिली जाते. त्यामुळे कर्मचाऱ्यांवर कायम टांगती तलवार आहे. या सर्व कर्मचाऱ्यांना ग्रामविकास विभागात कायम करण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली आहे. या मागणीचा ग्रामविकासमंत्री गोरे यांनी सकारात्मक विचार केल्याचे जाधव यांनी सांगितले.

Next Post

मुख्यमंत्री पंचायतराज अभियानाचे पालकमंत्री गोरे यांच्याकडून कौतुक

संपादक-अमोगसिध्द मुंजे

संपादक-अमोगसिध्द मुंजे

Next Post
मुख्यमंत्री पंचायतराज अभियानाचे पालकमंत्री गोरे यांच्याकडून कौतुक

मुख्यमंत्री पंचायतराज अभियानाचे पालकमंत्री गोरे यांच्याकडून कौतुक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

२४ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर पत्रकारांच्या घरांचे स्वप्न साकारले

२४ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर पत्रकारांच्या घरांचे स्वप्न साकारले

September 12, 2026
गांधी जयंतीदिनी आत्मदहन करणार..  महांतेश्वर कट्टीमनी

गांधी जयंतीदिनी आत्मदहन करणार.. महांतेश्वर कट्टीमनी

September 10, 2026
नियम बाजूला ठेवून “दुष्काळ” जाहीर करा..

नागरिकांनी ‘सामोपचारा’ने वाद मिटवावे.. जिल्हा व सत्र न्यायाधीश मनोज शर्मा यांचे आवाहन

September 9, 2026
“लिंगायत दफनभूमी”साठी वन खात्याची जागा देणार.. वनमंत्री नाईक

“लिंगायत दफनभूमी”साठी वन खात्याची जागा देणार.. वनमंत्री नाईक

September 9, 2026
नियम बाजूला ठेवून “दुष्काळ” जाहीर करा..

अधिकार्‍यांचा गाव पातळीवर ” रात्रीचा मुक्काम”

September 9, 2026
नियम बाजूला ठेवून “दुष्काळ” जाहीर करा..

नियम बाजूला ठेवून “दुष्काळ” जाहीर करा..

September 9, 2026
सदस्यांमधील स्नेह व बंधुभाव वाढीसाठी महादेव कोगनूरे मित्र परीवारांने आयोजित केला दर्शन यात्रा

सदस्यांमधील स्नेह व बंधुभाव वाढीसाठी महादेव कोगनूरे मित्र परीवारांने आयोजित केला दर्शन यात्रा

September 5, 2026
स्मशानभूमी असेल तरच गावच्या विकासासाठी मिळणार निधी

आपत्कालीन भारनियमनाचा त्रास नको; पालकमंत्री

September 5, 2026

राजकारण

No Content Available
Load More

वेबसाईट दर्शक

133036

वृत्त संग्रह

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • About Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • क्राईम
  • कृषी
  • आरोग्य

© Website Design by Digital Buffalo - 9028927697