Wednesday, June 17, 2026
Navprabhatnews
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • क्राईम
  • कृषी
  • आरोग्य
No Result
View All Result
Navprabhatnews
No Result
View All Result

नांदणी टोल नाक्यावर वाहनचालकांची लूट

संपादक-अमोगसिध्द मुंजे by संपादक-अमोगसिध्द मुंजे
April 10, 2026
in सोलापूर
0
नांदणी टोल नाक्यावर वाहनचालकांची लूट
0
SHARES
487
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

लिमका बुक रेकॉर्डच्या नावाने  वाहनधारकांकडून लूट

टोलनाक्यावर नियमांचे उल्लंघन

स्थानिक वाहनचालकांना जाणिवपूर्वक त्रास

सोलापूर:
सोलापूर विजयपूर महामार्गावरील नांदणी टोलनाक्यावर कोणत्याही सुविधा नसताना व रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे असताना वाहनधारकांकडून टोल घेऊन वाहनचालकांची लूट करण्यात येत आहे . शासनाचे नियम धाब्यावर बसवून व स्थानिक वाहनचालकांची लूट होत असल्याने युवा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष मोहसीन पटेल यांनी ठिय्या आंदोलन करून टोलनाका प्रशासनाला धारेवर धरले. त्यामुळे काही काळ वाहतूक खोळंबली होती.

लिमका बुक रेकॉर्डमध्ये नोंद करण्यासाठी आय जे एम कंपनीकडून एकाच दिवसात २५ किलोमीटर रस्ता करण्यात आला. कोणत्याही प्रकारची गुणवत्ता नसताना रस्ता बनविण्यात आला. लिमका बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंदही झाले. मात्र सहा महिन्यातच या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्यामुळे रस्ता निकृष्ट दर्जाचे झाल्याचे सिद्ध झाले आहे. रस्ता निकृष्ट असताना व रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे असतानाही टोल कंपनी वाहन चालकांकडून टोल घेऊन लूट करण्यात येत आहे. तसेच वाहन चालकांसाठी टोल नाक्यावर कोणत्याही प्रकारच्या सोयी सुविधा नसताना टोल घेण्यात येत आहे. शिवाय परिसरातील वाहन चालक महिन्याभराचा पास काढून प्रवास करत असताना त्यांना अपमानास्पद वागणूक देण्यात येत आहे . त्यामुळे पैसा भरूनही अपमानास्पद वागणूक मिळत असल्यामुळे शुक्रवारी दुपारी युवा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष पटेल यांनी टोल नाक्यावर बसून ठिय्या आंदोलन केला. त्यामुळे प्रशासनाची धावपळ सुरू झाली. त्यामुळे टोल कंपनीने सर्व सुविधा उपलब्ध करून देऊन व रस्ता सुरळीत करूनच टोल घ्यावे यासाठी पटेल यांनी राष्ट्रीय महामार्गाचे प्रबंधकांकडे तक्रार केली आहे .


….
चौकट
…
आयजेएम कंपनीकडून २४ थासात २५ किलोमीटर रस्ता बनवून लिमका बुकमध्ये रेकॉर्ड करण्यात आला. मात्र सहा महिन्यातच या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले. तसेच रस्ता घसरगुंडी सारखा बनला . रस्ता निकृष्ट बनल्यामुळेच वाहनधारकांना मोठ्या प्रमाणात त्रास होत आहे. यापूर्वी टोल कंपनीकडे वारंवार तक्रार करूनही त्याकडे दुर्लक्ष केले जात असल्यामुळे राष्ट्रीय महामार्ग प्रबंधक स्वप्निल कासार यांच्याकडे तक्रार केली आहे. स्थानिक वाहनचालकाडून प्रामाणिक टोल भरूनही टोल कंपनीकडून वाहनचालकांवर अन्याय होत आहे.

मोहसीन महामूद पटेल, जिल्हाध्यक्ष, युवा स्वाभिमानी शेतकरी संघटना,

__________________________________
*🛑नवप्रभात न्युज पोर्टल ला बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा*
*संपादक :- अमोगसिद्ध मुंजे*
*9423535294*

Previous Post

पहिलीच्या प्रवेशासाठी ३१ डिसेंबरपर्यंत सहा वर्षे पूर्ण होणे सक्तीचे

Next Post

बापू, आपणास आमदार का व्हावेसे वाटले?

संपादक-अमोगसिध्द मुंजे

संपादक-अमोगसिध्द मुंजे

Next Post
बापू, आपणास आमदार का व्हावेसे वाटले?

बापू, आपणास आमदार का व्हावेसे वाटले?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

६१६ मतदार ठरविणार  सोलापूरचा आमदार !

६१६ मतदार ठरविणार सोलापूरचा आमदार !

June 17, 2026
पाणीटंचाईवर टँकरचा ‘तोडगा’ की नव्या ‘संकटा’ची भर?

पाणीटंचाईवर टँकरचा ‘तोडगा’ की नव्या ‘संकटा’ची भर?

June 17, 2026

June 16, 2026
अडसूळ सरांच्या भेटीने मुलांना मिळाली प्रेरणा

अडसूळ सरांच्या भेटीने मुलांना मिळाली प्रेरणा

June 16, 2026
उंटावरील मिरवणूकीने मुले भारावली.

उंटावरील मिरवणूकीने मुले भारावली.

June 16, 2026
स्वातंत्र्य लढ्याला बळ देणार्‍या वंदे मातरमचा इतिहास प्रेरक – सिध्दाराम पाटील

स्वातंत्र्य लढ्याला बळ देणार्‍या वंदे मातरमचा इतिहास प्रेरक – सिध्दाराम पाटील

June 15, 2026
विहिरीत टेम्पो कोसळून १४ भाविकांचा मृत्यू

विहिरीत टेम्पो कोसळून १४ भाविकांचा मृत्यू

June 14, 2026
कोणतीही फाईल विनाकारण प्रलंबित राहणार नाही

कोणतीही फाईल विनाकारण प्रलंबित राहणार नाही

June 14, 2026

राजकारण

No Content Available
Load More

वेबसाईट दर्शक