Wednesday, June 17, 2026
Navprabhatnews
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • क्राईम
  • कृषी
  • आरोग्य
No Result
View All Result
Navprabhatnews
No Result
View All Result

बापू, आपणास आमदार का व्हावेसे वाटले?

संपादक-अमोगसिध्द मुंजे by संपादक-अमोगसिध्द मुंजे
April 10, 2026
in सोलापूर
0
बापू, आपणास आमदार का व्हावेसे वाटले?
0
SHARES
235
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

इंगळगी झेडपी शाळेतील चिमुकल्यांचा आमदार सुभाष देशमुख यांना सवाल

सोलापूर, – दक्षिण सोलापूर तालुक्यातील इंगळगी येथील जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळेत आज एक आगळावेगळा उपक्रम पार पडला. आमदार श्री सुभाष (बापू) देशमुख यांच्या भेटीदरम्यान पहिली ते सातवीच्या विद्यार्थ्यांनी त्यांच्याशी थेट प्रश्नोत्तरांच्या माध्यमातून संवाद साधला. “आपले शिक्षण कुठे झाले?”, “आपण राजकारणात कसे आलात?”, “आपल्याला आमदार का व्हावेसे वाटले?” अशा विविध प्रश्नांची सरबत्ती चिमुकल्यांनी केली.

आमदार देशमुख यांनी विद्यार्थ्यांच्या प्रत्येक प्रश्नाला मनमोकळेपणाने उत्तरे देत मार्गदर्शन केले. त्यांनी सांगितले की, त्यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण तुळजापूर तालुका तसेच उत्तर सोलापूर तालुक्यातील वडाळा येथे झाले. व्यवसायातूनच आपण अपघाताने राजकारणात प्रवेश केल्याचे त्यांनी नमूद केले. “राजकारणापेक्षा समाजकारण आणि उद्योग क्षेत्राची मला अधिक आवड आहे,” असे स्पष्ट करत त्यांनी विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण घेऊन आदर्श समाज घडवण्याचे आणि राष्ट्रनिर्मितीत योगदान देण्याचे आवाहन केले.

यावेळी विद्यार्थ्यांनी विविध उपक्रमांचे सादरीकरण करून आपली मतेही व्यक्त केली. शाळेच्या विकासासाठी पुण्यातील एका कंपनीच्या सीएसआर निधीतून आठ लाख रुपयांची मदत उपलब्ध करून दिल्याबद्दल ग्रामस्थांनी आमदार देशमुख यांचे आभार मानले.

कार्यक्रमास दक्षिण पंचायत समिती सदस्य अंबिका पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक अतुल गायकवाड, सरपंच विनोद बनसोडे, शिवदारे हायस्कूलचे अध्यक्ष संभाजी माने, चंद्रकांत गुरव,  इनोदगी कोटे, भुताळी गाडेकर, राहुल वंजारे, प्रधान गुरव, गोरख माळी, सागर धुळवे, भीमाशंकर कोळी, मुख्याध्यापक विलासराव देशमुख, शिक्षक डॉ. अनिल सर्जे, शेखलाल शेख, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष निकम, उपाध्यक्ष सोनकडे, तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

________________________________
*🛑नवप्रभात न्युज पोर्टल ला बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा*
*संपादक :- अमोगसिद्ध मुंजे*
*9423535294*

Previous Post

नांदणी टोल नाक्यावर वाहनचालकांची लूट

Next Post

अनुदान मिळविण्यासाठी अकलूज उपजिल्हा रूग्णालयाकडून एचआयव्हीचा खोटा रिपोर्ट ? महिलेचा मुख्यमंत्री कार्यालयासमोर आंदोलनाचा इशारा

संपादक-अमोगसिध्द मुंजे

संपादक-अमोगसिध्द मुंजे

Next Post
अनुदान मिळविण्यासाठी अकलूज उपजिल्हा रूग्णालयाकडून एचआयव्हीचा खोटा रिपोर्ट  ? महिलेचा मुख्यमंत्री कार्यालयासमोर आंदोलनाचा इशारा

अनुदान मिळविण्यासाठी अकलूज उपजिल्हा रूग्णालयाकडून एचआयव्हीचा खोटा रिपोर्ट ? महिलेचा मुख्यमंत्री कार्यालयासमोर आंदोलनाचा इशारा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

६१६ मतदार ठरविणार  सोलापूरचा आमदार !

६१६ मतदार ठरविणार सोलापूरचा आमदार !

June 17, 2026
पाणीटंचाईवर टँकरचा ‘तोडगा’ की नव्या ‘संकटा’ची भर?

पाणीटंचाईवर टँकरचा ‘तोडगा’ की नव्या ‘संकटा’ची भर?

June 17, 2026

June 16, 2026
अडसूळ सरांच्या भेटीने मुलांना मिळाली प्रेरणा

अडसूळ सरांच्या भेटीने मुलांना मिळाली प्रेरणा

June 16, 2026
उंटावरील मिरवणूकीने मुले भारावली.

उंटावरील मिरवणूकीने मुले भारावली.

June 16, 2026
स्वातंत्र्य लढ्याला बळ देणार्‍या वंदे मातरमचा इतिहास प्रेरक – सिध्दाराम पाटील

स्वातंत्र्य लढ्याला बळ देणार्‍या वंदे मातरमचा इतिहास प्रेरक – सिध्दाराम पाटील

June 15, 2026
विहिरीत टेम्पो कोसळून १४ भाविकांचा मृत्यू

विहिरीत टेम्पो कोसळून १४ भाविकांचा मृत्यू

June 14, 2026
कोणतीही फाईल विनाकारण प्रलंबित राहणार नाही

कोणतीही फाईल विनाकारण प्रलंबित राहणार नाही

June 14, 2026

राजकारण

No Content Available
Load More

वेबसाईट दर्शक