Wednesday, June 17, 2026
Navprabhatnews
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • क्राईम
  • कृषी
  • आरोग्य
No Result
View All Result
Navprabhatnews
No Result
View All Result

अनुदान मिळविण्यासाठी अकलूज उपजिल्हा रूग्णालयाकडून एचआयव्हीचा खोटा रिपोर्ट ? महिलेचा मुख्यमंत्री कार्यालयासमोर आंदोलनाचा इशारा

संपादक-अमोगसिध्द मुंजे by संपादक-अमोगसिध्द मुंजे
April 10, 2026
in सोलापूर
0
अनुदान मिळविण्यासाठी अकलूज उपजिल्हा रूग्णालयाकडून एचआयव्हीचा खोटा रिपोर्ट  ? महिलेचा मुख्यमंत्री कार्यालयासमोर आंदोलनाचा इशारा
0
SHARES
15
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

रिपोर्टमुळे महिलेवर अन्याय झाल्याचा आरोप,आयुष्य उद्ध्वस्त झाल्याने नुकसान भरपाईसाठी पीडितेचा आक्रोश

https://navprabhatnews.com/wp-content/uploads/2026/04/VID-20260410-WA0059.mp4

अकलूज येथील उपजिल्हा रुग्णालयाचे संलग्न शासकीय आयसीटीसी एकात्मिक समुपदेशन व चाचणी केंद्राने सात महिने गर्भवती असलेल्या पीडितेला एचआयव्ही पॉझिटिव्ह असल्याचा खोटा अहवाल देऊन दिशाभूल केली असा आरोप करत पती व सासरकडील मंडळींनी संशय घेतला. नांदविण्यास स्पष्ट नकार दिला. याप्रकरणी संबंधितांवर कायदेशीर कारवाई करावी. शासनाने योग्य ती नुकसान भरपाई द्यावी अन्यथा महाराष्ट्र दिनी मुख्यमंत्री कार्यालयासमोर आत्मदहन करण्याचा इशारा संबंधित पीडित महिलेने दिला आहे.       पीडित महिला प्रसूती पूर्व तपासणीसाठी अकलूज शासकीय रुग्णालयात गेल्या असता आयसीटीसी केंद्राने तीन किट द्वारे एचआयव्ही चाचणी केली. एच आय व्ही अहवालात पॉझिटिव्ह असल्याचे नमूदही केले. पीडितेला पंढरपूर एआरटी सेंटर येथे पाठवून अनावश्यक उपचार करण्यात आला. यासंदर्भात शंका आल्याने संबंधित महिलेने स्वतः इतर स्वतंत्र केंद्रांमध्ये तपासणी केली असता एचआयव्ही निगेटिव्ह अहवाल आला. त्यानंतर ही धक्कादायक बाब पुढे आली. अकलूज आयसीटीसीने दिलेला पॉझिटिव्ह अहवाल हा वैद्यकीय दृष्ट्या खोटा आणि बेकायदेशीर असल्याचे निष्पन्न झाले असल्याचे पीडित महिला आणि ॲड. योगेश पवार यांनी सांगितले.अनुदान मिळविण्यासाठीच अकलूजच्या त्या केंद्राने हा प्रकार केला आहे मात्र या महिलेचा संसार उध्वस्त झाला. निगेटिव्ह असतानाही पॉझिटिव्ह अहवाल देण्याचे प्रकार मंगळवेढा आणि पंढरपूर या ठिकाणी घडले असल्याचा आरोप ॲड. योगेश पवार यांनी केला आहे. याप्रकरणी अकलूज येथील संबंधित केंद्रातील दोषी कर्मचाऱ्यांवर चुकीचा वैद्यकीय अहवाल देणे, गोपनीयतेचा भंग करणे या आरोपाखाली तातडीने फौजदारी गुन्हा दाखल करावा. संबंधित महिला प्रकरणी जाहीर खुलासा करून संबंधित केंद्राने माफी मागावी. राज्यातील सर्व आयसीटीसी केंद्रांमध्ये गर्भवती महिलांच्या बाबतीत तपासणी अहवालांचे पाच वर्षाचे ऑडिट करण्यात यावे. पीडित महिलेला शासनाने नुकसान भरपाई द्यावी. मोडलेला संसार पुन्हा जोडण्यासाठी शासकीय यंत्रणांनी हस्तक्षेप करावा तसे न केल्यास येत्या 1 मे 2026 रोजी मुख्यमंत्री कार्यालयासमोर आत्मदहन करण्याचा इशारा पीडित महिलेने दिला आहे.यावेळी राष्ट्रीय छावा संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष ॲड. योगेश पवार आणि विश्वजीत चुंगे आदी उपस्थित होते.

__________________________________
*🛑नवप्रभात न्युज पोर्टल ला बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा*
*संपादक :- अमोगसिद्ध मुंजे*
*9423535294*

https://navprabhatnews.com/wp-content/uploads/2026/04/VID-20260410-WA0060.mp4
Previous Post

बापू, आपणास आमदार का व्हावेसे वाटले?

Next Post

मंद्रूप जिल्हा परिषद मुलांच्या केंद्र शाळेचा प्रेरणादायी उपक्रम

संपादक-अमोगसिध्द मुंजे

संपादक-अमोगसिध्द मुंजे

Next Post
मंद्रूप जिल्हा परिषद मुलांच्या केंद्र शाळेचा प्रेरणादायी उपक्रम

मंद्रूप जिल्हा परिषद मुलांच्या केंद्र शाळेचा प्रेरणादायी उपक्रम

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

६१६ मतदार ठरविणार  सोलापूरचा आमदार !

६१६ मतदार ठरविणार सोलापूरचा आमदार !

June 17, 2026
पाणीटंचाईवर टँकरचा ‘तोडगा’ की नव्या ‘संकटा’ची भर?

पाणीटंचाईवर टँकरचा ‘तोडगा’ की नव्या ‘संकटा’ची भर?

June 17, 2026

June 16, 2026
अडसूळ सरांच्या भेटीने मुलांना मिळाली प्रेरणा

अडसूळ सरांच्या भेटीने मुलांना मिळाली प्रेरणा

June 16, 2026
उंटावरील मिरवणूकीने मुले भारावली.

उंटावरील मिरवणूकीने मुले भारावली.

June 16, 2026
स्वातंत्र्य लढ्याला बळ देणार्‍या वंदे मातरमचा इतिहास प्रेरक – सिध्दाराम पाटील

स्वातंत्र्य लढ्याला बळ देणार्‍या वंदे मातरमचा इतिहास प्रेरक – सिध्दाराम पाटील

June 15, 2026
विहिरीत टेम्पो कोसळून १४ भाविकांचा मृत्यू

विहिरीत टेम्पो कोसळून १४ भाविकांचा मृत्यू

June 14, 2026
कोणतीही फाईल विनाकारण प्रलंबित राहणार नाही

कोणतीही फाईल विनाकारण प्रलंबित राहणार नाही

June 14, 2026

राजकारण

No Content Available
Load More

वेबसाईट दर्शक