Wednesday, June 17, 2026
Navprabhatnews
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • क्राईम
  • कृषी
  • आरोग्य
No Result
View All Result
Navprabhatnews
No Result
View All Result

मंद्रूप जिल्हा परिषद मुलांच्या केंद्र शाळेचा प्रेरणादायी उपक्रम

संपादक-अमोगसिध्द मुंजे by संपादक-अमोगसिध्द मुंजे
April 11, 2026
in सोलापूर
0
मंद्रूप जिल्हा परिषद मुलांच्या केंद्र शाळेचा प्रेरणादायी उपक्रम
0
SHARES
102
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

पूर्वजांच्या इतिहासाचे स्मरण व शिवकालीन शस्त्र प्रदर्शनाचे आयोजन 

मंद्रूप… जिल्हा परिषद प्राथमिक मराठी मुलांची केंद्र शाळा व माजी विद्यार्थी संघाच्या वतीने ज्या शस्त्राने स्वराज्याचे रक्षण केले व शत्रूला पळते केले अशा पवित्र शस्त्रांचे प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आला आहे. या भव्य शिवकालीन, ऐतिहासिक व दुर्मिळ शस्त्रास्त्रांच्या प्रदर्शनात तलवार , कुऱ्हाडी, कटयारी , छुर्‍या, भाला, दांडपट्टा, वाघनखं, चिलखत व बिछवे या दुर्मिळ शस्त्रांस्त्रांचे  दर्शन होणार आहे . रविवारी १२ एप्रिल रोजी सकाळी दहा ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत प्रदर्शनातील शस्त्रास्रे पाहण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे.

या प्रदर्शनाचे उद्घाटन माजी सभापती अप्पाराव कोरे यांच्या हस्ते होणार असून अध्यक्षस्थानी मंद्रूपचे शिक्षण विस्तार अधिकारी आयुब कलबुर्गी राहणार आहेत. यावेळी माजी सरपंच विश्वनाथ स्वामी यांच्या हस्ते प्रतिमापूजन व  माजी सरपंच पिरप्पा म्हेत्रे यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात येणार आहे. यावेळी शिक्षण विस्तार अधिकारी गुरुबाळा सनके , केंद्रप्रमुख कल्लप्पा हेळवी व पोलीस निरीक्षक शंकर पटवारी यांच्यासह माजी उपसरपंच रमेश नवले, तंटामुक्ती समिती अध्यक्ष रेवणसिद्ध मेंडगुदले व मळसिध्द देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख, भाजपाचे नेते गौरीशंकर मेंडगुदले, युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अनंत म्हेत्रे, काँग्रेसचे जिल्हा सचिव महमद शेख व आर के फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष मोतीलाल राठोड यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. तरी प्रदर्शनातील शस्त्रास्त्रे पाहण्यासाठी विद्यार्थी, इतिहास अभ्यासक, इतिहास प्रेमी, शिवप्रेमी, महिला , ज्येष्ठ नागरीक यांनी मंद्रूप मुलांच्या केंद्र शाळेला भेट देण्याचे आवाहन शाळेचे मुख्याद्यापक प्रकाश कुंभार गुरूजी व शालेय व्यवस्थापन समीतीच्या पदाधिकार्‍यांनी केली आहे.

__________________
*🛑नवप्रभात न्युज पोर्टल ला बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा*
*संपादक :- अमोगसिद्ध मुंजे*
*9423535294*
Previous Post

अनुदान मिळविण्यासाठी अकलूज उपजिल्हा रूग्णालयाकडून एचआयव्हीचा खोटा रिपोर्ट ? महिलेचा मुख्यमंत्री कार्यालयासमोर आंदोलनाचा इशारा

Next Post

तुम्हाला टाॅपर बनायचंय ! तर मंद्रूपच्या जिल्हा परिषद शाळेला भेट द्या.

संपादक-अमोगसिध्द मुंजे

संपादक-अमोगसिध्द मुंजे

Next Post
तुम्हाला टाॅपर बनायचंय ! तर मंद्रूपच्या जिल्हा परिषद शाळेला भेट द्या.

तुम्हाला टाॅपर बनायचंय ! तर मंद्रूपच्या जिल्हा परिषद शाळेला भेट द्या.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

६१६ मतदार ठरविणार  सोलापूरचा आमदार !

६१६ मतदार ठरविणार सोलापूरचा आमदार !

June 17, 2026
पाणीटंचाईवर टँकरचा ‘तोडगा’ की नव्या ‘संकटा’ची भर?

पाणीटंचाईवर टँकरचा ‘तोडगा’ की नव्या ‘संकटा’ची भर?

June 17, 2026

June 16, 2026
अडसूळ सरांच्या भेटीने मुलांना मिळाली प्रेरणा

अडसूळ सरांच्या भेटीने मुलांना मिळाली प्रेरणा

June 16, 2026
उंटावरील मिरवणूकीने मुले भारावली.

उंटावरील मिरवणूकीने मुले भारावली.

June 16, 2026
स्वातंत्र्य लढ्याला बळ देणार्‍या वंदे मातरमचा इतिहास प्रेरक – सिध्दाराम पाटील

स्वातंत्र्य लढ्याला बळ देणार्‍या वंदे मातरमचा इतिहास प्रेरक – सिध्दाराम पाटील

June 15, 2026
विहिरीत टेम्पो कोसळून १४ भाविकांचा मृत्यू

विहिरीत टेम्पो कोसळून १४ भाविकांचा मृत्यू

June 14, 2026
कोणतीही फाईल विनाकारण प्रलंबित राहणार नाही

कोणतीही फाईल विनाकारण प्रलंबित राहणार नाही

June 14, 2026

राजकारण

No Content Available
Load More

वेबसाईट दर्शक