अवघ्या सहा तासात मंद्रूपमधील जबरी चोरी उघडकीस
मंद्रूपच्या दोन आरोपींना अटक
मंद्रूप…
मंद्रूपमध्ये २४ एप्रिल रोजी रात्री घडलेल्या जबरी चोरीच्या गुन्ह्याचा अवघ्या सहा तासांत वेगाने उलगडा करण्यात मंद्रूप पोलिसांना यश मिळाले . मंद्रूप पोलीस ठाणेचे पोलीस उपनिरीक्षक राजकुमार डांगे व त्यांच्या सहकार्यानी सिनेस्टाईल पाठलाग करीत मंद्रूप पोलीसांनी आरोपींना अटक करीत गुन्हेगारांच्या मुसक्या आवळल्या आहेत. यामुळे गुन्हेगारांमध्ये भीतीचे वातावरण दिसुन येत आहे.
फिर्यादी यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार आयशर टेम्पो मधून मालवाहतूक करत असताना मळसिध्दप्पा मंदिर परिसरात तीन अज्ञात इसमांनी त्यांचा टेम्पो अडवून
जबरदस्तीने वाहन थांबवले . फिर्यादीस मारहाण करून अंदाजे 20,000 रूपये रक्कम जबरदस्तीने हिसकावून घेतली. त्यामुळे फिर्यादींनी मंद्रूप पोलीसात तक्रार दिल्यानंतर सदर घटनेची गंभीर दखल घेत पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी , अप्पर पोलीस अधीक्षक प्रितम यावलकर व उपविभागीय पोलीस अधिकारी संकेत देवळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली मंद्रूप पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक शंकर पटवारी यांना सदर गुन्हा उघडकीस आणण्यासाठी सूचना व मार्गदर्शन केले. त्या अनुसार पोलीस उपनिरीक्षक राजकुमार डांगे, सहायक फौजदार बापू शिंदे, पोलीस कॉन्स्टेबल माजिद शेख, संदीप काळे, चालक श्रीशैल शिवणे यांचे पथक तात्काळ तपासाला लागले. तांत्रिक विश्लेषण, सीसीटीव्ही फुटेज व गोपनीय बातमीदारांच्या मदतीने आरोपींचा माग काढण्यात आला. पोलिसांनी अत्यंत शिताफीने व धाडसी कारवाई करत सिने-स्टाईल थरारक पाठलाग करून मंद्रूपमधील दोन आरोपींना जेरबंद केले. तर तिसऱ्या आरोपीचा शोध सुरू आहे. अटक आरोपींकडून
गुन्ह्यातील मुद्देमाल जप्त करण्याची कार्यवाही सुरू असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक डांगे करीत आहेत.
….
नांदणी येथील आरटीओ टॅक्स चुकविण्यासाठी मंद्रूप कुरघोटमार्गे जड वाहने जाण्याच्या प्रमाणात वाढ होत आहे. यामुळे मंद्रूप, कुरघोट, माळकवठे व टाकळी येथील तरूणांकडून वाहनचालकांची लूटमार सुरू आहे. त्यामुळे आरटीओच्या दुर्लक्षामुळे तरूण व्यसनाधीन बनून गुन्हेगारीकडे वळत आहेत. त्यामुळे मंद्रूपमधील तरूणांकडून जबरी चोरीचा गुन्हा घडला असून मंद्रूप पोलीसांनी शिताफीने आरोपींना अटक केली आहे. मात्र जड वाहने थांबवून लूटमार करणार्या तरूणांवर कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे.
__________________________________
*नवप्रभात न्युज पोर्टल ला बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा*
*संपादक :- अमोगसिद्ध मुंजे*
*9423535294*









