जिल्हा परिषदेच्या कृषी समिती सभेत शेतकरी हिताचे ठराव
सोलापूर :
झेडपीच्या कृषी विभागाची विषय समितीची पहिली सभा शिवरत्न सभागृह येथे पार पडली. सभेच्या अध्यक्षस्थानी कृषी समितीचे सभापती रामप्पा चिवडशेटटी होते. यावेळी कृषी क्षेत्राशी संबंधित विविध महत्त्वपूर्ण विषयांवर चर्चा करून ठराव मंजूर करण्यात आले. जिल्ह्यात सध्या केवळ एकच माती परीक्षण प्रयोगशाळा असल्यामुळे शेतकऱ्यांना अडचणी येत आहेत. त्यामुळे प्रत्येक तालुक्यात एक माती परीक्षण प्रयोगशाळा स्थापन करण्याबाबत महत्त्वपूर्ण ठराव घेण्यात आला. घरगुती गॅस सिलेंडरचा तुटवडा भासत असल्याने ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. यामुळे प्रत्येक शेतकऱ्याने बायोगॅस संयंत्र उभारणी करावी यासाठी शासनाकडून वाढीव निधी व लक्ष्य देण्याबाबत प्रस्ताव पाठविण्याचा निर्णय घेण्यात आला.
निविष्ठा परवान्यांबाबत (रासायनिक खते, बियाणे व कीटकनाशके) 2018 पासून जिल्हा परिषदेकडून अधिकार काढून घेतल्यामुळे शेतकऱ्यांना गैरसोय होत असल्याने अधिकार पूर्ववत कृषी विकास अधिकाऱ्यांकडे देण्याबाबत ठराव मंजूर करण्यात आला.
ट्रॅक्टरचलित कृषी औजारे खरेदीसाठी वाढीव अनुदान व लक्ष्य देण्याबाबत ठराव घेऊन तो विषय जिल्हा परिषद सर्वसाधारण सभेसमोर ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. याशिवाय डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना व बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना अंतर्गत अनुसूचित जाती-जमातीतील शेतकऱ्यांना अधिकाधिक लाभ मिळावा यासाठी प्रभावी अंमलबजावणी, जनजागृती व प्रचारावर भर देण्याच्या सूचना देण्यात आले .
….
झेडपीचे कृषी व पशूसंवर्धन सभापती रामप्पा चिवडशेट्टी यांनी पदभार घेतल्यापासून शेतकरी हिताचे निर्णय घेण्याचा सपाटा सुरू ठेवला आहे. चार वर्षांपासून प्रशासक राज्य असल्यामुळे अधिकारी व शेतकरी यांचा संपर्क नव्हता. मात्र मूळचे शेतकरी असणारे सभापती चिवडशेट्टी यांनी माती प्रयोगशाळा, खते व बी बियाणे तपासणी अधिकार, बायोगॅस, विविध यौजनेतील साहीत्य वाटप व अनुदान वाढ, झेडपीच्या अधिकार्यांच्या अधिकारवाढीसासह अनैक निर्णय घेऊन सभापतींनी कृषी विभागात नवचैतन्य आणली आहे.
———————————————————
नवप्रभात न्युज पोर्टल ला बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा.
संपादक :- अमोगसिद्ध मुंजे
9423535294









