झेडपीच्या टंचाई कृती आराखड्यात २४६ गावे व ५९९ वाडया-वस्त्यांचा समावेश – सिईओ कुशल जैन
सोलापूर – जिल्हयात सन २०२५-२६ या वर्षातील टंचाई कृती आराखड्यामध्ये २४६ गावे व ५९९ वाडया- वस्त्यांचा समावेश करण्यात आलेला असून त्याचा अंदाजित खर्च रक्कम १२०४.१ लक्ष रूपये इतका असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांनी दिली.
सन २०२३ -२४ टंचाई कालावधी अंतर्गत २१४ टँकरद्वारे १८० गावांत १२७३ वाडया- वस्त्यांवर पाणीपुरवठा करण्यात आला होता.
सन २०२४-२५ टंचाई कालावधी अंतर्गत ६९ टँकरद्वारे ५९ गावांत ५८७ वाडया- वस्त्यांवर पाणीपुरवठा करण्यात आला होता.
सन २०२५-२६ या वर्षातील टंचाई कृती आराखड्यामध्ये १७८ टँकरद्वारे १४७ गावांत ५८९ वाडया/वस्त्यांवर पाणीपुरवठा करणे प्रस्तावित असून मार्च अखेर ४८ टँकर प्रस्तावित असताना एकही टँकरची मागणी आली नाही. तथापि सदयस्थितीत दि. ११ एप्रिलपासून उत्तर सोलापूर तालुक्यात रानमसले गावामध्ये एक टँकर चालु आहे.
सोलापूर जिल्ह्यात अक्कलकोट तालुक्यातील वसंतराव नाईकनगर , बार्शी तालुक्यातील भोयरे, पिंपरी आणि माळशिरस तालुक्यातील पळसमंडळ येथे असे एकूण ०४ टँकर प्रस्तावित आहेत.
सन २०२५ -२६ टंचाई कालावधी अंतर्गत एकूण टँकर फीडिंग ठिकाण संख्या ५१ असून सार्वजनिक ११ तर खाजगी ४० पाण्याच्या उद्भवचा समावेश आहे.
सन २०२४ -२५ टंचाई कालावधी अंतर्गत एकूण ८.१७ कोटींची मागणी करण्यात आसी असून अद्यापपर्यंत निधी अप्राप्त आहे.
सन २०२५ -२६ टंचाई कालावधी अंतर्गत नळ पाणी पुरवठा विशेष दुरुस्तीचे मौजे भोसे व ३९ गावे प्रादेशिक योजना (स्थ्यापत्य व यांत्रिकी दोन्ही) ता.मंगळवेढा, मौजे कासेगाव व ११ गावे प्रादेशिक योजना ता. पंढरपूर या योजनांना जिल्हाधिकारी यांचेकडून प्रशासकीय मान्यता मिळाली असून सदरचे काम निविदा प्रक्रियेच्या स्तरावर असल्याचे सिईओ कुशल जैन यांनी सांगितले.
सुट्टीचे दिवशीही सीईओंकडून पानगाव येथे कामांची पाहणी
रविवारी सुट्टीचे दिवशी ही सोलापूर जिल्हा परिषदेचे सिईओ कुशल जैन यांनी बार्शी तालुक्यातील पानगाव येथे पाण्याचे स्त्रोत, पाण्याचे टाकीची कामे तसेच कडक उन्हामुळे ग्रामस्थांना काळजी घेणे बाबत आरोग्य केंद्रांना भेटी देऊन सर्व अधिकारी व कर्मचारी यांना सुचना दिले आहेत. उप अभियंता वाघमारे या प्रसंगी यांनी सर्व पाणी पुरवठा विषयत कामांची माहिती सिईओ जैन यांना दिली.
__________
नवप्रभात न्युज पोर्टल ला बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा.
संपादक :- अमोगसिद्ध मुंजे
9423535294









