Monday, June 8, 2026
Navprabhatnews
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • क्राईम
  • कृषी
  • आरोग्य
No Result
View All Result
Navprabhatnews
No Result
View All Result

श्री भगवंत मंदिर तीर्थक्षेत्र विकास कामांना मंजुरी देणार- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

संपादक-अमोगसिध्द मुंजे by संपादक-अमोगसिध्द मुंजे
April 28, 2026
in सोलापूर
0
श्री भगवंत मंदिर तीर्थक्षेत्र विकास कामांना मंजुरी देणार- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
0
SHARES
64
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भगवंत मंदिर येथे महापूजा व घरकूल लाभार्थ्यांना घराच्या चावीचे वितरण 

सोलापूर:- बार्शी शहर भगवंत मंदिरासाठी प्रसिद्ध आहे. भगवान विष्णूला समर्पित आणि बाराव्या शतकातील या हेमाडपंती शैलीतील मंदिराचा विकास आराखडा प्रशासनाकडे सादर झालेला आहे. हा आराखडा राज्य शिखर समितीकडे आल्यानंतर त्यात प्रस्तावित केलेली कामे व निधीप्रमाणे शासनाकडून मंजुरी देण्यात येईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी दिली.
बार्शी येथील श्री भगवंत मंदिर येथे श्री भगवंत प्रकट दिनानिमित्त आयोजित महापूजा मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्या हस्ते करण्यात आली. त्यानंतर बार्शी शहरात प्रधानमंत्री आवास योजना व रमाई आवास योजनेअंतर्गत घरकूल लाभार्थ्यांना मुख्यमंत्री महोदयांच्या हस्ते घराच्या चावीचे वितरण करण्यात आले. यावेळी पालकमंत्री जयकुमार गोरे, सोलापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष दीपक वैद्य, धाराशीव जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा अर्चनाताई पाटील, माजी आमदार राजेंद्र राऊत, सोलापूर जिल्हाधिकारी कार्तिकियेन एस., बार्शी नगरपरिषदेच्या नगराध्यक्ष श्रीमती तेजस्वीनी कथले आदी उपस्थित होते.
विष्णु पुराणातही या परिसरात आढळून येतो. प्राचीन काळापासून आलेल्या लोकपरंपरा, अध्यात्म तसेच ऐतिहासिक व सांस्कृतिक ठेवा जपणे हे गरजेचे आहे. या सांस्कृतिक ठेव्याला जनतेपर्यंत आणण्यासाठी तयार करण्यात आलेल्या आराखड्याला मान्यता देण्यात येईल आणि श्री भगवंत मंदिर तीर्थ क्षेत्र विकास आराखडयातून या भागाचा विकास करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.
प्रारंभी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते श्री भगवंत यांची महापूजा व आरती करण्यात आली. यावेळी मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते.

__________
नवप्रभात न्युज पोर्टल ला बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा.

संपादक :- अमोगसिद्ध मुंजे
9423535294

Previous Post

१२ मे पर्यंत तापमान वाढीची शक्यता, हवामान विभागाकडून हाय अलर्ट

Next Post

लोकप्रतिनिधींनो, पारदर्शी कामांना प्राधान्य द्या.. मुख्यमंत्र्यांचे लोकप्रतिनीधींना कानपिचक्या

संपादक-अमोगसिध्द मुंजे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

साक्षी भैरामडगी वळसंगच्या एक दिवसाच्या सरपंच

साक्षी भैरामडगी वळसंगच्या एक दिवसाच्या सरपंच

June 6, 2026
शिवरायांनी अठरापगड जातींच्या लोकांना एकत्र करून स्वराज्य उभारले- पालकमंत्री

शिवरायांनी अठरापगड जातींच्या लोकांना एकत्र करून स्वराज्य उभारले- पालकमंत्री

June 6, 2026
मंद्रूपच्या तहसीलदारांवर “वाॅच”

औराद महसूल मंडळात अवैध मुरूम उपशाचा धुमाकूळ

June 5, 2026
हयात प्रमाणपत्रासाठी लाभार्थ्यांचे हेलपाटे कमी होणार !

हयात प्रमाणपत्रासाठी लाभार्थ्यांचे हेलपाटे कमी होणार !

June 5, 2026
वारी काळात अधिकारी व कर्मचारी यांना रजा नाही , मोबाईल बंद ठेवल्यास कारवाई – विभागीय आयुक्त शितल तेली – उगले

वारी काळात अधिकारी व कर्मचारी यांना रजा नाही , मोबाईल बंद ठेवल्यास कारवाई – विभागीय आयुक्त शितल तेली – उगले

June 5, 2026
‘गोकुळ’च्या थकीत बिलासाठी शेतकर्‍यांचे अर्धनग्न आंदोलन

‘गोकुळ’च्या थकीत बिलासाठी शेतकर्‍यांचे अर्धनग्न आंदोलन

June 4, 2026
28 हजार 298 परीक्षार्थी देणार टीईटी परीक्षा

28 हजार 298 परीक्षार्थी देणार टीईटी परीक्षा

June 4, 2026
“सावकारां”च्या वाढदिवसाला रक्तदात्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

“सावकारां”च्या वाढदिवसाला रक्तदात्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

June 4, 2026

राजकारण

No Content Available
Load More

वेबसाईट दर्शक