सोलापूरमध्ये मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत विजयी व कृतज्ञता मेळावा संपन्न
सोलापूर..
सोलापूरचा हा विजय विकासाचा विजय असून ज्यांचा विकासावर विश्वास आहे अशांचा विजय आहे . लोक जसं तुमच्या विकासाकडे पाहतात तसेच तुमच्या व्यवहाराकडे सुद्धा पाहतात विकास कमी झाला तरी चालेल तुमच्या व्यवहार कसा आहे हे महत्त्वाचे आहे लोकांना सन्मान मिळाला पाहिजे. पारदर्शी आणि प्रामाणिकपणे काम झालं पाहिजे. कुठल्याही प्रकारचा भ्रष्टाचार आम्ही खपवून घेणार नाही, या ठिकाणी एखाद्याला पदावरून काढावं लागलं तरी हरकत नाही, पण पारदर्शी आणि प्रामाणिकपणे काम करण्यासाठी निवडून दिले आहे. त्यामुळे लक्षात ठेवा, असेही मुख्यमंत्री म्हणाले.
भारतीय जनता पार्टीला सोलापूर शहरात महानगरपालिका जिल्ह्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत मिळालेल्या ऐतिहासिक यशानंतर पहिल्यांदाच देवेंद्र फडणवीस सोलापूर दौऱ्यावर आले होते त्यांच्या उपस्थितीत कृतज्ञता आणि विजय संकल्प मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पालकमंत्री जयकुमार गोरे आमदार विजयकुमार देशमुख आमदार सुभाष देशमुख आमदार सचिन कल्याण शेट्टी आमदार देवेंद्र कोठे यांच्यासह भाजपचे पदाधिकारी व आजी-माजी लोक आमदार खासदार उपस्थित होते .
__________
नवप्रभात न्युज पोर्टल ला बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा.
संपादक :- अमोगसिद्ध मुंजे
9423535294









