Sunday, June 7, 2026
Navprabhatnews
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • क्राईम
  • कृषी
  • आरोग्य
No Result
View All Result
Navprabhatnews
No Result
View All Result

दीड एकर परीसरात मंद्रूपला सुसज्ज बसस्थानक होणार !

संपादक-अमोगसिध्द मुंजे by संपादक-अमोगसिध्द मुंजे
April 29, 2026
in सोलापूर
0
दीड एकर परीसरात मंद्रूपला सुसज्ज बसस्थानक होणार !
0
SHARES
64
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

आमदार देशमुख यांच्या प्रयत्नामुळे मंद्रूपकरांच्या अपेक्षा पूर्ण होणार …

सोलापूर…
मंद्रूप व परिसरातील गावांच्या लोकसंख्या वाढीमुळे दिवसेंदिवस प्रवास वाढत आहे . त्यामुळे सीना भीमा खोऱ्यातील लोकांच्या सोयीसाठी मंद्रूप येथे नवीन बस स्थानक होण्याची गरज आहे. दहा— पंधरा वर्षापासून मंद्रूप येथील नवीन बस स्थानकाची मागणी होत आहे . यासाठी ग्रामपंचायतकडून पाठपुरावा सुरू आहे. मात्र प्रशासकीय अडथळ्यांमुळे बस स्थानकास विलंब होत आहे . आमदार सुभाष देशमुख यांनी मंद्रूपच्या नवीन बसस्थानकाला प्राधान्य दिले असून भंडारकवठे रस्त्यालगत असणार्‍या गावतलावा जवळील दीड एकर परिसरात नवीन सुसज्ज बस स्थानक होणार असल्याची माहिती भाजपाचे गौरीशंकर मेंडगुदले यांनी दिली.
आमदार सुभाष देशमुख यांच्या कार्यालयात परीवहन विभागाचे उपअभियंता तुषार चौधरी व विभागीय व्यवस्थापक अमोल गोंजारी यांच्याबरोबर मंद्रूप बसस्थानकासंदर्भात बैठक झाली. यावेळी मेंडगुदले यांनी नवीन बसस्थानकासाठी ग्रामपंचायतकडून ठराव व जागेचा उतारा देण्यात आले असून प्रस्ताव मंजूरीबाबत विचारणा केली. त्यावेळी परीवहन अधिकार्‍यांनी मंद्रूप बसस्थानकाचा प्रस्ताव महा व्यवस्थापकाकडे पाठविण्यात आले असून परीवहन मंत्र्यांच्या मंजूरीनंतर बसस्थानक सुरू होणार असल्याचे सांगितले. त्यामुळे लवकरच मंद्रूपमध्ये बसस्थानक सुरू होणार असल्याने प्रवाशांची सोय होणार आहे. यामुळे अनेक वर्षापासून मंद्रूपचा प्रलंबित असणारा नवीन बसस्थानकाचा विषय निकाली निघणार असल्याचे मेंडगुदले यांनी सांगितले.

__________
नवप्रभात न्युज पोर्टल ला बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा.

संपादक :- अमोगसिद्ध मुंजे
9423535294

Previous Post

सामंजस्य आणि तडजोडीने जीवन सुखी बनवूया

Next Post

दक्षिणच्या विकासाला मिळणार गती , प्रलंबित विकासकामांसाठी मिळणार निधी !

संपादक-अमोगसिध्द मुंजे

संपादक-अमोगसिध्द मुंजे

Next Post
दक्षिणच्या विकासाला मिळणार गती , प्रलंबित विकासकामांसाठी मिळणार निधी !

दक्षिणच्या विकासाला मिळणार गती , प्रलंबित विकासकामांसाठी मिळणार निधी !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

साक्षी भैरामडगी वळसंगच्या एक दिवसाच्या सरपंच

साक्षी भैरामडगी वळसंगच्या एक दिवसाच्या सरपंच

June 6, 2026
शिवरायांनी अठरापगड जातींच्या लोकांना एकत्र करून स्वराज्य उभारले- पालकमंत्री

शिवरायांनी अठरापगड जातींच्या लोकांना एकत्र करून स्वराज्य उभारले- पालकमंत्री

June 6, 2026
मंद्रूपच्या तहसीलदारांवर “वाॅच”

औराद महसूल मंडळात अवैध मुरूम उपशाचा धुमाकूळ

June 5, 2026
हयात प्रमाणपत्रासाठी लाभार्थ्यांचे हेलपाटे कमी होणार !

हयात प्रमाणपत्रासाठी लाभार्थ्यांचे हेलपाटे कमी होणार !

June 5, 2026
वारी काळात अधिकारी व कर्मचारी यांना रजा नाही , मोबाईल बंद ठेवल्यास कारवाई – विभागीय आयुक्त शितल तेली – उगले

वारी काळात अधिकारी व कर्मचारी यांना रजा नाही , मोबाईल बंद ठेवल्यास कारवाई – विभागीय आयुक्त शितल तेली – उगले

June 5, 2026
‘गोकुळ’च्या थकीत बिलासाठी शेतकर्‍यांचे अर्धनग्न आंदोलन

‘गोकुळ’च्या थकीत बिलासाठी शेतकर्‍यांचे अर्धनग्न आंदोलन

June 4, 2026
28 हजार 298 परीक्षार्थी देणार टीईटी परीक्षा

28 हजार 298 परीक्षार्थी देणार टीईटी परीक्षा

June 4, 2026
“सावकारां”च्या वाढदिवसाला रक्तदात्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

“सावकारां”च्या वाढदिवसाला रक्तदात्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

June 4, 2026

राजकारण

No Content Available
Load More

वेबसाईट दर्शक