आमदार देशमुख व मुख्यमंत्री फडणवीस यांच्यात बंद दाराआड चर्चा
सोलापूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मंगळवारी सोलापूर दौऱ्यावर आले असताना त्यांनी सभेपूर्वी आमदार सुभाष देशमुख यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. या भेटीमुळे स्थानिक राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली असली तरी आमदार देशमुख यांनी सोलापूर दक्षिण मतदारसंघा तील विविध विकासकामांसाठी व नवीन विकासकामांची मागणी केल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे दक्षिणमधील प्रलंबित विकासकामे मार्गी लागणार असल्याची चर्चा सुरू आहे.
मुख्यमंत्री फडणवीस नवनिर्वाचित लोकप्रतिनिधी सत्कार व कृतज्ञता मेळाव्याला जाण्यापूर्वी आ.देशमुख यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. यावेळी बाजार समितीचे संचालक मनीष देशमुख तसेच भाजपचे युवा नेते रोहन देशमुख यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांचा सत्कार करून स्वागत केले.
यानंतर बंद दाराआड झालेल्या बैठकीत आमदार देशमुख आणि मुख्यमंत्री फडणवीस यांच्यात सोलापूर शहरातील प्रलंबित प्रश्न, विविध विकासकामांची गती, पायाभूत सुविधांशी संबंधित मुद्दे तसेच स्थानिक राजकीय घडामोडींवर १५ ते २० मिनिटे सविस्तर चर्चा झाल्याचे सांगण्यात येते. तसेच यावेळी मंद्रूप एमआयडीसी, होटगी आयटी पार्क, मंद्रूप नवीन बसस्थानक, वडापूर बॅरेजेस, मंद्रूप ट्रामा केअर सेंटर , कुडल तीर्थक्षेत्र, रस्त्यांसाठी निधी यासह इतर अनेक विषयावर चर्चा झाल्याचे सांगण्यात येते.
…………………………..
नवप्रभात न्युज पोर्टल ला बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा.
संपादक :- अमोगसिद्ध मुंजे
9423535294









