Sunday, June 7, 2026
Navprabhatnews
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • क्राईम
  • कृषी
  • आरोग्य
No Result
View All Result
Navprabhatnews
No Result
View All Result

बांधकाम कामगार कार्यालयात एजंटाना “नो एन्ट्री”

संपादक-अमोगसिध्द मुंजे by संपादक-अमोगसिध्द मुंजे
April 29, 2026
in सोलापूर
0
बांधकाम कामगार कार्यालयात एजंटाना “नो एन्ट्री”

filter: 0; fileterIntensity: 0.0; filterMask: 0; captureOrientation: 0; brp_mask:0; brp_del_th:null; brp_del_sen:null; delta:null; module: photo;hw-remosaic: false;touch: (-1.0, -1.0);sceneMode: 32768;cct_value: 0;AI_Scene: (-1, -1);aec_lux: 0.0;aec_lux_index: 0;albedo: ;confidence: ;motionLevel: -1;weatherinfo: null;temperature: 40;

0
SHARES
130
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

पारदर्शक कारभारावर भर .. मंगेश झोले

सोलापूर …,
सोलापूर बांधकाम कामगार कार्यालयात यापूर्वी खासगी एजंटांचा सुळसुळाट होता .यामुळे कोट्यावधी रुपयांचा भ्रष्टाचार उघडकीस आला आहे. खासगी एजंटांच्या गराड्यात बांधकाम कामगार कार्यालयाचे कामकाज चालत होते. त्यामुळे भांडी वाटप, शिष्यवृत्ती अनुदान व वैद्यकीय उपचार बिल यामध्ये भ्रष्टाचार सुरु होता . त्यामुळे सर्व एजंटांना कार्यालयात बंदी केल्यामुळे भ्रष्टाचार विरहीत पारदर्शक कारभार सुरू असल्याची माहिती सोलापूरचे सहायक कामगार आयुक्त तथा इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाचे जिल्हा कार्यकारी अधिकारी मंगेश झोले यांनी दिली.
यावेळी सहायक आयुक्त झोले म्हणाले की, बांधकाम कामगार हा सामान्य व गरीब कुटुंबातील सदस्य असतो . एजंट त्यांच्याकडून भरमसाठ पैसे घेऊन कार्यालयात चुकीची कामे करतात. तसेच बांधकाम कामगारांना विविध योजना, शिष्यवृत्ती व वैद्यकीय उपचार बिलाचे आमिष दाखवून नियमबाह्य कामकाज करण्याचा प्रयत्न करतात. यामुळे बांधकाम कामगार कार्यालयातही नियमबाह्य कामे झाल्याचे निदर्शनास आले आहे. पदभार घेण्यापूर्वी सोलापूरचा बांधकाम कामगार कार्यालय एजंटांच्या विळख्यात सापडला होता. मात्र पदभार घेतल्यानंतर सर्व अधिकारी व कर्मचार्‍यांशी सहकार्याने एजंटांना कार्यालयात बंदी केला आहे . तसेच कोणत्याही प्रकारच्या संघटना प्रतिनिधींना बांधकाम कामगारांच्या संदर्भात चौकशी करण्यासही मनाई करण्यात आली आहे . त्यामुळे बांधकाम कामगारांनी प्रत्यक्ष बांधकाम नोंदणी अधिकाऱ्यांशी संपर्क साधून स्वतःची कामे करून घ्यावीत असे आवाहन झोले यांनी केला आहे.
…
चौकट
..
बांधकाम कामगारांनी कार्यालयाशी संपर्क साधावे
…
यापूर्वी एजंटामुळे बांधकाम कामगार कार्यालयात चुकीची कामे झाल्याने भ्रष्टाचार उघडकीस आला आहे. नोंदणी केलेल्या अथवा नूतनीकरणासह बांधकाम कामगार कार्यालयाशी संबंधित कामे असणार्‍या कामगारांनी बांधकाम कामगार कार्यालयातील नोंदणी अधिकाऱ्यांशी संपर्क साधून कामे करून घ्यावीत . कोणत्याही प्रकारच्या एजंटाची मदत घेऊ नये .

मंगेश झोले, सहायक आयुक्त, बांधकाम कामगार, सोलापूर

__________
नवप्रभात न्युज पोर्टल ला बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा.

संपादक :- अमोगसिद्ध मुंजे
9423535294

Previous Post

दक्षिणच्या विकासाला मिळणार गती , प्रलंबित विकासकामांसाठी मिळणार निधी !

Next Post

समाजकल्याणच्या योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवा.. सभापती संस्कृती सातपुते

संपादक-अमोगसिध्द मुंजे

संपादक-अमोगसिध्द मुंजे

Next Post
समाजकल्याणच्या योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवा.. सभापती संस्कृती सातपुते

समाजकल्याणच्या योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवा.. सभापती संस्कृती सातपुते

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

साक्षी भैरामडगी वळसंगच्या एक दिवसाच्या सरपंच

साक्षी भैरामडगी वळसंगच्या एक दिवसाच्या सरपंच

June 6, 2026
शिवरायांनी अठरापगड जातींच्या लोकांना एकत्र करून स्वराज्य उभारले- पालकमंत्री

शिवरायांनी अठरापगड जातींच्या लोकांना एकत्र करून स्वराज्य उभारले- पालकमंत्री

June 6, 2026
मंद्रूपच्या तहसीलदारांवर “वाॅच”

औराद महसूल मंडळात अवैध मुरूम उपशाचा धुमाकूळ

June 5, 2026
हयात प्रमाणपत्रासाठी लाभार्थ्यांचे हेलपाटे कमी होणार !

हयात प्रमाणपत्रासाठी लाभार्थ्यांचे हेलपाटे कमी होणार !

June 5, 2026
वारी काळात अधिकारी व कर्मचारी यांना रजा नाही , मोबाईल बंद ठेवल्यास कारवाई – विभागीय आयुक्त शितल तेली – उगले

वारी काळात अधिकारी व कर्मचारी यांना रजा नाही , मोबाईल बंद ठेवल्यास कारवाई – विभागीय आयुक्त शितल तेली – उगले

June 5, 2026
‘गोकुळ’च्या थकीत बिलासाठी शेतकर्‍यांचे अर्धनग्न आंदोलन

‘गोकुळ’च्या थकीत बिलासाठी शेतकर्‍यांचे अर्धनग्न आंदोलन

June 4, 2026
28 हजार 298 परीक्षार्थी देणार टीईटी परीक्षा

28 हजार 298 परीक्षार्थी देणार टीईटी परीक्षा

June 4, 2026
“सावकारां”च्या वाढदिवसाला रक्तदात्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

“सावकारां”च्या वाढदिवसाला रक्तदात्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

June 4, 2026

राजकारण

No Content Available
Load More

वेबसाईट दर्शक