Sunday, June 7, 2026
Navprabhatnews
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • क्राईम
  • कृषी
  • आरोग्य
No Result
View All Result
Navprabhatnews
No Result
View All Result

समाजकल्याणच्या योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवा.. सभापती संस्कृती सातपुते

संपादक-अमोगसिध्द मुंजे by संपादक-अमोगसिध्द मुंजे
April 30, 2026
in सोलापूर
0
समाजकल्याणच्या योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवा.. सभापती संस्कृती सातपुते
0
SHARES
13
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

समाजकल्याण विभागाचा आढावा बैठक संपन्न

सोलापूर- जिल्हा परिषदेचा समाजकल्याण विभाग हा ग्रामीण जीवनातील योजनांचा अंमलबजावणी करणारा महत्वाचा विभाग आहे. या विभागाच्या लोककल्याणकारी योजना गरीब व गरजू लाभार्थ्यांपर्यत तसेच शालेय विद्यार्थी व विद्यार्थीनी तसेच दिव्यांग यांच्यापर्यत पोहोचविण्यासाठी हा विभाग सदैव तत्पर राहील . त्यासाठी प्रशासन व लोकप्रतिनिधी यांच्या सहकार्याची भुमिका अतिशय महत्वाची आहे. असे प्रतिपादन जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागाच्या समितीच्या समन्वय सभेमध्ये समाज कल्याण सभापती संस्कृती सातपुते यांनी केले.
जिल्हा परिषदेच्या शिवरत्न सभागृहामध्ये आयोजीत करण्यात आलेल्या समाजकल्याण समितीच्या बैठकीमध्ये समाजकल्याण सभापती सातपुते या बोलत होत्या. यावेळी समाजकल्याण समिती सदस्य तथा जिल्हा परिषद सदस्य सुप्रिया गायकवाड, सिंधुताई आलदर, करुणा शिवशरण, सविता उंबरजे, श्रुती भोरगुंडे, तेजस्वीनी बोराडे, शिवानी स्वामी, प्रशांत पाटील, नंदकुमार वाघमारे, प्रभारी जिल्हा समाज कल्याण अधिकारी प्रसाद मिरकले, समाजकल्याण विभागाच्या सहाय्यक आयुक्त सुलोचना सोनवणे यांच्यासह समाजकल्याण विभागातील जिल्हा व तालुका स्तरावरील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
सदर बैठकीमध्ये जिल्हा परिषदेचा सन 2025-26 मध्ये 20% मागासवर्गीय कल्याण व 5% दिव्यांग कल्याण योजनाना सन 2026-27 मध्ये मुदतवाढ, सन 2026-27 मधील मुळ अंदाजपत्रकानुसार घेण्यात आलेल्या विविध योजनांतर्गत प्रशासकिय व तांत्रिक मान्यता, अनु-जाती व नवबौध्द घटकांच्या वस्त्यांचा विकास करणे योजनेतर्गत सन 2025-26 अंशत: काम बदल/ वस्ती बदल प्रस्तावास मान्यता, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्ताह साजरा करणेबाबत खर्चास जिल्हा परिषद सेस 2026-27 मधुन तरतुदीस समाजकल्याण समितीची मंजूरी देण्यात आली. यावेळी समितीचे सदस्य सचिव तथा जिल्हा समाजकल्याण अधिकारी प्रसाद मिरकले यांनी विभागाचा आढावा सभेपुढे सादर केला ._

_________

नवप्रभात न्युज पोर्टलला बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा.

संपादक :- अमोगसिद्ध मुंजे
9423535294

Previous Post

बांधकाम कामगार कार्यालयात एजंटाना “नो एन्ट्री”

Next Post

अकोले (मं.) येथे शुक्रवारी जंगी कुस्त्यांचे मैदान

संपादक-अमोगसिध्द मुंजे

संपादक-अमोगसिध्द मुंजे

Next Post
अकोले (मं.) येथे शुक्रवारी जंगी कुस्त्यांचे मैदान

अकोले (मं.) येथे शुक्रवारी जंगी कुस्त्यांचे मैदान

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

साक्षी भैरामडगी वळसंगच्या एक दिवसाच्या सरपंच

साक्षी भैरामडगी वळसंगच्या एक दिवसाच्या सरपंच

June 6, 2026
शिवरायांनी अठरापगड जातींच्या लोकांना एकत्र करून स्वराज्य उभारले- पालकमंत्री

शिवरायांनी अठरापगड जातींच्या लोकांना एकत्र करून स्वराज्य उभारले- पालकमंत्री

June 6, 2026
मंद्रूपच्या तहसीलदारांवर “वाॅच”

औराद महसूल मंडळात अवैध मुरूम उपशाचा धुमाकूळ

June 5, 2026
हयात प्रमाणपत्रासाठी लाभार्थ्यांचे हेलपाटे कमी होणार !

हयात प्रमाणपत्रासाठी लाभार्थ्यांचे हेलपाटे कमी होणार !

June 5, 2026
वारी काळात अधिकारी व कर्मचारी यांना रजा नाही , मोबाईल बंद ठेवल्यास कारवाई – विभागीय आयुक्त शितल तेली – उगले

वारी काळात अधिकारी व कर्मचारी यांना रजा नाही , मोबाईल बंद ठेवल्यास कारवाई – विभागीय आयुक्त शितल तेली – उगले

June 5, 2026
‘गोकुळ’च्या थकीत बिलासाठी शेतकर्‍यांचे अर्धनग्न आंदोलन

‘गोकुळ’च्या थकीत बिलासाठी शेतकर्‍यांचे अर्धनग्न आंदोलन

June 4, 2026
28 हजार 298 परीक्षार्थी देणार टीईटी परीक्षा

28 हजार 298 परीक्षार्थी देणार टीईटी परीक्षा

June 4, 2026
“सावकारां”च्या वाढदिवसाला रक्तदात्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

“सावकारां”च्या वाढदिवसाला रक्तदात्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

June 4, 2026

राजकारण

No Content Available
Load More

वेबसाईट दर्शक