अवैद्य वाळू व मुरूम वाहनचालकांकडून तहसील कार्यालयात हेलपाटे
दक्षिण सोलापूर…
मंद्रूप व औराद सर्कलमधील गावातून नवीन रस्त्यासाठी अवैद्य मुरूम व सीना नदीपात्रा तील वाळू उपसा करणाऱ्या वाहनचालकांकडून मंद्रूपच्या तहसीलदारांवर “वाॅच” ठेवण्यात येत असल्याचे दिसून येत आंहे. मंद्रूप तहसीलदारांची चौकशी करण्यासाठी मंद्रूप व बसवनगर येथील वाहनचालकांचे अप्पर तहसील कार्यालयात “ठिया” दिसून येत आहे. औराद सर्कलमध्ये बंकलगी व राजूर शिवारात मंडल अधिकार्यांशी संगनमत करून मोठ्या प्रमाणात मुरूम उपसा करण्यात आला आहे. राजूर ते बंकलगी शिवारात रस्त्यालगत मुरूम उपसा केलेली खड्डे मोठ्या प्रमाणात दिसून येतात. मंडल अधिकार्यांच्या “आशीर्वादा”ने मुरूम उपसा सुरू असल्याची चर्चा सुरू आहे.
औराद सर्कलमध्ये राजूर, बंकलगी, औराद, नांदणी, बरूर यासह इतर रस्त्यांसाठी मोठ्या प्रमाणात अवैद्य मुरूम उपसा झाल्यानंतरही मंडल अधिकार्यांकडून अद्याप दंडात्मक कारवाई न झाल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. मंडल अधिकार्याच्या मनमानी कारभारामुळे शासनाचा कोट्यावधी रूपयांचा कर बुडत आहे. त्यामुळे तहसीलदारांवर “वाॅॅच” ठेऊन मुरूम उपसा करण्यात येत आहे.
विशेष म्हणजे औरादचे मंडल अधिकारी रजेवर गेल्यानंतर व पदभार हस्तांतर होण्यापूर्वी दोन दिवस मोठ्या प्रमाणात मुरूम उपसा करण्यात आला आहे. यावेळी तलाठ्यांकडून जाणिवपूर्वक दुर्लक्ष झाल्याने मुरूम उपसा होत असल्याचे सांगण्यात येते. तहसीलदार मंद्रूप कार्यालयात गैरहजर असल्यावर व शनिवार आणि रविवार सुट्टीच्या दिवशी बंकलगी शिवारातून मुरूम उपसा करण्यात येत आहे. यावर भरारी पथकाकडून कारवाई झाल्याचे आढळून आले नाही. त्यामुळे मंडल अधिकार्याशी संगनमत करून व तहसीलदारांवर “वाॅच” ठेऊन राॅयल्टी न काढता मुरूम उपसा करण्यात येत आहे.
मंद्रूपमध्येही एका वाहनमालकाचे तहसील कार्यालयात ये जा सुरू असते. त्याच्याकडूनही तहसीलदारां बाबत चौकशी झाल्याचे कर्मचार्यांकडून सांगण्यात येते. तहसीलदारांनी कारवाई करू नये, म्हणून जुजबी राॅयल्टी काढून रात्री मोठ्या प्रमाणात मुरूम उपसा करीत असल्याचे दिसून येते. माळकवठे, कारकल, तेलगाव, वडापूर व कंदलगाव यासह इतर रस्त्यांसाठी त्या वाहनचालकाकडून मुरूम उपसा झाल्याची चर्चा सुरू आहे. मंद्रूपचे मंडल अधिकारी भरारी पथकात असताना “त्या” वाहन चालकावर कारवाई आढळून येत नसल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येते. सेवालाल चौकातील त्या वाहनचालकाचा “रात्रीस खेळ चाले” म्हणत सर्व यंत्रणा रात्रभर काम करीत असते. दोन वर्षापूर्वी या वाहनचालकावर दंडात्मक कारवाई झाल्यानंतरही अवैद्य मुरूम उपसा सुरूच आहे. महसूल विभागातील अधिकारी व कर्मचार्यांशी “संगनमत” करून शासनाची राॅयल्टी बुडविण्यात येत आहे. त्यामुळे तहसीलदारांवर “वाॅच” ठेवण्यासाठी या वाहनचालकाचे तहसील कार्यालयात ठिया असल्याचे दिसून येते.
भीमा नदीपात्रातील भंडारकवठे, लवंगी, चिंचपूर व तेलगाव या ठिकाणातील वाळूचे लिलाव करण्यात आले आहे. मात्र राॅयल्टी देण्याचे टाळण्यासाठी मंद्रूपमधील अनेक वाहनचालक तलाठी, मंडल अधिकारी व पोलीसांच्या संगनमताने रात्री सीना नदीपात्रातील वाळू उपसा करीत आहेत. त्यामुळे मंद्रूप व औराद मंडलमध्ये अवैद्य मुरूम व वाळू उपसाला ऊत आल्यामुळे व तहसीलदारांवर “वाॅच” ठेवण्यात येत असल्यामुळे तहसीलदार विष्णु बुटे यांनी स्वता भरारी पथकात सहभागी होऊन दंडात्मक कारवाई करण्याची मागणी होत आहे.
__________
नवप्रभात न्युज पोर्टल ला बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा.
संपादक :- अमोगसिद्ध मुंजे
9423535294









