झेडपीची स्थायी समिती सभा संपन्न
सोलापूर..
जिल्हा परिषद सोलापूर शिवरत्न सभागृह येथे स्थायी समितीची सभा उत्साहात व शिस्तबद्ध वातावरणात पार पडली. सभेला अध्यक्ष तथा सभापती स्थायी समिती दीपक वैद्य अध्यक्षस्थानी होते.
सभे उपाध्यक्ष तथा सभापती अर्थ व बांधकाम समिती इंद्रजीत पवार, सभापती शिक्षण व आरोग्य समिती चेतनसिंह केदार सावंत, सभापती कृषी, पशुसंवर्धन व दुग्धशाळा समिती रामपा चिवडशेट्टी, सभापती महिला व बालकल्याण समिती अमृता वाघे उपस्थित होते.
तसेच जिल्हा परिषद सदस्य पृथ्वीराज माने, शांभवी कल्याणशेट्टी, आदिनाथ देशमुख, रश्मी बागल, बालाजी नरुटे, दादासाहेब लवटे, सविता उंबरजे, रमेश भांजे यांच्यासह मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी एस. एन. कोहिनकर, प्रकल्प संचालक चंद्रशेखर जगताप, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (प्रशासन) व सदस्य सचिव स्मिता पाटील उपमुख्य कार्यकारी अधिकारी पंचायत सूर्यकांत भुजबळ, मुख्य लेखा वित्त अधिकारी मीनाक्षी वाकडे यांच्यासह सर्व विभाग प्रमुख उपस्थित होते.
यावेळी विभाग प्रमुखांनी शासनाकडून प्राप्त महत्त्वाची परिपत्रके व शासन निर्णयांचे वाचन करून त्यांची अंमलबजावणी करण्याबाबत चर्चा केली. ग्रामीण भागातील आरोग्य सुविधा अधिक सक्षम करणे, प्राथमिक आरोग्य केंद्रे व उपकेंद्रांतील सेवा सुधारणा, औषधसाठा, मनुष्यबळ उपलब्धता, तसेच नागरिकांना दर्जेदार आरोग्यसेवा मिळावी यासाठी आवश्यक उपाययोजनांवर चर्चा करण्यात आली. विविध विभागांतील सुरू असलेल्या विकासकामांचा सविस्तर आढावा घेऊन कामांची गती, गुणवत्ता आणि पारदर्शकता यावर विशेष भर देण्याची सूचना करण्यात आली.
__________
नवप्रभात न्युज पोर्टल ला बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा.
संपादक :- अमोगसिद्ध मुंजे
9423535294









