Monday, September 21, 2026
Navprabhatnews
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • क्राईम
  • कृषी
  • आरोग्य
No Result
View All Result
Navprabhatnews
No Result
View All Result

तहसीलदारांनी गावात जाऊन जनतेचे प्रश्न मार्गी लावावेत … महसूल मंत्री बावनकुळे

संपादक-अमोगसिध्द मुंजे by संपादक-अमोगसिध्द मुंजे
May 10, 2026
in सोलापूर
0
तहसीलदारांनी गावात जाऊन जनतेचे प्रश्न मार्गी लावावेत … महसूल मंत्री बावनकुळे
0
SHARES
50
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते सह दुय्यम निबंधक कार्यालयाचे उद्घाटन

सोलापूर: – राज्यात पूर्वीपासून गृह खाते हे जनतेच्या जीवाचे रक्षण करते, तर महसूल खाते जनतेच्या मालमत्तेचे रक्षण करत असते, या सरकारच्या धोरणानुसार तहसीलदारांनी तालुक्यातील प्रत्येक गावात जाऊन जनतेचे प्रश्न गावातच मार्गी लावावेत, असे प्रतिपादन राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले.
करमाळा येथील सह दुय्यम निबंधक कार्यालयाच्या नूतन इमारतीचे उद्घाटन महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते करण्यात आले. घरकुलाच्या बांधकामासाठी वाळूचे प्रतिनिधिक स्वरूपात वाटप करण्यात आले. याप्रसंगी ते बोलत होते यावेळी आमदार नारायण पाटील, माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, जिल्हा परिषद सदस्य गणेश चिवटे, जिल्हा परिषद पक्षनेत्या रश्मीताई बागल,जिल्हाधिकारी एस कार्तिकेयन, निवासी उपजिल्हाधिकारी अभिजीत पाटील, प्रांताधिकारी जयश्री आव्हाड, तहसीलदार शिल्पा ठोकडे, सह दुय्यम निबंधक एस. एस. कोकाटे आदी मान्यवर व अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी महसूल मंत्री बावनकुळे म्हणाले कि , जनतेने गाऱ्हाणी घेऊन मंत्रालयात जाण्याऐवजी मंत्र्यांनी गावात जाऊन जनतेचे निवेदन तक्रारी स्वीकारणे व सोडवणे हे या सरकारचे धोरण आहे. पुढील चार महिन्यात जिल्ह्यातील एकही गाव यातून सुटणार नाही याची खबरदारी जिल्हाधिकारी यांनी घ्यावी. यापुढे मोजणी प्रक्रियेत गतिमानता येण्यासाठी पंधरा दिवसात मोजणी पूर्ण करणे जिल्ह्यातील पाणंद रस्ते व वहीवाटीचे रस्ते जिल्हाधिकारी, तहसीलदार, तलाठी यांनी पालकमंत्र्यांशी समन्वय साधून प्रत्येक रस्ते शोधून त्यांची मोजणी करून शेतकऱ्यांच्या वहिवाटीसाठी सुरू करावेत. तसेच रस्त्याच्या बाजूवा झाडे लावावी . जेणेकरून झाडे तोडली जाणार नाहीत व रस्ता बंद होणार नाही. जर कोणी रस्ता अडवला तर त्या व्यक्तीवर कारवाई करण्यात येईल, त्यासाठी जिल्ह्यातील संपूर्ण मोजणी होणे आवश्यक आहे.
नागरिकांनी दिलेल्या, नियमात असलेल्या निवेदना वर तीन दिवसात मार्ग काढण्यात येईल असे आश्वासन महसूलमंत्री बावनकुळे यांनी यावेळी नागरिकांना दिले. तसेच देवस्थानाच्या जमिनी बाबत कायद्यात सुधारणा करण्याबाबत त्यांनी सांगितले.
त्याचबरोबर जनतेची जराही हेळसांड करू नये, जनतेचे प्रश्न तात्काळ सोडवावेत तसेच भ्रष्टाचाराच्या कुठल्याही तक्रारी येता कामा नयेत अशा सूचनाही महसूल मंत्री बावनकुळे यांनी केल्या.
__________
नवप्रभात न्युज पोर्टल ला बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा.
संपादक :- अमोगसिद्ध मुंजे
9423535294

Previous Post

टाकळीतील सिमेंट रस्त्यात घोटाळा ?

Next Post

सोलापूर झेडपीकडून सोमवारी “नो व्हेईकल डे”

संपादक-अमोगसिध्द मुंजे

संपादक-अमोगसिध्द मुंजे

Next Post
सोलापूर झेडपीकडून सोमवारी “नो व्हेईकल डे”

सोलापूर झेडपीकडून सोमवारी "नो व्हेईकल डे"

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

दुष्काळी पंचनाम्या वर होणार परिणाम,

दुष्काळी पंचनाम्या वर होणार परिणाम,

September 21, 2026
सिद्धेश्वर कारखान्यावर “थकीत उसबीला”साठी आंदोलन

सिद्धेश्वर कारखान्यावर “थकीत उसबीला”साठी आंदोलन

September 21, 2026
ठेचा भाकरी आंदोलनातून संभाजी ब्रिगेडने दुष्काळाकडे वेधले लक्ष

ठेचा भाकरी आंदोलनातून संभाजी ब्रिगेडने दुष्काळाकडे वेधले लक्ष

September 21, 2026
“फाईव्ह स्टार” शाळा निर्मितीसाठी दक्षिण पंचायत समितीचा पुढाकार,  इंग्रजी विषयाची भीती दूर करण्यासाठी बीडीओंकडून नवोपक्रम राबविण्याच्या सूचना

दक्षिणच्या ५२ गावांचे “कारभारी” !

September 21, 2026
६६४ ग्रामपंचायतींचे “कारभारी” बनले अधिकारी

बदली होऊन दोन महिने झाले तरी शाखा अभियंता खुर्ची सोडेना !

September 19, 2026
सोलापूरचा डंका आंतरराष्ट्रीय स्तरावर!

सोलापूरचा डंका आंतरराष्ट्रीय स्तरावर!

September 19, 2026
सोलापूर जिल्हा होणार प्लास्टिकमुक्त !

सोलापूर जिल्हा होणार प्लास्टिकमुक्त !

September 18, 2026
६६४ ग्रामपंचायतींचे “कारभारी” बनले अधिकारी

६६४ ग्रामपंचायतींचे “कारभारी” बनले अधिकारी

September 18, 2026

राजकारण

No Content Available
Load More

वेबसाईट दर्शक

138285

वृत्त संग्रह

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • About Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • क्राईम
  • कृषी
  • आरोग्य

© Website Design by Digital Buffalo - 9028927697