Thursday, September 17, 2026
Navprabhatnews
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • क्राईम
  • कृषी
  • आरोग्य
No Result
View All Result
Navprabhatnews
No Result
View All Result

चर्मकार समाज विकास मंडळाच्या वतीने रविवारी राज्यस्तरीय वधू-वर परिचय संमेलन

संपादक-अमोगसिध्द मुंजे by संपादक-अमोगसिध्द मुंजे
May 27, 2026
in सोलापूर
0
चर्मकार समाज विकास मंडळाच्या वतीने रविवारी राज्यस्तरीय वधू-वर परिचय संमेलन
0
SHARES
43
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

आंध्र, कर्नाटक, मराठवाडासह पश्चिम महाराष्ट्रातून इच्छुकांची नोंदणी

सोलापूर :
चर्मकार समाज विकास मंडळाच्या वतीने यंदाही समाजातील उपवर, युवक, युवती, घटस्फोटीत, विधवा आणि विधूर यांच्यासाठी राज्यस्तरीय वधू-वर परिचय संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. रविवार, ३१ मे २०२६ रोजी जामगोंडी लॉन्स, आसरा चौक, जुळे सोलापूर येथे हा मोफत वधू-वर परिचय संमेलन आयोजित करण्यात आला आहे. यंदा राज्यस्तरीय वधू-वर परिचय संमेलनाचे दुसरे वर्ष असून आंध्र, कर्नाटक, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रातून वधू-वर आणि त्यांचे पालक उपस्थित राहणार असल्याची माहिती मुख्य निमंत्रक राजशेखर जेऊरकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.
गत वर्षी झालेल्या संमेलनात ९६० वधू-वर यांची नोंदणी झाली हाेती. या मेळाव्याला १६०० पालकांनी उपस्थिती लावली हाेती. मरावाड्यात लातूर, उस्मानाबाद, नांदेड, बीड तर पश्चिम महाराष्ट्रात सोलापूरसह पुणे, कोल्हापूर, सांगली, सातारा आणि मुंबई, ठाणेसह १० जिल्ह्यातून पालक आणि वधू-वरांनी हजेरी लावली होती. याशिवाय आंध्रमधून हैदराबाद आणि कर्नाटकमधून बिदर, कलबुर्गी, विजयपूर येथूनही समजा बांधवांनी, पालकांनी हजेरी लावली हाेती. यंदाही येथून इच्छुक उमेदवार आणि पालक येत आहेत.
रविवार 31 मे रोजी सदर कार्यक्रम होणार असून कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रायगड जिल्ह्याचे उपजिल्हाधिकारी भारत वाघमारे राहणार असून कार्यक्रमाचे उद्घाटन महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण सोलापूरचे अधीक्षक अभियंता सुनील माने यांच्या हस्ते होणार आहे. राष्र्टीय चर्मकार महासंघाचे प्रदेशाध्यक्ष माधव गायकवाड हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. यावेळी पूर्वा वाघमारे, शुभांगी माने, हरिदास टोणपे, सुभाष सावस्कर, दत्ता शिंदे यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.
पत्रकार परिषदेस वधु वर परिचय संमेलन नियोजन समितीचे प्रमुख वामन धुळराव ,परशुराम शिंदे , सदाशिव कांबळे ,काशिनाथ वाघमारे,मल्हारी बनसोडे, दत्ता शिंदे ,शिवपुत्र हरवाळकर ,दत्ता हरवाळकर ,अंबादास वाघमारे,संगीता शिंदे ,सुनिता वनस्कर ,रेवणसिद्ध व्हनमराठे ,शावरप्पा वाघमारे,सुजाता हरवाळकर ,राजश्री कांबळे पोर्णिमा धूळराव , इत्यादी उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिवकुमार तोलनुरे, कल्लप्पा व्हनहुवे ,राजेंद्र कांबळे ,राजू व्हनकोरे आदी निमंत्रक परिश्रम घेत आहेत.

__________________________________
*🛑नवप्रभात न्युज पोर्टल ला बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा*
*संपादक :- अमोगसिद्ध मुंजे*
*9423535294*

Previous Post

जिल्हाधिकारी यांच्या नावाने “फेक” अकाउंट

Next Post

“या” कारणामुळे ४० उमेदवार तीन वर्षासाठी अपात्र

संपादक-अमोगसिध्द मुंजे

संपादक-अमोगसिध्द मुंजे

Next Post
शितल तेली—उगले पुणे विभागीय आयुक्त !

"या" कारणामुळे ४० उमेदवार तीन वर्षासाठी अपात्र

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सेवा संकल्प अभियानाचे पहिले “मानकरी” ठरले शिक्षक

सेवा संकल्प अभियानाचे पहिले “मानकरी” ठरले शिक्षक

September 17, 2026
न्यायासाठी भटक्या समाजावर ऊन्हातच उपोषण करण्याची वेळ !

कंदलगावात मारहाण करून जबरी चोरी

September 17, 2026
दक्षिण पंचायतीपासून “सेवा संकल्प अभियान” सुरू

दक्षिण पंचायतीपासून “सेवा संकल्प अभियान” सुरू

September 17, 2026
“ट्रॉय”चे श्रीकांत भरले यांची तालुका अध्यक्षपदी निवड

“ट्रॉय”चे श्रीकांत भरले यांची तालुका अध्यक्षपदी निवड

September 17, 2026
“स्वच्छता ही सेवा” अभियान यशस्वीपणे राबवा. सीईओ कुशल जैन

“स्वच्छता ही सेवा” अभियान यशस्वीपणे राबवा. सीईओ कुशल जैन

September 16, 2026
माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांची उडाली तारांबळ

माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांची उडाली तारांबळ

September 16, 2026
तात्काळ “दक्षिण तालुका”  दुष्काळ जाहीर करा.

तात्काळ “दक्षिण तालुका” दुष्काळ जाहीर करा.

September 16, 2026
उद्घाटन कार्यक्रमात लोकप्रतिनिधींचा अपमान !

उद्घाटन कार्यक्रमात लोकप्रतिनिधींचा अपमान !

September 15, 2026

राजकारण

No Content Available
Load More

वेबसाईट दर्शक

136506

वृत्त संग्रह

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • About Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • क्राईम
  • कृषी
  • आरोग्य

© Website Design by Digital Buffalo - 9028927697