Friday, June 5, 2026
Navprabhatnews
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • क्राईम
  • कृषी
  • आरोग्य
No Result
View All Result
Navprabhatnews
No Result
View All Result

संस्कारक्षम पिढी घडविण्यासाठी सर्वांनी एकत्र काम करावे : आ. सुभाष देशमुख

संपादक-अमोगसिध्द मुंजे by संपादक-अमोगसिध्द मुंजे
May 27, 2026
in सोलापूर
0
संस्कारक्षम पिढी घडविण्यासाठी सर्वांनी एकत्र काम करावे : आ. सुभाष देशमुख
0
SHARES
21
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

वडाळा येथे लोकमंगलच्या बालसंस्कार शिबिराचे उद्घाटन 

सोलापूर : भविष्यात अधिकाधिक बालसंस्कार केंद्रे उभी करण्यासाठी सर्वांच्या सहकार्याने प्रयत्न करण्यात येतील. मुलांवर चांगले संस्कार घडविण्याचे मोठे कार्य या शिबिरातून होणार असून संस्कारक्षम पिढी घडविण्यासाठी सर्वांनी एकत्रितपणे काम करावे, असे प्रतिपादन आमदार सुभाष देशमुख यांनी केले.

सोलापूर सोशल फाउंडेशन व लोकमंगल फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित निवासी बालसंस्कार शिबिराचे उद्घाटन वडाळा येथे पार पडले. यावेळी आ. देशमुख बोलत होते. लोकमंगल महाविद्यालय परिसरातील राम मंदिरात आरती करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.

यावेळी ह.भ.प. अरुण पाटील यांनी प्रास्ताविकात सांगितले की, आ. देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात विविध गावांमध्ये बालसंस्कार केंद्रे सुरू करण्यात आली असून त्याचेच पुढे निवासी शिबिरात रूपांतर झाले आहे. बालवयात होणारे संस्कार अत्यंत महत्त्वाचे असून अनेक बाल वारकरी भविष्यात कीर्तन व प्रवचनासाठी तयार होत आहेत, ही आनंदाची बाब असल्याचे त्यांनी सांगितले.

ह.भ.प. विजय बिज्जरगी यांनी संत परंपरा, अध्यात्म आणि बालसंस्काराचे महत्त्व विशद केले. माजी पोलिस अधिकारी मल्लीकार्जुन गुरवसे यांनी आ. सुभाष देशमुख कोणतेही काम हाती घेतल्यास ते पूर्णत्वास नेतात, असे सांगितले.

तीन दिवसांच्या निवासी शिबिरात सामाजिक, आध्यात्मिक व शारीरिक शिक्षणासोबतच पखवाज वादन, गायन, कीर्तन सेवा आदी विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्ह्यातील अनेक बालक व युवक या शिबिरात सहभागी झाले आहेत.

सुंदर आणि स्वच्छ गावासाठी पुढाकार घ्या :

समाजात परस्पर सहकार्याची भावना निर्माण होणे आवश्यक आहे. प्रत्येकाने आपल्या घरासमोर एक झाड लावून त्याचे संगोपन करावे. निसर्गाने दिलेला ऑक्सिजन जपणे ही आपली जबाबदारी असून गाव सुंदर व स्वच्छ ठेवण्यासाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन आ. सुभाष देशमुख यांनी केले.

__________________________________
*🛑नवप्रभात न्युज पोर्टल ला बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा*
*संपादक :- अमोगसिद्ध मुंजे*
*9423535294*

Previous Post

“या” कारणामुळे ४० उमेदवार तीन वर्षासाठी अपात्र

Next Post

महिलांचे स्वतंत्र सैन्यदल स्थापन करून अहिल्यादेवींनी राज्याचे संरक्षण केले: डॉ. ऋत्विक जयकर

संपादक-अमोगसिध्द मुंजे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

‘गोकुळ’च्या थकीत बिलासाठी शेतकर्‍यांचे अर्धनग्न आंदोलन

‘गोकुळ’च्या थकीत बिलासाठी शेतकर्‍यांचे अर्धनग्न आंदोलन

June 4, 2026
28 हजार 298 परीक्षार्थी देणार टीईटी परीक्षा

28 हजार 298 परीक्षार्थी देणार टीईटी परीक्षा

June 4, 2026
“सावकारां”च्या वाढदिवसाला रक्तदात्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

“सावकारां”च्या वाढदिवसाला रक्तदात्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

June 4, 2026
अतिक्रमणामुळे  सदस्यत्व रद्द करण्याची मागणी

अतिक्रमणामुळे सदस्यत्व रद्द करण्याची मागणी

June 2, 2026
रोहीणी कुंभार मंद्रूप , तर ओजस हुक्केरी येळेगावचा सरपंच !

रोहीणी कुंभार मंद्रूप , तर ओजस हुक्केरी येळेगावचा सरपंच !

June 2, 2026
पत्नीच्या निधनाची माहीती मिळताच पतीचेही निधन

पत्नीच्या निधनाची माहीती मिळताच पतीचेही निधन

June 1, 2026
विधानपरिषदेसाठी बार्शीचे राजाभाऊ राऊत यांचा उमेदवारी अर्ज दाखल

विधानपरिषदेसाठी बार्शीचे राजाभाऊ राऊत यांचा उमेदवारी अर्ज दाखल

June 1, 2026
परिचारक व राऊत यांच्या उमेदवारीविषयी सस्पेन्स ?

परिचारक व राऊत यांच्या उमेदवारीविषयी सस्पेन्स ?

May 31, 2026

राजकारण

No Content Available
Load More

वेबसाईट दर्शक