Thursday, September 17, 2026
Navprabhatnews
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • क्राईम
  • कृषी
  • आरोग्य
No Result
View All Result
Navprabhatnews
No Result
View All Result

महिलांचे स्वतंत्र सैन्यदल स्थापन करून अहिल्यादेवींनी राज्याचे संरक्षण केले: डॉ. ऋत्विक जयकर

संपादक-अमोगसिध्द मुंजे by संपादक-अमोगसिध्द मुंजे
May 27, 2026
in सोलापूर
0
महिलांचे स्वतंत्र सैन्यदल स्थापन करून अहिल्यादेवींनी राज्याचे संरक्षण केले: डॉ. ऋत्विक जयकर
0
SHARES
3
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर विद्यापीठात जयंतीनिमित्त आरोग्य शिबिर व वृक्षारोपण 

सोलापूर – पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर या केवळ कुशल प्रशासक नव्हत्या, तर प्रजा हितासाठी सदैव तत्पर असलेल्या रणरागिणी होत्या. तीनशे वर्षांपूर्वीच त्यांनी महिलांचे स्वतंत्र सैन्यदल स्थापन करून राज्याचे संरक्षण केले आणि महिला सक्षमीकरणाचे धडे दिले, असे प्रतिपादन डॉ. वैशंपायन स्मृती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. ऋत्विक जयकर यांनी केले.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातर्फे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंती सप्ताहानिमित्त आयोजित वृक्षारोपण व आरोग्य शिबिराचे उद्घाटन डॉ. जयकर यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. प्रकाश महानवर होते. यावेळी प्र-कुलगुरू डॉ. लक्ष्मीकांत दामा, पिंक रिव्हलेशनचे डॉ. श्रद्धा जवंजाळ व डॉ. राहुल जवंजाळ, प्रभारी कुलसचिव डॉ. अतुल लकडे, अध्यासन केंद्राचे संचालक डॉ. प्रभाकर कोळेकर, विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. केदारनाथ काळवणे, राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे प्रभारी संचालक डॉ. मुकुंद माळी यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत विद्यापीठाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अभिजीत जगताप यांनी केले.

कुलगुरू डॉ. प्रकाश महानवर म्हणाले, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंती सप्ताहानिमित्त विविध उपक्रमांसह आरोग्य शिबिराचेही आयोजन केले आहे. आरोग्य चांगले असेल तरच इतर सर्व गोष्टी सुरळीत पार पडतात. आरोग्याकडे दुर्लक्ष न करता, तसेच आपल्या आई-वडिलांची आदराने काळजी घेणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे, असे त्यांनी सांगितले.

पिंक रिव्हलेशनचा उपायुक्त सामंजस्य करार
डॉ. श्रद्धा जवंजाळ म्हणाल्या, “विद्यापीठ आणि पिंक रिव्हलेशन यांच्यात झालेल्या करारामुळे गर्भाशयाच्या कर्करोगावरील लसविषयक जनजागृती उपक्रमांना गती मिळेल. महिलांसोबत पुरुषांनीही आरोग्याच्या बाबतीत जागरूक राहणे अत्यावश्यक आहे,” असे त्यांनी नमूद केले. या कार्यक्रमास व्यवस्थापन परिषदेचे सदस्य प्रा. देवानंद चिलवंत, वित्त व लेखा अधीकारी सीए महादेव खराडे, परीक्षा विभाग संचालक डॉ. श्रीकांत अंधारे यांच्यासह अधिकारी, कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. श्रुती देवळे यांनी केले. आभार डॉ. मुकुंद माळी यांनी मानले.

__________________________________
*🛑नवप्रभात न्युज पोर्टल ला बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा*
*संपादक :- अमोगसिद्ध मुंजे*
*9423535294*

Previous Post

संस्कारक्षम पिढी घडविण्यासाठी सर्वांनी एकत्र काम करावे : आ. सुभाष देशमुख

Next Post

“मेलो तर मेलो..!” रणरणत्या उन्हात मनोज जरांगे यांचा आमरण उपोषणाचा इशारा

संपादक-अमोगसिध्द मुंजे

संपादक-अमोगसिध्द मुंजे

Next Post
“मेलो तर मेलो..!” रणरणत्या उन्हात मनोज जरांगे यांचा आमरण उपोषणाचा इशारा

“मेलो तर मेलो..!” रणरणत्या उन्हात मनोज जरांगे यांचा आमरण उपोषणाचा इशारा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सेवा संकल्प अभियानाचे पहिले “मानकरी” ठरले शिक्षक

सेवा संकल्प अभियानाचे पहिले “मानकरी” ठरले शिक्षक

September 17, 2026
न्यायासाठी भटक्या समाजावर ऊन्हातच उपोषण करण्याची वेळ !

कंदलगावात मारहाण करून जबरी चोरी

September 17, 2026
दक्षिण पंचायतीपासून “सेवा संकल्प अभियान” सुरू

दक्षिण पंचायतीपासून “सेवा संकल्प अभियान” सुरू

September 17, 2026
“ट्रॉय”चे श्रीकांत भरले यांची तालुका अध्यक्षपदी निवड

“ट्रॉय”चे श्रीकांत भरले यांची तालुका अध्यक्षपदी निवड

September 17, 2026
“स्वच्छता ही सेवा” अभियान यशस्वीपणे राबवा. सीईओ कुशल जैन

“स्वच्छता ही सेवा” अभियान यशस्वीपणे राबवा. सीईओ कुशल जैन

September 16, 2026
माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांची उडाली तारांबळ

माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांची उडाली तारांबळ

September 16, 2026
तात्काळ “दक्षिण तालुका”  दुष्काळ जाहीर करा.

तात्काळ “दक्षिण तालुका” दुष्काळ जाहीर करा.

September 16, 2026
उद्घाटन कार्यक्रमात लोकप्रतिनिधींचा अपमान !

उद्घाटन कार्यक्रमात लोकप्रतिनिधींचा अपमान !

September 15, 2026

राजकारण

No Content Available
Load More

वेबसाईट दर्शक

136506

वृत्त संग्रह

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • About Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • क्राईम
  • कृषी
  • आरोग्य

© Website Design by Digital Buffalo - 9028927697