Thursday, September 17, 2026
Navprabhatnews
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • क्राईम
  • कृषी
  • आरोग्य
No Result
View All Result
Navprabhatnews
No Result
View All Result

“मेलो तर मेलो..!” रणरणत्या उन्हात मनोज जरांगे यांचा आमरण उपोषणाचा इशारा

संपादक-अमोगसिध्द मुंजे by संपादक-अमोगसिध्द मुंजे
May 28, 2026
in सोलापूर
0
“मेलो तर मेलो..!” रणरणत्या उन्हात मनोज जरांगे यांचा आमरण उपोषणाचा इशारा
0
SHARES
24
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

अंतरवाली सराटीतून मनोज जरांगे पाटील आक्रमक 

अंतरवाली सराटी : 

मराठा समाज आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी सरकारविरोधात आक्रमक भूमिका घेत 30 मेपासून अंतरवाली सराटी येथे आमरण उपोषणाला बसणार असल्याची घोषणा केली आहे. “मंडपात नाही, तर भर रणरणत्या उन्हात उपोषण करणार… मेलो तर मेलो पण आता मागे हटणार नाही,” असा थेट इशाराच त्यांनी सरकारला दिला.

  “कुणबी आणि मराठा हे दोन्ही एकच आहेत. सरकारला फक्त मराठ्यांची मते पाहिजेत, पण आरक्षणाच्या प्रश्नावर निर्णय घ्यायची वेळ आली की टाळाटाळ केली जाते,” असा आरोप त्यांनी केला.
“सरकारने वारंवार आश्वासने दिली, मात्र प्रत्यक्षात कोणतीही ठोस अंमलबजावणी केली नाही,” अशी नाराजीही त्यांनी व्यक्त केली.
मनोज जरांगे पाटील पुढे म्हणाले कि, “आम्ही मुख्यमंत्री फडणवीस यांचे विरोधक नाही. त्यांनी शंभर टक्के आरक्षण देऊ असे सांगून समाजात अपेक्षा निर्माण केल्या. अजूनही त्यांच्याकडे मराठा समाजाची मनं जिंकण्याची संधी आहे. त्यांनी सर्व मागण्या मान्य करून निर्णय घ्यावा. मराठा समाज हा लढणारा आणि साम्राज्य उभं करणारा समाज आहे. केवळ आश्वासनांवर आता समाज थांबणार नाही. चर्चा खूप झाल्या, आता निर्णय हवा,” असे सांगत त्यांनी सरकारवर दबाव वाढवला.
30 मेपासून सुरू होणारे उपोषण अत्यंत टोकाचे असेल, असे स्पष्ट करताना जरांगे पाटील यांनी कोणत्याही मराठा बांधवांनी अंतरवाली सराटीत गर्दी करू नये, असे आवाहन केले. “मी समाजासाठी प्रामाणिकपणे लढतोय. उष्माघाताने माझा बळी गेला तरी मी मागे हटणार नाही,” असा भावनिक निर्धारही त्यांनी व्यक्त केला.
“आता फोनवरून कोणतीही चर्चा होणार नाही. आम्ही चर्चेला कधीच नकार दिला नाही. सरकारलाच उत्तर द्यायला जागा उरलेली नाही. आम्ही अल्टिमेटम दिला होता, पण मागण्या मान्य झाल्या नाहीत. त्यामुळे आता 30 मेपासून उपोषण अटळ आहे,” असे ते म्हणाले.
__________________________________
*🛑नवप्रभात न्युज पोर्टल ला बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा*
*संपादक :- अमोगसिद्ध मुंजे*
*9423535294*

Previous Post

महिलांचे स्वतंत्र सैन्यदल स्थापन करून अहिल्यादेवींनी राज्याचे संरक्षण केले: डॉ. ऋत्विक जयकर

Next Post

दक्षिण तालुक्याचे “जननायक” आदरणीय “सुरेश हसापूरे” साहेबांना जन्मदिनाच्या शुभेच्छा !

संपादक-अमोगसिध्द मुंजे

संपादक-अमोगसिध्द मुंजे

Next Post
दक्षिण तालुक्याचे “जननायक” आदरणीय “सुरेश हसापूरे” साहेबांना जन्मदिनाच्या शुभेच्छा !

दक्षिण तालुक्याचे "जननायक" आदरणीय "सुरेश हसापूरे" साहेबांना जन्मदिनाच्या शुभेच्छा !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सेवा संकल्प अभियानाचे पहिले “मानकरी” ठरले शिक्षक

सेवा संकल्प अभियानाचे पहिले “मानकरी” ठरले शिक्षक

September 17, 2026
न्यायासाठी भटक्या समाजावर ऊन्हातच उपोषण करण्याची वेळ !

कंदलगावात मारहाण करून जबरी चोरी

September 17, 2026
दक्षिण पंचायतीपासून “सेवा संकल्प अभियान” सुरू

दक्षिण पंचायतीपासून “सेवा संकल्प अभियान” सुरू

September 17, 2026
“ट्रॉय”चे श्रीकांत भरले यांची तालुका अध्यक्षपदी निवड

“ट्रॉय”चे श्रीकांत भरले यांची तालुका अध्यक्षपदी निवड

September 17, 2026
“स्वच्छता ही सेवा” अभियान यशस्वीपणे राबवा. सीईओ कुशल जैन

“स्वच्छता ही सेवा” अभियान यशस्वीपणे राबवा. सीईओ कुशल जैन

September 16, 2026
माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांची उडाली तारांबळ

माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांची उडाली तारांबळ

September 16, 2026
तात्काळ “दक्षिण तालुका”  दुष्काळ जाहीर करा.

तात्काळ “दक्षिण तालुका” दुष्काळ जाहीर करा.

September 16, 2026
उद्घाटन कार्यक्रमात लोकप्रतिनिधींचा अपमान !

उद्घाटन कार्यक्रमात लोकप्रतिनिधींचा अपमान !

September 15, 2026

राजकारण

No Content Available
Load More

वेबसाईट दर्शक

136491

वृत्त संग्रह

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • About Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • क्राईम
  • कृषी
  • आरोग्य

© Website Design by Digital Buffalo - 9028927697