Friday, June 5, 2026
Navprabhatnews
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • क्राईम
  • कृषी
  • आरोग्य
No Result
View All Result
Navprabhatnews
No Result
View All Result

सिध्दरामया यांचा मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा , कर्नाटकचे नवे सीएम डीके शिवकुमार !

कर्नाटकात ५०—५०चा फाॅर्म्युला यशस्वी

संपादक-अमोगसिध्द मुंजे by संपादक-अमोगसिध्द मुंजे
May 29, 2026
in सोलापूर
0
सिध्दरामया यांचा मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा , कर्नाटकचे नवे सीएम डीके शिवकुमार !
0
SHARES
152
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

हायकमांडच्या आदेशानुसार दिला राजीनामा

बेंगळूर…
कर्नाटकामध्ये काँग्रेस पक्षात मोठे सत्तांतर झाले असून मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. काँग्रेस हायकमांडच्या सूचनेनुसार, आता उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार हे कर्नाटकचे नवे मुख्यमंत्री म्हणून सूत्रे स्वीकारणार आहेत.  सिद्धरामय्या यांनी २८ मे रोजी मंत्रिमंडळाच्या बैठकीत राजीनामा देण्याची घोषणा केली. २९ मे रोजी राज्यपाल थावरचंद गेहलोत यांनी राजीनामा स्वीकारला आहे.  २०२३ मध्ये काँग्रेस पक्षाने सत्तेवर आल्यानंतर अडीच-अडीच वर्षे मुख्यमंत्रिपदाचा फॉर्म्युला ठरवला होता. त्यानुसार सिद्धरामय्या यांनी आपला कार्यकाळ पूर्ण केल्याने त्यांनी हे पद सोडले आहे. सिध्दरामया आणि शिवकुमार यांच्यात अडीच अडीच वर्षाचा फाॅर्म्युला ठरला होता. मात्र तीन वर्ष झाल्यानंतरही सिध्दरामया राजीनामा देत नसल्याने शिवकुमार यांनी अनेक वेळा पक्षश्रेष्ठींकडे नाराजी व्यक्त केले होते. त्यानुसार पक्षाचे नेते रणजित सूरजेवाला आणि केसी वेणुगोपाल यांच्याशी चर्चा करून आणि हायकमांड राहुल गांधी यांच्या आदेशानुसार सिध्दरामया यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देऊन शिवकुमार यांना मुख्यमंत्री होण्याचा मार्ग सुलभ केला आहे. 
पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आणि सध्याचे उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांची नवे मुख्यमंत्री म्हणून निवड निश्चित आहे. नवीन मुख्यमंत्र्यांची निवड आणि विधिमंडळ पक्ष नेतेपदाच्या निवडीसाठी बेंगळुरूमध्ये काँग्रेस विधिमंडळ पक्षाची बैठक आयोजित करण्यात आली आहे. डी. के. शिवकुमार यांच्यासमोर सिद्धरामय्या यांच्या समर्थकांना सोबत घेणे, आगामी राज्यसभा आणि विधान परिषद निवडणुकांमध्ये पक्षाला विजय मिळवून देणे आणि काँग्रेसच्या ‘५ गॅरंटी योजना’ सुरळीत चालू ठेवणे ही मुख्य आव्हाने आहेत.
सिद्धरामय्या यांनी केंद्रातील राज्यसभेची ऑफर नाकारली असून, आपण सक्रिय राजकारणात राहून कर्नाटक राज्यातच काम करणार असल्याचे स्पष्ट केले आहे. डी. के. शिवकुमार यांच्या नवीन सरकारमध्ये ते महत्त्वाची भूमिका बजावतील.

   कर्नाटकाच्या राजकारणात लिंगायत आणि वक्कलिगा समाज निर्णायक भूमिकेत आहे. त्यामुळे  आगामी निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर वक्कलिगा समाजाला काॅंग्रेसकडे आकर्षित करण्यासाठी पक्षाने शिवकुमार यांना संधी दिल्याचे बोलले जात आहे.

*************
नवप्रभात न्युज पोर्टलला बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा.
संपादक :- अमोगसिद्ध मुंजे
मो.नं. 9423535294

Previous Post

दक्षिण तालुक्याचे “जननायक” आदरणीय “सुरेश हसापूरे” साहेबांना जन्मदिनाच्या शुभेच्छा !

Next Post

ब्रेकींग ! कृषी सहायक अमोल देवकर निलंबित

संपादक-अमोगसिध्द मुंजे

संपादक-अमोगसिध्द मुंजे

Next Post
ब्रेकींग ! कृषी सहायक अमोल देवकर निलंबित

ब्रेकींग ! कृषी सहायक अमोल देवकर निलंबित

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

‘गोकुळ’च्या थकीत बिलासाठी शेतकर्‍यांचे अर्धनग्न आंदोलन

‘गोकुळ’च्या थकीत बिलासाठी शेतकर्‍यांचे अर्धनग्न आंदोलन

June 4, 2026
28 हजार 298 परीक्षार्थी देणार टीईटी परीक्षा

28 हजार 298 परीक्षार्थी देणार टीईटी परीक्षा

June 4, 2026
“सावकारां”च्या वाढदिवसाला रक्तदात्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

“सावकारां”च्या वाढदिवसाला रक्तदात्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

June 4, 2026
अतिक्रमणामुळे  सदस्यत्व रद्द करण्याची मागणी

अतिक्रमणामुळे सदस्यत्व रद्द करण्याची मागणी

June 2, 2026
रोहीणी कुंभार मंद्रूप , तर ओजस हुक्केरी येळेगावचा सरपंच !

रोहीणी कुंभार मंद्रूप , तर ओजस हुक्केरी येळेगावचा सरपंच !

June 2, 2026
पत्नीच्या निधनाची माहीती मिळताच पतीचेही निधन

पत्नीच्या निधनाची माहीती मिळताच पतीचेही निधन

June 1, 2026
विधानपरिषदेसाठी बार्शीचे राजाभाऊ राऊत यांचा उमेदवारी अर्ज दाखल

विधानपरिषदेसाठी बार्शीचे राजाभाऊ राऊत यांचा उमेदवारी अर्ज दाखल

June 1, 2026
परिचारक व राऊत यांच्या उमेदवारीविषयी सस्पेन्स ?

परिचारक व राऊत यांच्या उमेदवारीविषयी सस्पेन्स ?

May 31, 2026

राजकारण

No Content Available
Load More

वेबसाईट दर्शक