Thursday, September 17, 2026
Navprabhatnews
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • क्राईम
  • कृषी
  • आरोग्य
No Result
View All Result
Navprabhatnews
No Result
View All Result

ब्रेकींग ! कृषी सहायक अमोल देवकर निलंबित

संपादक-अमोगसिध्द मुंजे by संपादक-अमोगसिध्द मुंजे
May 30, 2026
in सोलापूर
0
ब्रेकींग ! कृषी सहायक अमोल देवकर निलंबित
0
SHARES
206
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
कासेगावच्या ग्रामस्थांच्या लढयाला यश !
दक्षिण सोलापूर —दक्षिण सोलापूर तालुक्यातील कासेगाव येथील कृषी सहायक अमोल देवकर यांनी शेतकऱ्यांशी उद्धट वर्तन करून त्यांना अश्लिल भाषेत शिवीगाळ केल्याप्रकरणी कृषी सहायक देवकर यांच्यावर कारवाई करण्याच्या मागणीसाठी कासेगाव ग्रामस्थांनी जिल्हानिकारी, तालुका पोलीस व तालुका कृषी अधिकारी यांना निवेदन दिला होता . या निवेदनाची दखल घेऊन तालुका कृषी अधिकारी अवधूत मुळे यांनी वरिष्ठ कार्यालयात देवकर यांच्यावर कारवाई करण्याची शिफारस केली होती. त्यानुसार पुणे विभागीय कृषी सहसंचालक दतात्रय गावसाने यांनी  देवकर यांच्यावर निलंबनाची कारवाई केली आहे. 
   कृषी सहायकाच्या वर्तनाचा निषेध म्हणून शुक्रवारी २९ मे  रोजी कासेगाव येथे आयोजित करण्यात आलेल्या ‘खरीप हंगाम विस्तार मोहीम’ कार्यक्रमावर गावकऱ्यांनी बहिष्कार टाकला होता . त्यामुळे कृषी विभागाने याची दखल घेऊन देवकर यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करीत निलंबन केला आहे. तसेच निलंबन काळात उपविभागीय कृषी अधिकारी कार्यालयात उपस्थित राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
          कासेगाव येथील शेतकऱ्यांनी  देवकर हे गावात येत नाहीत, शेतकऱ्यांना मार्गदर्शन करत नाहीत आणि व्हॉट्सअॅप ग्रुपवर विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे देत नाहीत, अशी तक्रार केली होती. या तक्रारीबाबत विचारणा केली असता देवकर यांनी संबंधित शेतकऱ्यांना अतिशय अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली. या घटनेची ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने परिसरात संतापाची लाट उसळली होती.
    सरपंच यशपाल वाडकर यांनी कृषी सहाय्यक अमोल देवकर यांच्या कार्यपद्धतीबद्दल तक्रारी केल्या होत्या. शिवाय कासेगाव ग्रामस्थांनी कारवाई मागणीसाठी आंदोलनाचा पवित्रा घेतला होता. त्यामुळे कासेगावच्या कृषी सहायकावर निलंबनाची कारवाई करण्यात आल्याचे सांगण्यात येते.
*************

नवप्रभात न्युज पोर्टलला बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा.
संपादक :- अमोगसिद्ध मुंजे
मो.नं. 9423535294

Previous Post

सिध्दरामया यांचा मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा , कर्नाटकचे नवे सीएम डीके शिवकुमार !

Next Post

जमीनीच्या वादातून एकाच कुटुंबातील पाच जणांची हत्या ?

संपादक-अमोगसिध्द मुंजे

संपादक-अमोगसिध्द मुंजे

Next Post
जमीनीच्या वादातून एकाच कुटुंबातील पाच जणांची  हत्या ?

जमीनीच्या वादातून एकाच कुटुंबातील पाच जणांची हत्या ?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सेवा संकल्प अभियानाचे पहिले “मानकरी” ठरले शिक्षक

सेवा संकल्प अभियानाचे पहिले “मानकरी” ठरले शिक्षक

September 17, 2026
न्यायासाठी भटक्या समाजावर ऊन्हातच उपोषण करण्याची वेळ !

कंदलगावात मारहाण करून जबरी चोरी

September 17, 2026
दक्षिण पंचायतीपासून “सेवा संकल्प अभियान” सुरू

दक्षिण पंचायतीपासून “सेवा संकल्प अभियान” सुरू

September 17, 2026
“ट्रॉय”चे श्रीकांत भरले यांची तालुका अध्यक्षपदी निवड

“ट्रॉय”चे श्रीकांत भरले यांची तालुका अध्यक्षपदी निवड

September 17, 2026
“स्वच्छता ही सेवा” अभियान यशस्वीपणे राबवा. सीईओ कुशल जैन

“स्वच्छता ही सेवा” अभियान यशस्वीपणे राबवा. सीईओ कुशल जैन

September 16, 2026
माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांची उडाली तारांबळ

माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांची उडाली तारांबळ

September 16, 2026
तात्काळ “दक्षिण तालुका”  दुष्काळ जाहीर करा.

तात्काळ “दक्षिण तालुका” दुष्काळ जाहीर करा.

September 16, 2026
उद्घाटन कार्यक्रमात लोकप्रतिनिधींचा अपमान !

उद्घाटन कार्यक्रमात लोकप्रतिनिधींचा अपमान !

September 15, 2026

राजकारण

No Content Available
Load More

वेबसाईट दर्शक

136492

वृत्त संग्रह

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • About Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • क्राईम
  • कृषी
  • आरोग्य

© Website Design by Digital Buffalo - 9028927697