भिमा तीर परिसर हादरला, चडचण तालुक्यातील गोविंदपूर येथील घटना
विजयपूर …
विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर गावात शुक्रवारी सायंकाळी घडलेल्या भीषण घटनेत सहाजणांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आल्याने संपूर्ण भिमातीर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
प्राथमिक माहितीनुसार, गोविंदपूर गावात निराळे आणि गुळगी (गोलगी) कुटुंबांमध्ये अनेक दिवसांपासून जमिनीच्या वादावरून संघर्ष सुरू होता. या जुन्या वैमनस्यातूनच हा रक्तरंजित हल्ला झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. चडचण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गोविंदपूर गावात सहा जणांची निर्घृण हत्या झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

1. चंदू निराळे
2. दुंडप्पा निराळे
3. शिवपुत्र निराळे
4. राहुल निराळे
5. समर्थ निराळे
6. शब्बीर नदाफ
हे सर्व गोविंदपूर गावचे रहिवासी असल्याची माहिती मिळाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अज्ञात हल्लेखोरांनी गावात येऊन थेट गोळीबार केला. या थरारक हल्ल्यात सहाजणांचा जागीच मृत्यू झाला. घटनेनंतर गावात तणावपूर्ण शांतता असून, सीमाभागातील नागरिकांमध्ये मोठी भीती पसरली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांचा मोठा फौजफाटा गावात दाखल झाला असून, परिसरात कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन तपास सुरू केला आहे. हल्लेखोरांचा शोध घेण्यासाठी विशेष पथके तयार करण्यात आली आहेत. या दुहेरी नव्हे तर सामूहिक हत्याकांडामुळे विजयपूर जिल्हा हादरला असून, भिमातीर परिसरात पुन्हा एकदा रक्तपाताची पुनरावृत्ती झाल्याची चर्चा सुरू आहे. पोलिसांकडून अधिकृत माहिती आणि मृतांची संपूर्ण ओळख अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही.
*************
नवप्रभात न्युज पोर्टलला बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा.
संपादक :- अमोगसिद्ध मुंजे
मो.नं. 9423535294














