Thursday, September 17, 2026
Navprabhatnews
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • क्राईम
  • कृषी
  • आरोग्य
No Result
View All Result
Navprabhatnews
No Result
View All Result

तडजोडीचा मार्ग स्वीकारून मुलींचे आयुष्य सुखी बनवा

संपत्तीपेक्षा मुलामुलींच्या संस्काराला महत्व द्या

संपादक-अमोगसिध्द मुंजे by संपादक-अमोगसिध्द मुंजे
May 31, 2026
in सोलापूर
0
तडजोडीचा मार्ग स्वीकारून मुलींचे आयुष्य सुखी बनवा
0
SHARES
134
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

चर्मकार समाज विकास मंडळाच्या मेळाव्यात ४५० वधू – वरांची नोंदणी

सोलापूर : अनेक समाजात मुलींचे प्रमाण कमी असताना आहे. त्या मुलींचे विवाह थांबल्याने त्यांचे वय वाढत आहे. याला पालकांच्या अपेक्षांचं ओझं जबाबदार आहे. यापुढे तिच्या डोक्यात अपेक्षा भरवू नका, तडजोडीचा मार्ग अवलंबून पुढचे आयुष्य सुखी करा, अशी अपेक्षा रायगडचे उपजिल्हाधिकारी भारत वाघमारे यांनी व्यक्त केली. चर्मकार समाज विकास मंडळाच्या वतीने आयोजित केलेल्या वधू-वर परिचय संमेलनात अध्यक्ष म्हणून बोलताना उपजिल्हाधिकारी वाघमारे यांनी वरील अपेक्षा व्यक्त केली.

   जामगोंडी लॉन्स येथे रविवारी पार पडलेल्या वधू-वर मेळाव्यास महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीचे अधीक्षक अभियंता सुनील माने, राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे प्रदेशाध्यक्ष माधव गायकवाड, शुभांगी माने, पूर्वा वाघमारे, पाटबंधारे विभागाचे निवृत्त कार्यकारी संचालक हरीदास टाणपे, नायब तहसीलदार बालाजी बनसोडे, पाकणी आश्रम शाळेचे संचालक दत्तात्रय शिंदे, प्रमुख निमंत्रक राजशेखर जेऊरकर, मल्हारी बनसोडे, सेवानिवृत्त पोलीस निरीक्षक विठ्ठल अंगुले यांची प्रमुख उपस्थिती होती. या मेळाव्यात ४५० वधू-वर यांची नोंदणी झाली.

   प्रारंभी राजशेखर जेऊरकर यांनी वधू-वर संमेलनाचे दुसरे वर्ष असल्याचे सांगत संमेलनामागचा हेतू विषद केला. यावेळी अधीक्षक अभियंता सुनील माने यांनी संत रोहिदासांच्या विचारावर चाला, बाबासाहेबांनी दिलेल्या अधिकाराचा वापर करा असे सांगत वधू-वर चौकशी करताना संपत्ती नको तर मुला, मुलीचे संस्कार पाहा असा आग्रह धरला.
या संमेलनासाठी परशुराम शिंदे, रेवणसिद्ध व्हनमराठे, वामन धुळराव, शिवपूत्र हरवाळकर, अंबादास वाघमारे, दत्तात्रय हरवाळकर, शावरप्पा वाघमारे, प्रा. आंबादास चाबुकस्वार, राजेंद्र व्हनकोरे, शिवकुमार तोळणुरे, महादेव कांबळे, संगीता शिंदे, पौर्णिमा धुळराव, सुनिता वनस्कर, सुजाता हरवाळकर, रुपाली बनसोडे, ज्योती बनसोडे, ज्योती कांबळे, यल्लप्पा व्हनहुवे, यांच्यासह चर्मकार समाज विकास मंडळाच्या पदाधिका-यांनी परिश्रम घेतले.

*************
नवप्रभात न्युज पोर्टलला बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा.
संपादक :- अमोगसिद्ध मुंजे
मो.नं. 9423535294

Previous Post

खो खो मध्ये धाराशिव तर कबड्डीमध्ये मुंबई उपनगर प्रथम क्रमांकाचे मानकरी

Next Post

हवामानात बदल मात्र १० जूनपर्यंत पाऊस गायब ?

संपादक-अमोगसिध्द मुंजे

संपादक-अमोगसिध्द मुंजे

Next Post
हवामानात बदल मात्र १० जूनपर्यंत पाऊस गायब ?

हवामानात बदल मात्र १० जूनपर्यंत पाऊस गायब ?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सेवा संकल्प अभियानाचे पहिले “मानकरी” ठरले शिक्षक

सेवा संकल्प अभियानाचे पहिले “मानकरी” ठरले शिक्षक

September 17, 2026
न्यायासाठी भटक्या समाजावर ऊन्हातच उपोषण करण्याची वेळ !

कंदलगावात मारहाण करून जबरी चोरी

September 17, 2026
दक्षिण पंचायतीपासून “सेवा संकल्प अभियान” सुरू

दक्षिण पंचायतीपासून “सेवा संकल्प अभियान” सुरू

September 17, 2026
“ट्रॉय”चे श्रीकांत भरले यांची तालुका अध्यक्षपदी निवड

“ट्रॉय”चे श्रीकांत भरले यांची तालुका अध्यक्षपदी निवड

September 17, 2026
“स्वच्छता ही सेवा” अभियान यशस्वीपणे राबवा. सीईओ कुशल जैन

“स्वच्छता ही सेवा” अभियान यशस्वीपणे राबवा. सीईओ कुशल जैन

September 16, 2026
माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांची उडाली तारांबळ

माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांची उडाली तारांबळ

September 16, 2026
तात्काळ “दक्षिण तालुका”  दुष्काळ जाहीर करा.

तात्काळ “दक्षिण तालुका” दुष्काळ जाहीर करा.

September 16, 2026
उद्घाटन कार्यक्रमात लोकप्रतिनिधींचा अपमान !

उद्घाटन कार्यक्रमात लोकप्रतिनिधींचा अपमान !

September 15, 2026

राजकारण

No Content Available
Load More

वेबसाईट दर्शक

136492

वृत्त संग्रह

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • About Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • क्राईम
  • कृषी
  • आरोग्य

© Website Design by Digital Buffalo - 9028927697