Thursday, September 17, 2026
Navprabhatnews
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • क्राईम
  • कृषी
  • आरोग्य
No Result
View All Result
Navprabhatnews
No Result
View All Result

खो खो मध्ये धाराशिव तर कबड्डीमध्ये मुंबई उपनगर प्रथम क्रमांकाचे मानकरी

संपादक-अमोगसिध्द मुंजे by संपादक-अमोगसिध्द मुंजे
May 31, 2026
in सोलापूर
0
खो खो मध्ये धाराशिव तर कबड्डीमध्ये मुंबई उपनगर प्रथम क्रमांकाचे मानकरी
0
SHARES
7
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

राज्य निमंत्रित महिला खोखो व कबड्डी स्पर्धा

सोलापूर :
राज्य निमंत्रित महिलांच्या खो खो स्पर्धेत धाराशिवचे छत्रपती व्यायाम प्रसारक मंडळ व कबड्डीमध्ये स्वराज्य स्पोर्ट्स क्लब मुंबई उपनगरने विजेतेपद पटकाविले.
माजी आमदार दिलीप माने यांच्या हस्ते प्रथम तीन संघास ५१ हजार ,३१ हजार , १५ हजार रुपये पारितोषिक व अहिल्याबाई होळकर स्मृती करंडक देण्यात आले. यावेळी डॉ. सूर्यकांत कोठे, नगरसेवक प्रथमेश कोठे, शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार विजेते श्रीकांत ढेपे, स्पर्धेचे निरीक्षक संदीप तावडे, जयंत मोरे, खोखो असोसिएशनचे पदाधिकारी उमाकांत गायकवाड, श्रीरंग बनसोडे, शरद व्हनकडे, अजित शिंदे, कबड्डी असोसिएशनचे पदाधिकारी मदन गायकवाड, एल. एस. गायकवाड, मरगु जाधव, संजय मोतेकर, लक्ष्मण बेल्हाळे व संतोष जाधव, हिंदू धर्मरक्षिणी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर मध्यवर्ती महामंडळ ट्रस्टी अध्यक्ष जयवंत सलगर, उपाध्यक्ष अक्षय वाकसे, उपाध्यक्ष नागेश खरात, सचिव शंकर नरोटे, सहसचिव समर्थ मोटे, खजिनदार प्रवीण खरात, ट्रस्टी, जयदीप जानकर, शिवाजी वाघमोडे, सिद्धबाबा निशाणदार, दिग्विजय देवकते, प्रभात हक्के, अतुल माशाळ, योगेश तरंगे आदी उपस्थित होते.


नार्थकोट प्रशालेच्या मैदानावर हिंदू धर्मरक्षिणी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर मध्यवर्ती महामंडळ यांच्या वतीने सोलापूर जिल्हा कबड्डी व खो-खो असोसिएशन आणि उत्कर्ष क्रीडा मंडळ यांच्या सहकार्याने स्पर्धा आयोजित केली होती. खो-खो च्या अंतिम सामन्यात अश्विनी शिंदे (३. ३०, १. ०० मि. नाबाद व २ गुण) व संध्या सुरवसे (१.००, ३. ०० मि. व ३ गुण ) यांच्या अष्टपैलू खेळामुळे धाराशिवने ठाण्याच्या ज्ञानविकास स्पोर्ट्स फाउंडेशनवर १३-९ असा एक डाव राखून दणदणीत विजय मिळवला.
कबड्डीच्या अंतिम सामन्यात याशिका पुजारी, प्रतिक्षा तांडेल व सानिया इंगळे यांच्या अष्टपैलू खेळीमुळे मुंबई उपनगरच्या स्वराज्य स्पोर्ट्स क्लबने बारामती अकॅडमीस २९-१९ असे हरविले.
——-
स्पर्धेतील प्रथम तीन संघ
खोखो: छत्रपती व्यायाम प्रसारक मंडळ (धाराशिव), ज्ञानविकास स्पोर्ट्स फाउंडेशन (ठाणे), आर्यन स्पोर्ट्स क्लब (रत्नागिरी).
…,.
कबड्डी : स्वराज्य स्पोर्ट्स क्लब (मुंबई उपनगर), बारामती अकॅडमी (बारामती), आनंदवन महिला संघ (परभणी).
——
वैयक्तिक पारितोषिक विजेते खेळाडू
खोखो अष्टपैलू : अश्विनी शिंदे (धाराशिव), आक्रमक : वैष्णवी फुटक (रत्नागिरी), संरक्षक : दिव्या गायकवाड (ठाणे)
कबड्डी अष्टपैलू : याशिका पुजारी ( मुंबई उपनगर), चढाईपटू : सुंदरी गुप्ता (बारामती), बचावपटू : प्रीती जाधव (सांगली).

*************
नवप्रभात न्युज पोर्टलला बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा.
संपादक :- अमोगसिद्ध मुंजे
मो.नं. 9423535294

Previous Post

चडचण — गोविंदपूर भीषण हत्याकांडमध्ये १२ जणांवर गुन्हा

Next Post

तडजोडीचा मार्ग स्वीकारून मुलींचे आयुष्य सुखी बनवा

संपादक-अमोगसिध्द मुंजे

संपादक-अमोगसिध्द मुंजे

Next Post
तडजोडीचा मार्ग स्वीकारून मुलींचे आयुष्य सुखी बनवा

तडजोडीचा मार्ग स्वीकारून मुलींचे आयुष्य सुखी बनवा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सेवा संकल्प अभियानाचे पहिले “मानकरी” ठरले शिक्षक

सेवा संकल्प अभियानाचे पहिले “मानकरी” ठरले शिक्षक

September 17, 2026
न्यायासाठी भटक्या समाजावर ऊन्हातच उपोषण करण्याची वेळ !

कंदलगावात मारहाण करून जबरी चोरी

September 17, 2026
दक्षिण पंचायतीपासून “सेवा संकल्प अभियान” सुरू

दक्षिण पंचायतीपासून “सेवा संकल्प अभियान” सुरू

September 17, 2026
“ट्रॉय”चे श्रीकांत भरले यांची तालुका अध्यक्षपदी निवड

“ट्रॉय”चे श्रीकांत भरले यांची तालुका अध्यक्षपदी निवड

September 17, 2026
“स्वच्छता ही सेवा” अभियान यशस्वीपणे राबवा. सीईओ कुशल जैन

“स्वच्छता ही सेवा” अभियान यशस्वीपणे राबवा. सीईओ कुशल जैन

September 16, 2026
माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांची उडाली तारांबळ

माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांची उडाली तारांबळ

September 16, 2026
तात्काळ “दक्षिण तालुका”  दुष्काळ जाहीर करा.

तात्काळ “दक्षिण तालुका” दुष्काळ जाहीर करा.

September 16, 2026
उद्घाटन कार्यक्रमात लोकप्रतिनिधींचा अपमान !

उद्घाटन कार्यक्रमात लोकप्रतिनिधींचा अपमान !

September 15, 2026

राजकारण

No Content Available
Load More

वेबसाईट दर्शक

136492

वृत्त संग्रह

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • About Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • क्राईम
  • कृषी
  • आरोग्य

© Website Design by Digital Buffalo - 9028927697